काटकसर करून देखील पैसा राहत नसेल तर करा हे उपाय माता लक्ष्मी घरात भरभराट देईल..

श्री स्वामी समर्थ, आपल्या घरात पैसा टिकत नाही, आलेला पैसा नेहमी खर्च होत असेल, किंवा विनाकारण खर्च होत असेल तर यासाठी काही सोपे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायाने पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील. तर असा हा गुणकारी उपाय तुम्ही आज पासून करायला सुरुवात केली तर अतिउत्तम या उपायाने लक्ष्मी माता प्रसन्न होईल.

घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल, घरात समाधान वाटेल, सकारात्मक ऊर्जेने घरामध्ये प्रसन्नता येईल.. तसेच घरामध्ये लक्ष्मीचा वास निरंतर राहण्यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवावे. घरामध्ये किंवा घराबाहेर कचरा, कोष्टीचे जाळे, भंगार आशा कोणत्याही वस्तू नसाव्यात किंवा ठेवू नका.

घराबाहेर सकाळी सडा टाकून रांगोळी काढावी, तुळशीची पूजा करावी, औदुंबरची पूजा करावी, देवपूजा करावी आणि विशेष म्हणचे घरामध्ये घंटा वाजवावी. हे सर्व केल्याने घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते, तुळशी जवळ उत्तर दिशेला दिवा लावावा, घरातील स्वयंपाक होताच गॅस व किचनकट्टा पुसून स्वच्छ करावा.

प्रत्येक रूम झाडून पुसून स्वच्छ ठेवावी, जेवण झाल्यानंतर जेवायला बसलेली जागा त्वरित पुसावी व भांडी देखील लगेच धुवून ठेवावीत. धुणे देखील सकाळी लवकर धुवून ते वाळत घालावे, धुणे जास्त वेळ पडले तर ते द्वाड असते. तसेच घरात कोणीही उपाशी राहता कामा नये पत्येक व्यक्तीला जेवण बनवून वाढून घ्यावे.

किचन वरील भांडी, रॅक वरील भांडी महिन्यातून एकदा धुवून स्वच्छ ठेवावी, रॅकचा कागद बदलावा, उश्या, गादी, लहान मुलांची चादर उन्हात घालावी. महिन्यातून एकदा फॅन, कुलर स्वच्छ करावे, दरवाजे खिडक्या जाळ्या पुसून घ्यावीत. उदाहरणार्थ संपूर्ण घर स्वच्छ ठेवावे, मित्रांनो एक जुनी म्हण आहे हाथ फिरे तेथे लक्ष्मी वसे!.

म्हणून घरातील सर्व सदस्यांनी घरात स्वच्छता ठेवावी. जर घरात कुठेही कचरा किंवा घाण असेल तर तिथे नकारात्मकता निर्माण होते व याच कारणाने आपल्या घरात पैसा टिकत नाही. मित्रांनो एक गोष्ट तर स्पष्ट आहे घरात जर अस्वच्छता असेल तर आपले आरोग्य ठीक राहणार नाही म्हणून स्वच्छता ठेवावी.

असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहील तसेच घरात पैसा देखील टिकेल, व सोबतच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच इतरांना देखील ही माहिती शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!