जाणून घ्या कोणत्या ग्रहाचा कोणत्या रोगाशी संबंध आहे, आणि त्यापासून तुम्हांला कशी सुटका मिळेल.

ग्रहांची चाल, त्यांची शुभ-अशुभ स्थिती याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह बलवान असतील, तर त्या ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतात. याउलट जर ग्रह कमजोर असेल, तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या नकारात्मक परिणामांमध्ये ग्रहामुळे होणारे विविध रोग देखील समाविष्ट आहेत. ग्रह कमजोर असताना कोणते रोग होतात आणि त्या रोगांवर ज्योतिषशास्त्रानुसार मात कशी करता येईल हे आज आपण जाणून घेऊया..

सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे लोकांना डोळे आणि डोके संबंधी आजार होऊ लागतात. कुंडलीतील सूर्यदेवाला बलवान करण्यासाठी दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे.

चंद्राचा संबंध पाणी आणि मनाशी आहे. अशा स्थितीत कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर असेल तर व्यक्तीला कफ आणि मानसिक आजार होऊ लागतात. कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होण्यासाठी सोमवारी महादेवाची पूजा करावी.

मंगळ ग्रहचा संबंध रक्ताशी आहे. त्यामुळे कुंडलीत मंगळ अशुभ असेल, तेव्हा व्यक्तीला रक्ताशी संबंधित आजार जास्त होतात. मंगळ बलवान होण्यासाठी मंगळवारी हनुमानजींची पूजा करा आणि मंगळवारी व्रत करा.

बुध ग्रह त्वचेशी संबंधित आहे. जेव्हा बुध ग्रह कमजोर असतो तेव्हा माणसाला त्वचेशी संबंधित आजार होऊ लागतात. बुध ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी गायीला हिरवे गवत खायला द्यावे.

बृहस्पति स्थूलतेशी संबंधित आहे. कुंडलीत गुरू कमजोर असल्यामुळे व्यक्तीला लठ्ठपणा आणि पोटाशी संबंधित आजार होऊ लागतात. गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे.

शुक्र हा समृद्धी आणि धनसंपत्तीचा ग्रह आहे. अशुभ असेल तर माणसाला लैंगिक आजारांना सामोरे जावे लागते. शुक्र ग्रहाच्या बळासाठी शुक्रवारी मुलींना पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घालावी.

शनीच्या कमजोरीमुळे व्यक्तीला शारीरिक थकवा, दुखापत इत्यादीची भीती असते. शनीला बलवान बनवण्यासाठी शनिवारी शनिदेवाला मंदिरात तेल अर्पण करावे.

कुंडलीत राहू अशुभ असेल, तर व्यक्तीला वारंवार ताप येतो. जर तुम्ही राहुशी संबंधित व्यक्ती जसे कुष्ठरोगी, गरीब व्यक्ती, सफाई कामगार इत्यादींना अन्नदान देऊन प्रसन्न केले तर तुम्हाला राहुची कृपा नक्कीच मिळेल.

केतू….कमकुवत राहूमुळे माणसाला हाडांशी संबंधित आजार होऊ लागतात. केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ज्येष्ठांची सेवा करायला सुरुवात करावी. तसेच कुत्र्याला गोड भाकरी खायला द्यावी .

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!