या लढाईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे कोल्हापूर आणि सातारा दोन तुकडे झाले?

१७०७ साली मराठ्यांच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटना घडल्या, पहिली आणि मराठ्यांच्या अभिमानाची घटना म्हणजे २० फेब्रुवारी १७०७ मध्ये महाराष्ट्राच्याच मातीत औरंगजेबाचा झालेला मृत्यू, आपली आयुष्याची २६ वर्षे औरंगजेबाने जे स्वराज्य बुडावण्याचा प्रयत्न केला. ते स्वराज्य संपणे तर दूरच पण ते प्रचंड मोठ्या सामर्थ्याने त्याच्याच डोळ्यांसमोर उभे राहिले. मराठ्यांचा छावा आणि गनिमीकावा यापुढे हतबल झालेल्या आपल्या बापाला महाराष्ट्रातच पुरुन मुघल सैन्य दिल्लीला पळाले छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराजांनी मुघलांचे जगणे मुश्किल केले..

मराठे काय चीज आहेत ते मुघलांना समजले, महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबवर शेवटचा वार केला आणि औरंगजेब याच मातीत मिसळून गेला ते वर्ष होत १७०७ आणि त्याच १७०७ या वर्षात छत्रपती शिवरायांची सून महाराणी ताराबाई आणि त्यांचाच नातू छत्रपती शाहू एकमेकांच्या विरोधात रणांगणात उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य मावळ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून उभे केलेल्या या स्वराज्याचे दोन तुकडे झाले. सत्तेच्या या खेळात स्वराज्य जे विभागले ते कधीच जुळले नाही, तर आज पाहुयात भीमा नदीच्या काठावर खेड कडुजवळ झालेले.

ते युद्ध आणि त्याचे स्वराज्यावर झालेले परिणाम…! आणि हे ही पाहू की हे युद्ध टाळता येऊ शकले असते का..? औरंगजेबच्या मृत्यू नंतर औरंगजेबची मुले सत्ता स्पर्धेसाठी दिल्लीकडे निघाली, १४ मार्च १७०७ रोजी ईद च्या दिवशी औरंगजेबचा मुलगा आदिलशहा याने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले त्याचा वजीर झुल्फिकारखानने आजमशाला एक सल्ला दिला की संभाजी राजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे. त्याला सोडून द्यावे म्हणजे मराठ्यांच्यात डुकली माजेल मराठ्यांशी लढणे आता मुघलांना परवडणार नाही. शाहू राजा झाला तर मराठ्यांच्या आघाडीवर.

कायमची शांतता देखील लाभेल आणि पुढे घडले ही तसेच ! छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मना मनाचे राजे होते, त्यांचं बलिदान महाराष्ट्र विसरला न्हवता. १७०७ सालचे कित्तेक सरदार १६८९ पर्यंत संभाजी राज्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते म्हणून संभाजी महाराजांचा मुलगा मुघलांच्या कैदेतून सुटताच अनेक सरदार त्याच्या बाजूने उभे राहिले. भुरामपूर येथे आजमशाने शाहूंची सुटका केली व त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. इथूनच त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहली की मीच स्वराज्याचा खरा वारसदार आहे त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे..

व अनेक सरदार शाहूंना येऊन मिळाले या उलट ताराबाईंनी जाहीर केले की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपले, राजाराम महाराजांनी हे राज्य निर्माण केले त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारस आहे. ताराबाईंची बाजू भक्कम होती, सेनापती धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य खंडो बल्लाळ, शंकराजी नारायण, खंडेराव दाभाडे असे नामांकित सरदार त्यांच्या बाजूला होते. पण अभाव होता विश्वासाचा त्यांच्याच कित्तेक सरदारांनी त्यांचे संबंध ताणलेले होते, शाहूंशी संधान साधल्यास मुलाहिजा होणार.

नाही अशा तंबीची पत्रे ताराबाईंनी आपल्या सरदारांना पाठवली होती. त्यांनी आपल्या सरदारांना भर दरबारात दुधभाताच्या तटावर हात ठेवून आपण ताराबाई पुत्र शिवाजी राजांशी इमान राखू अशा आणाभाका घ्यायला लावल्या होत्या..! आणि कित्येक सरदारांनी त्या घेतल्या देखील होत्या, ताराबाई जिद्दी होत्या पण हट्टी आणि हेकेखोर देखील होत्या, त्याचवेळी शाहू मात्र शांत आणि संयमी व नम्र होते. त्यामुळे ताराबाईंनपेक्षा शाहूंकडे काम करणे अनेकांना सोपे वाटत होते. ऑक्टोबर १७०७ मध्ये शाहूराजे पुण्याजवळच्या खेड येथे भीमा नदीच्या काठावर छावणी करून राहिले.

त्यांच्याशी लढाईला सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य भिमानदीच्या अलीकडील तीरावर थांबले. खर तर ही एक असमतोल लढाई होती, ताराबाईंच्या फौजेसमोर शाहूंच्या सैन्याचा टिकाव लागणे अवघड होते. पण ११ ऑक्टोबर १७०७ च्या रात्री काही आशा गोष्टी घडल्या ज्यामुळे इतिहास पूर्णपणे बदलून गेला, आणि त्या घडामोडी घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ ! त्या काळोख्या रात्री सेनापती धनाजी जाधवांच्या राउटीत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश घेऊन आले. खंडो बल्लाळ, आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली.

चर्चे अंती शाहूराजे हेच स्वराज्याचे खरे वारस असून स्वराज्यावर त्यांचाच आहे ही गोष्ट बाळजीनी घनाजीना पटवून दिली. त्या गोष्टीची गुप्तता इतकी पाळली गेली की, धनाजी जाधवांच्या शेजारच्या राउटीत असणाऱ्या खंडेराव दाभाड्याना किंवा परशुराम प्रतिनिधींना याची खबर देखील लागली नाही. दुसऱ्या दिवशी १२ ऑक्टोबर १७०७ रोजी लढाईला तोंड फुटले ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधवांनी ऐन युद्ध रंगात आलेल असताना आपली बाजू बदलली आणि ताराबाईंच्या फौजेची दाणादाण उडवली, सेनापती धनाजी जाधवांनी ऐनयुद्धात मारलेली पलटी पाहून ताराबाईंची सैन्य.

अचंबित झाले काय घडत आहे हे त्यांना कळायच्या आत एकच शिरकाण सुरू झाल आणि पाळण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग ताराबाईंच्या सैन्याला राहिला नाही. खंडेराव दभाड्याना शाहूंच्या सैन्यानी कैद केले तर परशुराम प्रतिनधी पळून गेले. चिटणीस या लढाईचे वर्णन करताना म्हणतो महाराज लढाई सिद्ध झाले, धनाजी जाधव व प्रतिनिधी चाल करून आले, परसोजी भोसले वर चिमणाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली. महाराजांनी चालवून घेतले प्रतिनिधी पळून गेले, त्यांचे दहा पाच हजार स्वार सापडले सेनापतींनी आपले विचारातील लोकांस घेऊन घोड्यावरून.

उतरून मुजरे केले महाराजांनी खेड मैदानी मुक्काम केला लोकांनी कामे केली म्हणून त्यांना बहुमान बक्षीस दिले. दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी झाल्या धनाजी याना सेनापतीपद दिले तर खंडो बल्लाळ यांनाही चितनिशी दिली. ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता आणि या पराभवाला कारण असणारे धनाजी जाधव दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सरसेनापती झाले. शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन शिरवळ जवळून रोहिड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला, रोहिड्याच्या किल्ल्यावर असणाऱ्या ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायणाना आपण शाहूंना विरोध केल्याचा.

पश्चाताप झाला. आणि त्याच वेळी ताराबाईंना दगा देता येत न्हवता म्हणून त्यांनी आ त्म-ह त्या केली, त्यांच्या ताब्यातील रोहिडा, सिंहगड, राजगड, तोरणा, देखील शाहूंच्या ताब्यात आले, परशुराम प्रतिनिधी सताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते पण किल्लेदार शेख मीरा याला शाहू प्रतिनिधींना कैद केले आणि १ जानेवारी १७०८ रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला. १२ जानेवारी १७०८ राजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. आणि सातारा ही छत्रपती शाहू यांची राजधानी झाली, शाहूंनी आता पन्हाळा, कोल्हापूर वर देखील चाल केली आणि दक्षिणेकडचा प्रदेश.

देखील ताब्यात घेतला. ताराबाईंना कोकणात मालवण पर्यंत माघार घ्यावी लागली शाहूंच्या सरदारांची धरसोड वृत्ती आणि वेगवेगळ्या मतमतांतरेमुळे शाहूंनी मग पुन्हा सताऱ्यापर्यंत माघार घेतली. शाहूंनी माघार घेतलेली पाहताच ताराबाईंनी पन्हाळा, विशाळगड आणि कोल्हापूर पुन्हा ताब्यात जिंकून घेतले त्यानंतर मात्र शाहू आणि ताराराणी यांनी एकमेकांवरचे हल्ले थांबवले ताराबाईंनी मग कोल्हापूरलाच आपली राजधानी बनवली कोणत्याही कराराशिवाय जैसेथे परिस्थिती स्वीकारली व पुढे १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत तशीच राहिली. त्यामुळे शिव छत्रपतींचे स्वराज्य.

मात्र कोल्हापूर आणि सातारा अशा दोन राज्यांत कायमचे विभागले गेले. हे टाळता येणे शक्य होते का तर इतिहासात जर आणि तर ला काहीच स्थान नसते…! कारण जे घडायचे ते घडून गेलेलं असत, पण पुढे वारणेच्या तहानंतर १७३१ साली ताराबाईंनी शाहूंनी कोल्हापूर कारांच्या नजर कैदेतून सोडवून साताऱ्याला आणले ही गोष्ट दोघांच्या ही एकमेकांच्यात असणाऱ्या स्नेहभावाचे दर्शन घडवते. म्हणून हा प्रश्न रास्त वाटायला लागतो ताराराईंनी आपला हट्टीपणा आणि शाहूंनी आपला उतावळेपणा थोडा टाळता असता तर ताराबाईंच्या जिद्दी निग्रही आणि शिस्तप्रियतेचा शाहूंच्या नम्रता.

आणि प्रेमळ स्वभावाशी संगम होऊन छत्रपतींचे राज्य पुढे अनेक वर्षे टिकले देखील असते कारण या लढाईमध्ये छत्रपती घराणे कायमचे कमकुवत झाले. त्यामुळे कोल्हापूरचे आक्रसत गेले तर सातारचे राज्य पुढे पेशव्यांच्या हाती गेले. आणि नंतरच्या काळातील छत्रपती तर पेशव्यांच्या हाताचे अक्षरशः बाहुले बनले इतपत नुकसान या एका लढाईने केले. या लढाईत ताराबाईंची बाजू बाजू बरोबर की शाहूंची हे ज्याचे त्याने ठरवावे, पण दोघांनाही दूषण देऊ नयेत कारण ताराराणी आणि शाहूराजे या दोघांचेही मराठ्यांच्या स्वराज्यातील स्थान हे अमूल्य आहे. मित्रांनो तुम्हाला.

ही नाहीती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व हे देखील सांगा की पुढील कोणती माहिती तुम्हाला वाचायला आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!