मन विचलित राहत असेल, सारखी चिडचिड होत असेल तर करा हा १ तोडगा सगळे ठीक होईल..

मित्रांनो आपली सारखी चिडचिड होत असेल, मन विचलित राहत असेल, किंवा कोणत्याही कामात मन लागत नसेल तर तुम्ही सुद्धा एक तोडगा करा. तुमच्या सगळ्या समस्या अडचणी याने ठीक होतील, मित्रांनो बऱ्याच वेळेस आपली सारखी चिडचिड होते. आपण रागीट स्वभावाचे नसतो, आपण गरम डोक्याचे सुद्धा नसतो, तरी आपली प्रत्येक कारणावरून छोट्याछोट्या कारणांवरून आपण सगळ्या लोकांनी आपल्या लोकांवर जवळचा लोकांवर सुद्धा चिडचिड करत असतो.

चिडचिड करण्यामुळे मग कोणतेही काम व्यवस्थित होत नाही किंवा घरात कामा ठिकाणी आपले मन सारखे विचलित राहत असते काय करू काय नाही कळत नसते. किंवा आपली कोणत्याही कामात मन लागत नसते. तर हे सगळे का होते? तर हे सगळे होते, नकारात्मक ऊर्जा किंवा काही अन्य दोषांमुळे होते, तर यासाठी ते दोष दूर करावे लागतात.

ती नकारात्मक ऊर्जा दूर करावी लागते. तर यासाठी एक सोपा उपाय सोपा तोडगा आहे, हा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात, जर तुम्हाला हा तोडगा करायचा असेल, तर तुम्ही सोमवार ते शनिवार यामध्ये तुम्ही कधीही हा तोडगा करू शकतात, कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही करू शकता.

यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी मिठाची गरज आहे, काचेची वाटी स्टीलची वाटी कोणतीही वाटी घ्या, त्यामध्ये एक वाटी मीठ घ्या, मीठ आपण जे स्वयंपाकात वापरतो तेच वापरायचे मीठ घेतले तरी चालेल, आता ते मिठीत घेऊन तुम्हाला ते मीठ जर तुमचा बेडरूम असेल, बेड असेल तर त्या बेडरूममध्ये बेडखाली ते मीठ ठेवायचे आहे.

बेडरूम नसेल तर तुम्ही ते मीठ किचन मध्ये एका कोपऱ्यात ठेवायचे आहे, बेडरूममध्ये ठेवत असाल आणि किचन मध्ये ठेवत असाल तर ते मीठ कोणाला दिसणार नाही याची काळजी घ्यावी. चुकून दिसले तरी काय हरकत नाही पण सारखे कोणाला ते समोर दिसेल असं नको. ते कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्यायचे आणि कायमस्वरूपी ठेवायचे अस नाही.. की रोज बदलायचे असे नाही, महिने ना महिने तिथे राहू द्यायचे.

जर आपली चिडचिड बंद झाली, मन विचलित राहत नाहीये, मन लागतय कामात काम व्यवस्थित होत आहे, सगळे काही ठीक आहे तेव्हा तुम्ही ते मीठ काढून त्याला पाण्यात विसर्जन करू शकतात, तर असा हा तोडगा आहे. तुम्ही हा तोडगा करून बघा त्या मीठासोबत कारण मीठ असताना मीठ सगळी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती हा स्वतःमध्ये घेऊन येतो.

मग बऱ्याच गोष्टी आपल्या ठीक होतात, चिडचिड होणे बंद होते. मन विचलित राहत नाही मग प्रत्येक कामात मन लागते , तर नक्की तुम्ही हा तोडगा तुमच्या घरात करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!