मार्गशीर्ष महिन्यातील ९ डिसेंबरला या ठिकाणी काढा फक्त एक स्वस्तिक स्वामी समर्थ स्वतः दर्शन देतील..

मित्रांनो 9 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार इथे काढा, एक स्वस्तिक घरात सुख-समृद्धी पैसा येईल, मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, हा महिना 5 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे, आणि या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा 9 डिसेंबरला येत आहे, मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी चा महिना मानला जातो.

खास करून विवाहित महिला या महिन्यांमध्ये खासकरून गुरुवारी उपवास करतात, व्रत करतात, आणि शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन केले जाते,खास करून मुलांच्या प्रगतीसाठी सौभाग्यासाठी आपल्या पतीसाठी हे व्रत ही पूजा केली जाते , तर याच पहिल्या गुरुवारी तुम्हाला या ठिकाणी फक्त स्वस्तिक काढायचा आहे.

आता हे स्वस्तिक कुठे काढायचे? तर मित्रांनो 9 डिसेंबर महिन्याच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल,त्यावेळी तुम्ही देवघरात बसायचे आहे ,देवघरात बसल्यानंतर जर महिलांचे व्रत असतील,आणि ते पूजा मांडत असतील, कथा वाचन करत असतील.

तर त्यांनी त्या पूजेच्या खाली म्हणजे पूजा मांडताना पाठ किंवा चौरंग ठेवला जातो, त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो,तर त्या चौरंगाच्या किंवा त्या पाठाच्या खाली तुम्हाला लाल कुंकू ने स्वस्तिक काढायचे आहे, एका वाटीत थोडेसे कुंकू घायचे, त्यानंतर एक-दोन थेंब पाण्याचे टाकायचे, त्याला व्यवस्थित मिश्रण करायचे.

आपल्या बोटांच्या सहाय्याने छोटासा लाल कुंकू ने स्वस्तिक तुम्हाला तिथे काढायचा आहे, आपल्या पूजेच्या खाली पाठाचा खाली करायचे आहे, तुम्हाला स्वस्तिक करायचे आहे, आणि जर तुमची पूजा नसेल, तुमचे व्रत नसेल, तुम्ही पूजा मांडत नसाल,तर तुमच्या देव घरातच एका साईडला तुम्हाला छोटीशी लाल कुंकू ने स्वस्तिक काढायचे आहे,आणि त्या स्वस्तिक.

वर तुम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा देवी लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, त्यानंतर त्या मूर्तीचे त्या स्वस्तिकचे तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजन करायचे आहेत,असे फक्त तुम्हाला या पहिल्या गुरुवारी करायचे आहे, नंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तर व्यवस्थित पुसले कपड्याने तरी चालेल, फक्त गुरूवारच्या दिवशी स्वस्तिक काढून.

एक तर पूजा मांडा पूजा नसेल,तर देवघरात छोटेसे स्वस्तिक काढून, त्यावर लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून तुम्ही पूजा करा,नक्की माता प्रसन्न होईल, तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणेल.. स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!