मकर संक्रांती ते रथ सप्तमी या कालावधीत विवाहित महिलांनी करावे हे काम, स्वतः माता लक्ष्मी दर्शन देऊ शकते..

मित्रांनो मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी भरावी, आता ही ओटी का भरावी? तर मित्रांनो महिलांना माहीतच असेल की मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात पण या सोबतच काही महिला हे विवाहित महिलांच्या ओट्या सुद्धा भरतात.

व त्या सोबत अशी परंपरा आहे, अशी मान्यता आहे की या महिन्यात म्हणजे १४ जानेवारी पासून ते 29 जानेवारी पर्यंत जर विवाहित महिलेने आपल्या आईची ओटी भरली तर सुख स्वभाग्याची प्राप्ती होते. आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही, आईचे व मुलीचे प्रेम कायम राहते, त्यांच्यावर कोणतीही अडचण येत नाही, त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहते.

म्हणून तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि ओटी सुद्धा भरली जाते. म्हणून या महिन्यात म्हणजेच मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत तुम्हीही तुमच्या आईची ओटी नक्की भरा. आणि भरपूर महिला अश्या आहेत की त्यांची आई हयात नाही त्यांची आई वारली आहे तर अशा महिलांनी तुम्ही तुमच्या कुलदेवीची घरीच ओटी भरू शकता.

किंवा कुलदेवी नसेल तर घरात जी कोणती देवी असेल, ज्या देवीची मूर्ती किंवा फोटो असेल, लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, दुर्गा असेल, जी कोणती देवी असेल, कोणतेही देवी असेल, तर त्या देवीची ओटी तुम्ही भरू शकतात,ओटी भरण्याची सोपी पद्धत आहे, ओटी साठी तुम्ही नवीन साडी आणू शकता,किंवा एखाद ब्लाउज पीस आणू शकता.

साडी देऊनही ओटी भरता येते, ब्लाउज पीस देऊनही ओटी भरता येते,त्या ओटीसाठी एक नारळ सुद्धा लागतो,त्यासोबत 11,21रुपये दक्षिणा सुद्धा लागतात, त्यानंतर गहू किंवा तांदूळ देऊन तुम्ही ओटी भरू शकतात,आणि ओटीचे सामान जर देवींची ओटी तुम्ही भरत असाल, तर ओटीचे जे ही सामान आहे,नारळ साडी ब्लाउज पीस किंवा गहू तांदूळ ते सगळं.

ज्या महिलेने ओटी भरली असेल, तिने ठेवावे,आणि तांदूळ आणि गहू आपल्या धान्यांमध्ये मिक्स करावे बरकत म्हणून आणि आईला दिलेली ओटी आईने ठेवावी,तर या प्रकारे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही आईची ओटी नक्की भरा, आणि आई नसेल, तर देवीची ओटी तरी भरा, कारण देवीच आपली आई असते.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!