स्वामी म्हणतात की आपल्या किस्मत वर आपण अशी मात करावी

मित्रांनो वेळेच्या आधी आणि नशिबाशिवाय काही मिळत नसते.हाच विचार करून मन नेहमी फसत असते, नशीबावर मात करणे शेवटी आपल्याच हाती असते, मनात स्वप्न आणि अफाट परिश्रम अजून काय लागते….. मित्रानो आपण जे काही काम करतो त्या कामाच्या यशामध्ये आपल्या विचारसरणीचा आणि आपल्या मेहनतीच्या मोठा हात असतो. आपण स्वतः बद्दल कसा विचार करतो आणि काय करतो?हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे, मित्रांनो या घटनेमध्ये एका गावात एक मुलगा राहत होता. लहानपणीच वडिलांचे आकस्मित निधन झाल्याने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली.

त्याची आई घर चालवण्यासाठी इतरांच्या घरी जाऊन भांडी धुवायची आणि शिवायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, तो मुलगा नेहमी शांत बसायचा, नेहमी एकटाच राहायचा.एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला एक पत्र दिले, आणि म्हणाले – तू तुझ्या आईला दे. त्याची आई बाहेरून कामावरून आल्यावर मुलाने ते पत्र आईला दिले.त्याच्या आईने ते पत्र वाचले, ते पत्र वाचून तिला आनंद झाला. आईला हसताना बघून मुलाने आईला विचारले? आई, या पत्रात असे काय विशेष लिहिले आहे की ज्यामुळे तुला खूप आनंद होत आहे? आई हसून म्हणाली – बाळा! या पत्रात असे लिहिले आहे की तुमचा मुलगा वर्गात सर्वात हुशार आहे. त्याची बुद्धी इतर सर्व मुलापेक्षा तिष्ण्य आहे. तुमच्या मुलाला शिकवू शकेल असा कोणताही शिक्षक आमच्याकडे नाही. त्यामुळे तुमच्या मुलाच्या भल्यासाठी त्याचे दुसऱ्या चांगल्या शाळेत ऍडमिशन करा, म्हणजे त्याला आर्थिक चांगले शिक्षण घेता येईल. हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला, आणि त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वासही खूप वाढला. तो मनात विचार करू लागला की माझ्यात काहीतरी खास असावे, ज्याच्यामुळे मी इतका हुशार आणि तिष्ण्य बुद्धीचा मुलगा आहे. त्या आईने त्याला दुसऱ्या दिवशी दुसर्‍या मोठ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला.

मुलगा आता मन लावून अभ्यास करू लागला.पुढे जाऊन त्या मुलाने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिवील सर्विस ची परीक्षा पास केली, त्याची आई आता खूप म्हातारी झाली होती. एके दिवशी त्याच्या आईच्या आजारपणामुळे तिचा अचानक मृत्यू झाला.त्या मुलाचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते तो खूप रडला मग एके दिवशी अचानक त्याने आईची अलमारी उघडली आणि जणू काही त्याला आई समोर दिसू लागली. तेवढ्यात त्याची नजर एका पत्रावर पडली, हेच तेच पत्र होते जे त्या मुलाच्या शिक्षकांनी त्याच्या आईला द्यायला सांगितले होते.ते पत्र वाचून त्याला धक्का बसतो, तुम्हाला त्या पत्रात काय लिहिलं होतं हे माहिती आहे का?त्या पत्रात लिहिले होते की, तुमचा मुलगा अभ्यासात खूप कमजोर आहे हे कळविताना आम्हाला खूप वाईट वाटत आहे.तो खेळातही तितकासा चांगला नाही.

ज्या प्रमाणे तुमच्या मुलाचे वय वाढत आहे, त्या हिशोबाने त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही. त्याला नीट वाचता देखील येत नाही म्हणूनच आम्ही तुमच्या मुलाला या शाळेतून काढत आहोत. शक्य असेल तर दुसर्‍या कुठल्याही शाळेत प्रवेश घ्या, नाहीतर घरी ठेवून शिकवा, हे वाचून त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि त्याला त्याच्या आईचा खूप अभिमान वाटू लागला .

मित्रांनो ही कहाणी लहान होती, पण आपल्याला मोठी शिकवण देते, ज्या प्रमाणे त्या मुलाच्या आईने पत्र वाचून आपल्या मुलाची विचारसरणी बदलली, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमची विचारसरणी बदलू शकता. मित्रांनो आपण स्वतः बद्दल काय विचार करतो,ते आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे नेहमी काहीतरी चांगले सकारात्मक विचार करा. यामुळे तुमची विचारसरणी बदलेल, आणि तुमची विचारसरणी बदलली, तर तुमचे जीवन बदलेल..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!