
श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा एका झाडाबद्दल माहिती देणार आहोत हे झाड जर तुम्ही तुमच्या घरासमोर लावले तर तुमचे नशीब बदलून जाईल नेहमी घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील. घरातील कटकटी बंद होतील घरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होईल, तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहे ते झाड व त्याचे आपल्याला कोण कोणते फायदे होतात.
त्या झाडाचे नाव आहे “पारिजातक” या पारिजातकला हरसिंगार असेही म्हंटले जाते. तुमच्या पैकी बऱ्याच लोकांनी या झाडाच्या फुलांचा वापर केलाच असेल, परंतु या पारिजातकच्या गुणधर्मांबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. शक्यतो पारिजातक हे झाड वृक्ष बागांमध्ये आढळते, तसेच त्याची फुले अतिशय आकर्षक व मनमोहक असतात.
काही लोक पारिजातकच्या म्हणजे हरसिंगार फुलाचा वापर केवळ पूजेसाठी करतात. अनेक लोकांना माहिती नसेल पारिजातक व हरसिंगारचे फायदे एक-दोन नसून अनेक आहेत, तर चला याचे कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊ. वास्तुशास्त्रानुसार पारिजात ही वनस्पती लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे झाड घरासमोर लावल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात घरातील वास्तू चांगली बनते.
खास करून लक्ष्मीपूजनासाठी पारिजातक फुलांचा वापर केला जातो पंरतु त्यासाठी फक्त तीच फुले वापरली जातात जी स्वतःहुन झाडावरुन पडतात. हिंदू धर्मात ज्या ठिकाणी हे झाड असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. पारिजातक फुलांच्या सुगंधात तुमच्या आयुष्यातील ताणतणाव दूर होऊन मन आनंदाने भरून जाते व त्यामुळे शरीरात एक नवीन स्फुर्ती, ताकद निर्माण होते.
त्याचा सुगंध मन शांत करतो, कुटुंबात आनंदाचे वातावरण बनते ज्यामुळे व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. पारिजातकची ही अप्रतिम फुले फक्त रात्रीच उमलतात व पहाटे ती सर्व कोमेजून जातात. ज्यांच्या घरात किंवा घरासमोरील अंगणात ही फुले उमलतात, तिथे सदैव शांतता आणि समृद्धी वास करते. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की जिथे पारिजातकचे झाड असते, तिथे नकारात्मक शक्ती राहत नाहीत.
तर मित्रांनो आता या पारिजातक झाडाचे महत्व जाणून घ्यायचे झाले तर ते पुढील प्रमाणे आहे. सर्व प्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पारिजातक झाड दिसायला खूप सुंदर असते. पारिजातकच्या फुलाचा उपयोग भगवान हरिच्या सजावटीमध्ये आणि पूजेमध्ये केला जातो व म्हणूनच या झाडाच्या फुलाला हरसिंगार असे देखील म्हणतात.
हिंदू धर्मात या झाडाचे खूप महत्त्व आहे, एवढेच न्हवे तर शास्त्रात पारिजातकला कल्पवृक्ष असे ही म्हंटले जाते. असे म्हंटले जाते की स्वर्गामध्ये फक्त उर्वशी नावाच्या अप्सरेलाच या फुलांना स्पर्श करण्याचा अधिकार होता. पारिजातकला स्पर्श केल्याने माणसाचा थकवा निघून जातो पारिजातक झाडाची उंची १० ते २५ फूट पर्यंत असते.
या झाडाची एक खास गोष्ट म्हणजे या झाडाला भरपूर फुले लागतात. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल तुमच्या मनात श्रध्दा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.