बेड खाली कधीही ठेवू नका या वस्तू अन्यथा तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागेल..

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आपण बेड खाली कोणत्या कोणत्या कोणत्या वस्तू ठेवू नये व त्या वस्तू ठेवल्यास त्याचे आपल्या जीवणार व वास्तू वर कोणते परिणाम होतात. तसे पाहायला गेले तर आजकाल सर्वच लोकांनी बॉक्स टाइपचे बेड वापरताना दिसतात किंवा आपण सर्व लग्नांमध्ये पाहत असतो की तसेच बेड गिफ्ट म्हणून आपल्या मुलीच्या सासरी दिले जातात.

म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बेड दिसायला तर खूप छान दिसतात, याशिवाय या बेड मध्ये भरपूर सारे सामान देखील ठेवले जाते. परंतु वास्तू नुसार अशा काही वस्तू आहेत ज्या आपण कधीही बेडमध्ये किंवा त्या खाली ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो व परिणामी घरातील सदस्यांच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होतात.

व तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या बेडच्या खाली आणि आत ठेवणे टाळले पाहिजे. पहिली गोष्ट आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू.. जर तुम्ही देखील तुमच्या बेडखाली किंवा त्यामधील कप्प्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या असतील तर त्या आजच ताबडतोब बाहेर काढून ठेवा.

वास्तूशास्त्रानुसार यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तसेच याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. दुसरी गोष्ट आहे, कपड्यांची गाठोडी बरेच लोक फाटक्या कपड्यांचे गाठोडे बांधून ते बेडमध्ये ठेवतात. परंतु वास्तूशास्त्रानुसार असे करणे अशुभ आहे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, याशिवाय घरात ताणतणाव, आर्थिक समस्या निर्माण होऊ असू शकतात.

त्यामुळे शक्यतो असे कपड्यांचे गाठोडे बांधून बेडमध्ये ठेवू नये. तिसरी गोष्ट आहे, गंज लागलेले लोखंड.. काही घरांमध्ये किंवा गावाकडील लोक आपले शेतीतील काही लोखंडी वस्तू जी गंजलेली असते ती बेडखाली सारतात त्यांना आम्ही सांगू इच्छितो की असे गंजलेले लोखंड बेडखाली कधीही ठेवू नये. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

या सोबतच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चौथी गोष्ट आहे प्लास्टिकच्या गोष्टी.. बेडखाली किंवा बेडमध्ये प्लास्टिकच्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. यानंतरची गोष्ट आहे झाडू.. जर तुम्ही बेडखाली झाडू ठेवत असाल तर तुमची ही सवय आजच बदला कारण वास्तूशास्त्रानुसार याचा मानवी जीवनावर व मनुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

याशिवाय आरोग्य आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यानंतरची गोष्ट आहे चप्पल, तेल आणि काच.. काही ठिकाणी लोक बूट व चप्पल सहज सापडावीत म्हणून त्यांना बेडखाली ठेवतात. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की असे केल्याने त्या खोलीत आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. त्याच सोबत पलंगाखाली काच आणि तेल ठेवणे वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

त्यामुळे शक्यता या गोष्टी कधीही पलंगाखाली ठेवू नयेत. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व तुमच्या मनात श्री स्वामी समर्थ यांच्या विषयी श्रध्दा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!