तुमच्याही मनात वाईट विचार येत असतील? खूप टेन्शन असेल? तर हे १ काम करा..

मित्रांनो तुमच्याही मनात नेहमी वाईट विचार येत असतील. किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा एक काम करा, स्वामी समर्थ महाराज सर्व काही ठीक करते. मित्रांनो वाईट विचार आपल्या मनात केव्हा येतात, जेव्हा आपले काम पूर्ण होत नाही, किंवा आपल्याला कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट हवी असते.

ती वस्तू कोणती गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात, किंवा आपण कुठेतरी खूप प्रयत्न करतोय, पण तरी आपल्याला यश मिळत नाही, किंवा मेहनत करून सुद्धा फळ मिळत नाही. तर आपल्याला खूप जास्त टेन्शन सुद्धा येतात, आणि मनात वाईट विचार सुद्धा येतात, तर आपल्याला यासाठी आपल्या मनाला कंट्रोल करायचे आहे.

कारण टेन्शन असू द्या, किंवा वाईट विचार असू द्या, हे मनातूनच येत असतात, आणि स्वामी सेवेमध्ये याचा एक कारगर उपाय कारगर मार्ग सांगितला गेला आहे. मित्रानो जेव्हा तुम्हाला असे वाटेल, की तुमच्या मनात खूप वाईट विचार येत आहे, किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे, किंवा कोणत्यातरी गोष्टीची तुम्ही खूप जास्त चिंता करत आहात.

तेव्हा तुम्ही हा कारगर मार्ग निवडा ही गोष्ट करा हे काम करा, तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी स्वामींच्या समोर बसा मग तुम्ही केंद्रात जाऊन बसू शकतात, मठात जाऊन बसू शकतात. किंवा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल, तर त्याच्या समोर तुम्ही बसू शकतात.

आणि जर मूर्ती फोटो नसेल, तरी तुम्ही कोणत्याही एका शांत जागेवर बसा आणि डोळे बंद करा. आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा, कारण आपण ज्या श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे सेवेकरी असू तर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला स्वामी नक्की दिसतील. बाकीच्या लोकांना डोळे बंद केल्यानंतर अनेक दुसऱ्या गोष्टी दिसतात.

 

की मी कुठे फिरायला जातो, टीव्ही बघतो काय नाही असच वेगळ्या मनात गोष्टी सुरू असतात, परंतु त्या गोष्टी बंद करायचा आहेत. फक्त आपल्याला स्वामी समर्थांना बघायचा आहे, की स्वामी कसे दिसतात स्वामींचा फोटो कसा आहे स्वामींची मूर्ती कशी आहे, हे बघण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात.

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चा जप सुरू करा, हे तुम्हाला फक्त पाच मिनिट करायचा आहे, रोज पाच मिनिट तुम्ही कुठेही असाल. मठात केंद्रात घरी कुठेही स्वामींच्या समोर असाल किंवा नसाल तरी तुम्ही जिथे असाल तिथे शांत बसा, एका शांत जागेवर बसा सकाळी उठून बसा, रात्री उठून बसा कधीही बसा फक्त पाच मिनिट शांत बसा.

 

खुर्चीवर बसा कुठेही बसा पण डोळे बंद करा, आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चा जप सुरू करा. आणि स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा स्वामी कसे दिसतात, स्वामींचे डोळे कसे आहे स्वामींचे डोके कस आहेत. स्वामींचे गाल कसे आहे स्वामी कसे आहे, स्वामींचे हात कसे आहेत. हे सगळे बघण्याचा प्रयत्न करा, असे फक्त पाच मिनिट करा आणि रोज करा कंटिन्यू करा.

दिवसातून दोन वेळेस जमेल, दोन वेळेस करा पण रोज करा. काही दिवसातच तुमच्या मनातले वाईट विचार एकदमच नाहीसे होतील, आणि कधी येणार सुद्धा नाही वाईट विचार तुमच्या मनात तेव्हा स्वामी असतील, आणि टेन्शन चिंता तर अजिबात येणार नाही, सगळं काही नष्ट होईल, तुमच्या मनात फक्त स्वामी असतील.

टेन्शन वाईट विचार हे स्वामी महाराज तुमच्या मनात कधीच येऊ देणार नाही नक्की करून, बघा खूप कारगर मार्ग आहे. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!