
मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते,मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्राला पारंभ होतो,या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 5 डिसेंबर रविवार या दिवसापासून मल्हारी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठी पर्यंत सहा दिवसांचे नवरात्र असते.
आणि यालाच खंडोबाचे नवरात्र असे म्हटले जाते, मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले,आणि या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो, या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खंडेरायाच्या घटाची स्थापना केली जाते,आणि सहा दिवस खंडेरायाची भक्त मनोभावे पूजा करतात.
खंडेरायाला प्रिय असणाऱ्या भळीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो, मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्रजपाचे खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे, जर आपण एखाद्या मंत्राचा मनोभावे जप केला,तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, मित्रांनो आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर खंडेरायाची अखंड कृपा राहावी.
आपल्या मनातील सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात, यासाठी या सहा दिवसांमध्ये एक प्रभावी मंत्र आपल्याला करायचे आहे,मित्रांनो हा खंडेराया चे मंत्र आहे या मंत्राचा जप जर आपण या सहा दिवसांमध्ये दररोज केला, तर यामुळे खंडेरायाची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर नक्की होईल, मित्रांनो हा मंत्र अनुभवसिद्ध अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारा आहे.
“ओम श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमः “मित्रांनो सकाळी आंघोळ केल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे, जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता, जप करण्यापूर्वी हात पाय तोंड धुवुन स्वच्छ व्हायचे आहे,आणि हा मंत्रजप करायचा आहे, एकवीस वेळा 108 वेळा किंवा शक्य तितक्या जास्त वेळा हा मंत्रजप तुम्ही करू शकता.
मित्रांनो यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा खंडेराया नक्कीच पूर्ण करतील. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.