वास्तुचे हे नियम तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये घ्या, तुमच्या प्रत्येक अडचणी दूर होतील ..

भौतिक सुख-सुविधा प्रत्येक माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात. बरेच लोक ते सहज, आरामात मिळवत जातात, तर काहींना त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीत छोट्या छोट्या वास्तु टिप्स तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात. वास्तुशास्त्रात दिशा आणि ठिकाणांचे महत्त्व सांगितले आहे. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. तुम्हाला जीवनात नशीब आणि समृद्धी हवी असेल तर वास्तुशी संबंधित या छोट्या गोष्टींची काळजी घ्या.तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे. बाहेर पडताना उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करावे अशा पद्धतीने बनवावे.

तुळशीचे रोप हिंदू धर्मात पूजनीय आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे. वास्तूनुसार असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. ज्याचा आर्थिक फायदा होतो.घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे चित्र लावा, ज्यामध्ये ती कमलासनावर बसून सोन्याची नाणी टाकत आहे. असे चित्र असणे शुभ मानले जाते, यामुळे घरात समृद्धी येते.

वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी. वास्तूनुसार तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवावा. यामुळे घरातील संपत्ती वाढते.वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरातील स्वयंपाकघर, स्नानगृह आणि अगदी बागेत पाणी गळती होणे हे धन गळती मानले जाते आणि आर्थिक नुकसान दर्शवते. भिंतींमधून पाणी गळत असेल किंवा घरातील कोणतीही तुटलेली पाईपलाईन असेल, तर ती ताबडतोब दुरुस्त करावी.

घरातील कोळ्याचे जाळे, धूळ आणि घाण वेळोवेळी काढून टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. पार्किंगसाठी उत्तर-पश्चिम जागा वापरणे शुभ मानले जाते.उघड्या डस्टबिनचा वापर करू नका आणि डस्टबिनच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. डस्टबिन अशा ठिकाणी ठेवा जे तुम्हाला दिसत नाही, कारण ते नकारात्मक उर्जेचा स्त्रोत देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!