भाग्यवान महिलांच्या या ठिकाणी असते तीळ, महालक्ष्मीची असते कृपा..!

प्रत्येकाच्या शरीरावर कोठे ना कोठे तीळ असतोच, तीळ जर चेहऱ्यावर असेल तर आपले सौंदर्य खुलून दिसते, व शरीराच्या ठराविक भागांवर सलेले तीळ त्या व्यक्तीला भाग्यवान बनवत असते तर चला जाणून घेऊ कोणत्या जागेवर तीळ असलेली व्यक्ती सर्वात जास्त भाग्यवान असते. तीळामुळे आपल्याला आपली भविष्यकालीन रहस्य समजतात, जर तुमच्या देखील या लकी स्थानी तीळ असेल तर तुम्ही धनावानच बनणार नाही तर तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल.

पुरुषांसाठी उजव्या अंगाला असलेले तीळ शुभ फळ देते तर स्त्रियांच्या डाव्या अंगाला असलेले तीळ शुभ फळ देते, कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर १२ पेक्षा जास्त तीळ असणे अशुभ असते. हे तीळ तुमचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर भविष्यात येणाऱ्या घटनांचे देखील सूचक असतात. तर आज आम्ही तुम्हाला तीळ कोणत्या ठिकाणी असणे शुभ असते व कोणत्या ठिकाणी असणे अशुभ असते या विषयी विशेष माहिती सांगणार आहोत. “कपाळावर तीळ असणे”.

जर तुमच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली व्यक्ती आहात, आणि तुमच्या हातात पैसा नेहमी खेळता राहील. परंतु जर तुमच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर अशा व्यक्तींचे जीवन निराशेने भरलेले असते, अशी व्यक्ती वायफळ खर्च खूप करते व त्यांच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही. “भुवयांवर तीळ असणे,” जर तुमच्या दोन्ही भुवयांवर तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही नेहमी यात्रा करता. नेहमी कोठे ना कोठे.

फिरायला जाता, व तुम्हाला यात्रा करणे खूप आवडते जर तुमच्या उजव्या भुवयीवर तीळ असेल तर याचा अर्थ तुमचे सर्वांशी खूप चांगले संबंध आहेत, परंतु जर तुमच्या डाव्या भुवयीवर तीळ असेल तर याचा अर्थ तुमचे संबंध कोणा बरोबरही चांगले नाहीत. “डोळ्यांच्या मध्ये तीळ असणे”, जर तुमच्या डोळ्यांच्या मध्ये तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप भावनिक व्यक्ती आहात, जर तुमच्या उजव्या डोळ्यात तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही उच्चविचाराचे.

व्यक्ती आहात, तुमचे विचार सर्वांसाठी खूप चांगले व आदर्श आहेत. परंतु जर तुमच्या डाव्या डोळ्यात तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही खूप निगेटिव्ह विचार सरणीचे व्यक्ती आहात. प्रत्येक गोष्टीत तुम्ही नाही नाही म्हणता, आणि नेहमी नाकारात्मकच विचार करता. “कानावर तीळ असणे”, धर्म शास्त्रानुसार ज्यांच्या कानावर तीळ असते अशी व्यक्ती अल्पायु म्हणजे खूप कमी जीवन असलेली व्यक्ती असते. “ओठांवर तीळ असणे” ज्यांचा ओठाच्या वरच्या.

भागावर तीळ असते आशा व्यक्ती खूप दयाळू व प्रेमळ असतात. ते सर्वांवर प्रेम करतात व इतरांना मदतही करतात परंतु ज्यांच्या ओठाच्या खालच्या भागावर तीळ असते आशा व्यक्ती खूप दरिद्री असतात त्यांचे उत्पन्न खूपच कमी असते. “गालावर तीळ असणे”, जर गालावर लाल रंगाचा तीळ असेल तर तो खूपच शुभ समजला जातो. जर व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल त ती व्यक्ती धनवान असल्याचे संकेत आहेत, परंतु जर डाव्या गालावर.

तीळ असेल तर ती व्यक्ती गरीब असल्याचे लक्षण आहेत. “तळ हातावर तीळ असणे”, जर तुमच्या उजव्या तळ हातावर तीळ असेल तर तुम्ही खूपच श्रीमंत आणि धनवान व्यक्ती आहात. परंतु जर तुमच्या डाव्या तळ हातावर तीळ असेल तर तुम्ही खूपच खर्चिक व्यक्ती आहात. “छातीवर तीळ असणे”, एखाद्या व्यक्तीच्या छातीवर तीळ असणे खूपच लाभदायक असते जर तुमच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ती व्यक्ती खूपच भाग्यशाली असते..

छातीच्या मध्ये असणारे तीळ देखील शुभ समजले जाते, या व्यक्ती त्यांच्या जीवनात नेहमी सुखी व समाधानी असतात. “कंबरेवर तीळ असणे”, ज्या व्यक्तींच्या कंबरेवर तीळ असते आशा व्यक्तीचे जीवन नेहमी अडचणीत व संकटांनी भरलेले असते. त्यांना जीवनात नेहमी संकटंचाच सामना करावा लागतो. “पायावर तीळ असणे”, ज्या व्यक्तीच्या पायावर तीळ असते ती व्यक्ती निर्णय क्षमतेत कमी असते. आशा व्यक्ती कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.

व आपल्या निर्णयावर आशा व्यक्ती ठामही राहत नाहीत. सारखे निर्णय बदलत असतात, ज्यांच्या पायावर तीळ असते आशा व्यक्तींना फिरण्याची फार आवड असते. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला संपूर्ण शरीरावरील तिळाचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात हे सांगितले व ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!