१८ डिसेंबरला संकल्प करून हातात बांधा लाल दोरा स्वामींकडे मागाल ते मिळेल..

मित्रांनो 18 डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे, या दिवशी स्वामींसमोर संकल्प करून तुम्ही हातात बांधा, असा एक लाल दोरा स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील, तुमच्या पाठीशी राहतील, आणि प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणींमधून तुमचे रक्षण करतील, मित्रांनो 18 डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे, आणि दत्तजयंती म्हणजे स्वामींच्या दिवस त्या आधीचे जेवढे दिवस येणारे असतात.

ते दिवस सुद्धा अति महत्त्वाचे असतात, परंतु मित्रांनो 18 डिसेंबर चा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत मोठा दिवस मानला जातो, खास करून स्वामी सेवेकरांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी तर मित्रांनो तुम्हीही 18 डिसेंबर च्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड धून स्वामींच्या मूर्ती समोर किंवा स्वामींचा फोटो समोर म्हणजे देवघरासमोर बसा, आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक लाल दोरा आणायचा आहे.

तो लाल दोरा पूजेचा दोरा असतो,जो सत्यनारायण मध्ये वापरला जातो, किंवा कोणत्याही पूजा असते, त्यामध्ये वापरला जातो. हा दोरा आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल,लाल असेल किंवा रंगीबिरंगी असेल. पिवळा लाल नारंगी अशा प्रकारचा ही असेल, किंवा फक्त लाल सुद्धा असेल, तो दोरा थोडा पाच दहा रुपयाचा तुम्हाला आणायचा आहे, तो दोरा आणल्यानंतर 18 डिसेंबरला सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसायचा.

आणि तो दोरा स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे, दोरा ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा,आणि सगळ्यात आधी आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचे, पाणी घेतल्यानंतर, तुमची जी ही इच्छा आहे, ती बोलायची जी ही अडचण आहे, ते बोलायचे त्यानंतर स्वामींना हातात पाणी घेऊन प्रार्थना करायची, हे स्वामी समर्थ महाराज आम्हाला या दुःखातून संकटातून अडचणी मधून बाहेर काढा.

आणि आमची इच्छा पूर्ण करा, आमच्यावर तुमची कृपा करा, एवढे सगळे बोलून झाल्यानंतर ते पाणी एका ताटलीत किंवा ताटात सोडायचे आहे, ते सोडल्यानंतर तुम्ही जो दोरा ठेवलेला आहे. तो दोऱ्याचे तुम्हाला अष्टगंध त्यानंतर तांदूळ म्हणजेच अक्षता आणि फुले वाहून पुजा करायची आहेत. आणि त्यानंतर तो जो दोरा आहे, तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातात बांधायचे आहे म्हणजे पुरुष असतील. त्या पुरुषांनी उजव्या हातात बांधायचे, आणि महिला असतील,तर महिलांनी तो दोरा आपल्या डाव्या हातात बांधायचे आहे.

मित्रांनो ज्या व्यक्तीने हा उपाय केला, ज्या व्यक्तीने स्वामीं समोर बसून, तो संकल्प सोडला त्याच व्यक्तीने हा दोरा बांधायचे आहे, घरातल्या सगळ्यांनी नाही बांधला तरी चालतो, पण घरातल्या मुख्य महिलेने आणि मुख्य पुरुषाने कमावणाऱ्या महिलेने अवश्य हा दोरा बांधायचे आहे, हा संकल्प सोडून आणि संकल्पाचे पाणी नंतर तुम्ही तुळशी मध्ये टाकायचे आहेत, अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे, आणि दोरा जो आपण हातात बांधू तो कायमस्वरूपी ठेवा.

पुढच्या श्री दत्तजयंती पर्यंत पुढची जी दत्तजयंती तो दोरा सोडून, तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकता, किंवा वाहत्या पाण्यात त्या दोऱ्याचे विसर्जन करू शकतात, आणि याच पद्धतीने नवीन दोरा आपल्या हातात बांधू शकतात, आणि भरपूर लोकांचे प्रश्न असतात. की दोरा बांधल्यानंतर आणि नॉनव्हेज खाऊ शकतो,की नाही खाऊ शकत. दोरा बांधल्यानंतर आपण गुरु करण्याचा हा दोरा नसतो. हा फक्त संकल्प सोडलेल्याचा दोरा असतो, गुरु केल्याने आणि दोरा बांधल्याने, तेव्हा आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही.

पण आपण हा दोरा गुरु कल्याचा नाही, फक्त संकल्पाचा आहेत, ज्यांची इच्छा असेल,ते आपल्या परीने करू शकतात,त्यांना नाही खायचे,ते नाही खाऊ शकत, ज्यांना खायचे ते खाऊ शकता , असे काही नियम नाही ,की दोरा बांधल्यानंतर खायचे नाही, हे आपल्यावर आहे. तर नक्की हा दोरा 18 डिसेंबर ला तुम्हाला बांधायचा आहे. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप;- वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!