पोर्णिमेला करा हे एक काम सर्व इच्छा पूर्ण होतील..

मित्रांनो यावर्षी ची पौष पौर्णिमा ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे, सोमवारी येणारी पौर्णिमा ही विशेष फलदायी ठरते, या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे, आणि चिमूटभर तांदूळ सुद्धा अर्पण करावे, मित्रांनो यामुळे आपल्या कुंडलीत चंद्र ग्रह हा मजबूत होतो, आणि त्याच बरोबर भगवान भोलेनाथ ही आपल्यावर प्रसन्न होतात.

आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, मित्रांनो पौर्णिमा तिथी श्री विष्णूआणि माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे, त्यामुळे या दिवशी धन प्राप्तीसाठी काही विशेष उपाय करावेत, यामुळे घरात धनधान्य आणि सुख-समृद्धीची वृद्धी होते, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी रूपाने वास करते, मित्रांनो अनेक लोकांची ही समस्या असते.

की आम्ही भरपूर धन कमवतो भरपूर पैसा कमवतो, पण आलेला पैसा घरात टिकत नाही, घरात बरकत राहत नाही,या ना त्या कारणाने, घरातून पैसे बाहेर जातो, घरात आजारपण आहे ,घरातील सदस्यांमध्ये सतत वाद विवाद होत असतील, तर मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी या पौर्णिमा तिथीस पौष पोर्णिमेस सायंकाळी.

श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायची आहे, श्रीविष्णूना पिवळे रंगाचे तर माता लक्ष्मीना लाल रंगाचे एक फूल अवश्य अर्पण करा, धूप दीप नैवेद्य दाखवा, मित्रांनो या वेळी गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की करावा, आता ही पूजा झाल्यानंतर आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे, पूर्व आणि उत्तर या दिशांमधील जो कोपरा येतो.

तो कोपरा त्या ईशान्य कोप-यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत, मित्रांनो यामुळे आपल्या घरात जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, ते दूर होते, आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर, यामुळे आपल्या सर्व कार्यांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात, हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही.

घरामध्ये अशांतता येते घरात सतत कोणी ना कोणी सदस्य आजारी असतो, घरातील आजारपण हटत नाही ,सर्व समस्या दूर करण्यासाठी या पौष पौर्णिमेस आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात असा गाईच्या तुपाचा एक दिवा नक्की प्रज्वलित करा, लक्षात ठेवा, मित्रांनो हा दिवा प्रज्वलित करण्याआधी त्या दिव्याखाली थोडेसे अक्षद किंवा फुलांच्या पाकळ्या अवश्य ठेवाव्यात.

दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये,आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद-कुंकू आणि अक्षद अर्पण करायचे आहे, आपल्या मनात जे काही इच्छा आहे,ते आपल्याला दिव्याजवळ बोलून दाखवायचे आहे,त्यानंतर आपल्या घरात जी तुळस आहे,जे तुळशी वृंदावन आहे,त्या समोर सुद्धा एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा, मित्रांनो तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे.

आणि ज्या घरात दररोज नित्य नेमाने तुळशी माते समोर दिवा लावला जातो, त्या घरात धनाची कमतरता कधीच भासत नाही, तर मित्रांनो सुख-समृद्धी धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी या पौष पौर्णिमेस या 3 ठिकाणी तीन दिवे नक्की प्रज्वलित करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!