या सर्व राशीच्या लोकांना आहे आज सुवर्ण संधी, रातोरात बनाल करोडपती..

मित्रांनो १४ डिसेंबर मंगळवार या दिवशी २०२१ मधील अंतिम एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी आलेली आहे. हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्व आहे, वर्षभरात ऐकून २४ एकादशी येतात अधिक मास आल्यास त्यात अजून दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते.

मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्य साधारण महत्व असत. मित्रांनो मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, आणि म्हणूनच काही ठिकाणी या एकादशीला वैकुंठ एकादशी असे सुद्धा म्हंटल जात. नर देहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. पद्मपुराणामध्ये भगवान.

श्री कृष्ण यांनी युद्दिष्टराला सांगितले मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी वंजारी, धूप, दीप अर्पण करून मनभावे पूजा केल्यास सर्व पाप पातकांचा नाश होतो. पातक नष्ट झाल्याने आपोआप सुख मोक्षाचा द्वार उघडले जाते. तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पश्चात केवळ आपल्यालाच न्हवे तर आपल्या पितरांच्या.

आत्म्याला सदगती मिळते. मित्रांनो ही एकादशी कामभिमु प्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. मित्रांनो ही एकादशी इतर एकादशीपेक्षा वेगळी आणि विशेष ठरलेली आहे याचे दोन करणे आहेत. त्यातील पाहिले कारण म्हणजे मार्गशीर्ष मास हा माझा महिना आहे असे भागवंतांनी सांगितले आहे. आणि दुसरे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात या एकादशीला.

भगवंतांनी गीता गायली होती. त्यामुळे हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी गीतेमधील कोणतेही एकादा अध्याय पठण किंवा श्रवण अवश्य करावे. आता पाहूया आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा नाश करण्यासाठी या मोक्षदा एकादशीला आपण कोणते छोटे छोटे उपाय करू शकतो..

एकादशी व्रत हे श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी श्री विष्णूची विशेष पूजा करावी त्यांना पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी. पिवळा रंग हा श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहात तेव्हा त्या नैवेद्यावर दोन तीन पुळशीपत्राचा वापर अवश्य करा..

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका. एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावीत जर आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडलेली नसतील तर या पूर्वी जी तुळशीपत्र तुम्ही वापरली आहेत तीच तुळशीपत्र स्वच्छ धुवून तुम्ही श्री विष्णूंना अर्पण करू शकता. मित्रांनो तुळशीपत्र ही कधीही.

शिळी होत नाहीत याशिवाय तुळशिखाली पडलेली जी तुळशीपत्र असतात ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. तुळशीपत्र सुखलेली असतील तरीसुद्धा चालतील फक्त त्यावर आपला पाय पडलेला असू नये. या तुळशीपत्राचा वापर तुम्ही नैवेद्यावर ठेवण्यासाठी करू शकता. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रात असे सांगितले आहे की जी व्यक्ती.

या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजा करते, एकादशीचे व्रत करते, त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा लगोलग पूर्ण होतात. त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उरत नाही. श्री विष्णू सोबत माता लक्ष्मी देखील त्या व्यक्तीवर प्रसन्न होते, शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या रंगाची वस्तू गरजू लोकांना दान कराव्यात.

पिवळ्या रंगाची वस्त्र असतील, पिवळ्या रंगाची मिठाई असेल ती तुम्ही दान करू शकता. या दिवशी केलेल्या दानाने शुभ दिवसांची प्राप्ती होते. मित्रांनो श्री विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची देखील विशेष पूजा करावी. संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर.

गाईच्या तुपाचा एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा.. त्याच बरीबर दिवसभर ओम नमो भगवते वसुदेवाय या श्री विष्णूच्या महामंत्राचा जप करायचा आहे. एकादशीच्या अशा छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही श्री विष्णूची कृपा प्राप्त करू शकता ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल.

तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!