दिवाळीच्या दिवशी या प्रकारे स्वामींचे पूजन केल्याने स्वामी लगेच प्रसन्न होतील..

मित्रांनो दिवाळीच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीचे पूजन याप्रकारे करा,त्या सोबतच ही सेवासुद्धा करा, स्वामी कृपा होईल, स्वामी प्रसन्न होतील, त्यांचे अनुभव येतील,मित्रांनो तसे तर दिवाळी हे महत्व खास करुन लक्ष्मी मातेशी जुडलेले आहे,त्या सोबत कुबेर आणि गणपती आपण दरवर्षी लक्ष्मी मातेचे पूजन दिवाळीच्या वेळेस करत असतो, खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यासोबत कुबेराचे पुजन गणपतीचे पूजन करत असतो,परंतु मित्रांनो आपण स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहोत.

तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी स्वामींचे विशेष पूजन करायचे आहे, हे पूजन तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करायचे,कारण तोच सगळ्यात मोठा दिवस मानला जातो,तुम्ही जी ही पूजा करत असाल, लक्ष्मीची कुबेराची धनाची जी ही पूजा ती पूजा करा,त्या सोबत ही छोटीशी स्वामींची पूजा करा,त्यासाठी तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो लागेल ,फोटोअसेल तरी चालेल मूर्ती असेल तरी चालेल , आता मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीचे अभिषेक करायचे आहे.

मूर्तीला ताटलीत,ताटात किंवा तामना मध्ये ठेवायचे आहे, त्यानंतर दूध टाकायचे आहे, 11 चम्मच त्यानंतर त्यानंतर 11 चम्मच पाणी त्यानंतर टाकायचा आहे, एक एक चम्मच दूध किंवा पाणी टाकताना,श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला बोलायचं आहे, 11 चम्मच दूध 11 चमचा पाणी टाकून झाल्यानंतर हातात मूर्ती घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने तिला धुऊन घ्यायचे, आणि पुन्हा तिच्या जागी तिला स्थापन करायचे, आणि फोटो असेल तर फक्त पाणी शिंपडून.

पुसून घ्यायचा,, बस एवढंच करायचं, त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा, हा नैवेद्य दूध साखरेचा असेल, किंवा खीर केली असेल तर खिरीचा नैवेद्य दाखवायचा,आणि खीर केली नसेल तर जे ही तुम्ही स्वयंपाक केला असेल, तो स्वयंपाक आणि त्या सोबत दूध आणि साखर म्हणजे दुधामध्ये चिमूटभर साखर टाकून ते तुम्ही नैवेद्य दाखवायचा, आणि तुम्ही फराळ केले असेल, तर ते फराळ सुद्धा तुम्ही स्वामींना दाखवायचे आहे, त्यानंतर तुम्हाला.

एका मंत्राचा जप एक माळ स्वामी समर्थ बसूनच करायचा आहे, हा मंत्र काही असा आहे. “ओम श्री स्वामी समर्थ आय नमः” मित्रांनो हा मंत्र जर 108 वेळेस म्हणजेच एक माळ तुम्हाला संपूर्ण करायचे आहे, मनोभावे विश्वासाने स्वामींची असे पूजन दिवाळीच्या दिवशी करा, ही सेवा करा स्वामी प्रसन्न होतील ,स्वामींना प्रार्थना करा, सुख-समृद्धीसाठी आरोग्यासाठी बरकतीसाठी स्वामी नक्की प्रसन्न होतील, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करतील.

स्वामी समर्थ यांच्या विषयी तुमच्या मनात श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.. टीप, वरील सर्व माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे यामधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!