
पैशाच्या मागे लागणाऱ्या मनुष्य बद्दल गरुड पुराणामध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे. आणि हे पण सांगितले गेले आहे, की अशा लोकांसोबत मृत्यूनंतर कशी घटना घडते. आणि त्यांना कोणत्या दुःखाचा सामना करावा लागतो, तर चला मित्रांनो जाणून घेऊया गरुड पुराणानुसार अशा लोकां सोबत काय घडते. गरुड पुराणांमधील प्रेतकल्प अध्यायामध्ये सांगितले गेले आहे,की कलियुगामध्ये जसे धन वाढत जाणार तसे मनुष्यामध्ये पैशाची लालसा वाढली जाणार, एक वेळ अशी येणार की पैशाच्या पुढे काही चालणार नाही.
मनुष्य देवाच्या भक्तीला पण विसरून जाणार, गरुड पुराणांमधील प्रेत कल्प अध्यायामध्ये देव विष्णू गरुड ला म्हणतो! श्रीगरुड श्रेष्ठ कलियुगामध्ये लोकांमधील वाढत्या प्रभावामुळे जो मनुष्य 100 रुपयाचे धनी असणार तो मनुष्य 1000 चा धनी बनण्याचा प्रयत्न करणार, आणि जो मनुष्य हजार रुपयाचा धनी असणार तो मनुष्य लाखो ची अपेक्षा करणार. एवढेच नाही तर करोडपती बनल्यानंतर पण मनुष्याचे मन शांत नाही होणार, मनुष्य श्रीमंत झाल्यानंतर पण तो हीच अपेक्षा ठेवणार की मी या जगात सर्वात श्रीमंत व्हावं, आणि मंग सर्वांत श्रीमंत माणूस बनला तर तो आधी राजकारणामध्ये जाणार नाहीतर पूर्ण पृथ्वीला आपल्या ताब्यात ठेवण्याची इच्छा ठेवणार.
आणि मनुष्य पृथ्वीचे अधिनायक बनल्यानंतर मग तो मनुष्य देव बनण्याची इच्छा ठेवणार, आणि शेवटी मनुष्य देव इंद्र बनण्याची इच्छा ठेवणार, अशीच मनुष्याची इच्छा कधीच शांत होणार नाही. कारण धन आणि वाईट प्रभावामुळे मनुष्य हे नाही समजू शकणार, की पैशाला तो आज सर्वात महत्त्वपूर्ण समजत आहे, पण प्रत्यक्षात तो जिवंत असला तरच त्याला सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकते.
पण पैसा मनुष्यासाठी खूप वाईट ठरणार आहेत. पुढे विष्णुदेव गरुड पक्षीला म्हणतो हे पक्षीराज कलियुगामध्ये मनुष्य जेवढा पैशाच्या मागे लागणार, तेवढेच त्याला दुःख भोगावे लागणार, जो मनुष्य वाईट कर्म करून जेवढे जास्त पैसे गोळा करतो , तो तेवढेच पापाचा धनी होतो, आणि मृत्यू नंतर अशा मनुष्यांना सरळ नर्क मध्ये शिक्षा भोगावी लागणार, आणि जो मनुष्य चांगले कर्म करून पैसा कमावतो, आणि तो आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींचा पण आदर करतो , त्याला स्वर्ग लोकांमध्ये फुलासारखी जागा दिली जाते, तर मित्रांनो या जीवनात जे सत्य च्या मार्गवर चालून धन कमवतो, त्याला कधीच जीवनात जेवणाची कमतरता भासत नाही.