कर्जापासून सुटका मिळविण्यासाठी करा हा एक सोपा उपाय

कोणत्याही व्यक्तीला कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते. परंतु अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, त्यांना कर्ज घ्यावे लागते. वाढत्या कर्जामुळे व्यक्ती मानसिक तणावामध्ये राहू लागते. कधी कधी कर्जाचा बोजा इतका वाढतो की काय करावे हेच समजत नाही, अशा परिस्थितीत तुमच्या समस्येचे कारण तुमच्या घरातील वास्तू देखील असू शकते. घरातील वास्तू योग्य नसल्यास सर्व प्रकारच्या समस्या वाढू लागतात.

वास्तूनुसार जाणून घेऊया कोणते कारण आहे ज्यामुळे कर्ज वाढते.वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष असल्यास कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते. यामुळे माणूस विनाकारण कर्जाच्या फेऱ्यात अडकतो. घराच्या अग्निकोन (दक्षिण-पूर्व) मध्ये वास्तुदोष असल्यास खर्च इतका वाढतो की कर्ज फेडणे कठीण होते. कधी प्रतिष्ठा पणाला लागते. दुसरीकडे घराच्या ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर चुकीच्या मार्गदर्शनामुळे घराचा प्रमुख कर्जात अडकतो. उत्तर दिशेला वास्तुदोष असल्यामुळे शेअर बाजार, जुगार, सट्टा, लॉटरी यातून पैसे कमावण्याच्या लोभापोटी अनेकजण विनाकारण कर्जबाजारी होतात. वास्तूनुसार घराच्या प्रमुखाची बेडरूम पश्चिम दिशेला असेल तर व्यवसायात नुकसान होते, त्यामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते.

वास्तूनुसार बाथरूम घराच्या नैऋत्य भागात नसावे. असे म्हटले जाते की या दिशेला स्नानगृह असल्यास कर्जात बुडून जाऊ शकते. नैऋत्य दिशेला स्नानगृह बांधले असेल तर त्याच्या कोपऱ्यात मीठाने भरलेली वाटी ठेवावी, यामुळे वास्तुदोष दूर होतात. काही लोक जेवण झाल्यावर भांडी सोडतात. तर वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे धनहानी होते आणि कर्जाबरोबर गरिबीही वाढते, असे म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याचा पहिला हप्ता मंगळवारी भरावा. असे केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!