तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करताय तर लक्ष्मी ला दाखवा हा नैवेद्य, नाहीतर माता लक्ष्मी तुमच्यावर..

मित्रानो मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मीसाठी हा नैवेद्य करा, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरु झालेला आहे, आणि मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारचे अधिक जास्त महत्त्व असते. प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात चार किंवा पाच गुरुवार येत असतात, आणि त्या गुरूवारच्या दिवशी महिला खासकरून विवाहित महिला व्रत करतात.

उपवास करतात, शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. तर मित्रांनो गुरूवारच्या दिवशी महालक्ष्मी चे विशेष महत्त्व असते, महालक्ष्मीचे पूजन केले जाते. तर या दिवशी जर तुमचे व्रत असेल, व्रत नसेल, तुम्ही पूजा करत असाल, किंवा करत नसाल तरीही तुम्ही लक्ष्मीसाठी महालक्ष्मी साठी तुमच्या घरात तुमच्या हाताने हा नैवेद्य अवश्य करावा. आणि संध्याकाळच्या वेळेस सात आठ वाजेच्या दरम्यान देव पूजा करतो.

त्यावेळेस तुम्ही आणि नैवेद्य माते समोर ठेवायचा आहे, तुमच्या देवघरात मित्रांनो हा नैवेद्य घरातच स्वतः करायचा, आता नैवेद्य कोणता आहे?, तर मित्रांनो मातेला एकच पदार्थ खूप जास्त आवडतो, तो म्हणजे दुधाने केलेली खीर मित्रांनो साबुदाण्याचे असेल, ती तांदुळाची असेल कोणतीही खीर फक्त दुधाने केलेली खीर तुम्हाला करायची आहे.आता भरपूर लोकांना खीर सुद्धा परवडत नाही. किंवा ते खीर सुद्धा करू शकत नाही.

तर अशा लोकांनी फक्त थोडे वाटी दूध घ्यायचे, आणि चिमूटभर साखर टाकून ते गोड दूध मातेला गुरूवारच्या दिवशी संध्याकाळी दाखवायचे, पण ज्यांना खीर करायला जमत असेल, खीर करू शकत असतील, त्यांनी खिरीचा नैवेद्य मातेला दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस अवश्य दाखवावा.

तर मित्रांनो तुम्ही ही मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मी माते साठी महालक्ष्मी साठी खिरीचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य अवश्य करा. माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तुमच्या घरात वास करेल. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका..! टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!