
गुरुवार बृहस्पति देव आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. अनेक वेळा माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, ज्या सहजासहजी सुटत नाहीत. अशा परिस्थितीत यश मिळविण्यासाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस आहे. ज्योतिष शास्त्रानुसार लग्नाला उशीर, व्यवसायात यश किंवा पैशाशी संबंधित समस्यांसाठी गुरुवारी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.
भगवान विष्णूला जगाचा पालनकर्ता म्हणतात. त्यामुळे या दिवशी पूर्ण श्रद्धेने नारायण देवाची पूजा करावी, आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर जीवनातील या सर्व समस्या आणि संकटांवर मात करता येते. चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते आहे उपाय.. मित्रानो लग्न लवकर होण्यासाठी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत नियमितपणे करावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच विवाह शक्य होतो.
या दिवशी उपवास करणाऱ्यांनी पिवळे वस्त्र परिधान करावे, अशी मान्यता आहे. तसेच देवाला पिवळ्या वस्तू अर्पण करावे . या दिवशी फक्त पिवळ्या रंगाच्या वस्तूचेच सेवन कराव्यात, असे सांगितले जाते. बेसन लाडू, बेसनाची चपाती खाऊ शकता.
इतकेच नाही तर गुरुवारी व्रताची पूजा बृहस्पति देवाच्या 108 नावांचा उच्चारही करावा. असे म्हणतात की याने लग्नात येणारे सर्व अडथळे दूर होतात.
पैशाच्या समस्यांवर उपाय या दिवशी केस धुणे टाळावे अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच या दिवशी नखे कापू नयेत. असे केल्याने भगवान हरी क्रोधित होतात आणि घरात दारिद्र्य येते.
पदोन्नती मिळविण्याचे मार्ग जर तुम्हाला कोणत्याही कंपनीत खूप मेहनत करून देखील प्रमोशन मिळत नसेल, किंवा तुमची प्रमोशन खूप दिवसांपासून अडलेली असेल तर गुरुवारी गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करणे योग्य मानले जाते. पिवळ्या मिठाई, पिवळ्या मसूर किंवा पिवळ्या रंगाची फळे किंवा कपडे दान करू शकतात.
व्यवसाय वाढीसाठी टिप..व्यवसायात प्रगती करण्यासाठी काही सोपे उपाय केले जाऊ शकतात. यासाठी श्री हरी आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा. यासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करा. तसेच ऑफिसमध्ये फक्त पिवळे कपडे घाला.