वडिलांना एक भयंकर आजार झाला म्हणून याने वडिलांचे असे काही केले के पाहून तुम्हाला ध-क्काच बसेल..

मित्रांनो तुमचे स्वागत आहे या फेसबुक पेजवरती, अशाच नवनवीन मराठी कथा वाचण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक तर.. सर्व प्रथम आम्ही सांगू इच्छितो की वरती दिसणाऱ्या फोटोचा आणि या कथेचा काहीच संबंध नाही आम्ही तो भावनात्मक दृष्टीने तुमच्या समोर दर्शीवला आहे. तर चला कथेला सुरवात करू, माझे ऑफिस सुटल्यावर मी घरी चाललो होतो.. तेव्हा पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत होती, आणि लवकर घरी जाऊन काही खावे तर घरी आई.

बायको दोघेही नव्हत्या, म्हणून समोर दिसणाऱ्या एका पाणीपुरीच्या गाड्याजवळ काही तरी खाऊन व पोटाला आधार देऊन म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीच्या गाड्यावर गर्दी होती, म्हणून ल आपला नंबर येईपर्यंत मी गपचूप वाट बघत बसलो. पण जेव्हा नजर फिरवली तेव्हा पाहिले की पाणीपुरी वाल्याच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर येण्याची वाट बघत उभे होते, त्यांच्या पायात पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर हाफ शर्ट, आणि चेहऱ्यावर नीरविकार भाव.

हसरा चेहरा, व त्यांच्या वयाबद्दल बोलायचे झाले ते साधारण 65 ते 70 वयाचे असतील. आजोबा मस्त पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून, एक एक कोरडी पुरी तोंडात कोंबत होते. माझा नंबर आला पाणीपुरीवाल्या समोर प्लेट हातात घेऊन मी उभा राहिलो आणि एका मागून एक अशा पाच पाणीपुऱ्या मी खाल्ल्या, तेव्हा कुठे पोटातील आग जरा शांत झाली होती. पण आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. आणि पाणीपुरीवाला मात्र चांगलाच वैतागलेला होता.

“बाबूजी प्लेट देता हू.. बाहर सामने आकार खाओ ना!”, आजोबांनी नुसते गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालू ठेवले.. तसे एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होतेच, म्हणून मी अजून एक पाणीपुरीची प्लेट खायला सुरवात केली, पण आजोबा मात्र मस्त तल्लीन होऊन पिशवी मधल्या पुऱ्या तोंडात टाकत होते. आहो आजोबा नीट घेऊन खावा की, मी आजोबांना बोललो, पण त्यावर आजोबांचे हू नाही की चू नाही. मला वाटले काहीतरी गडबड आहे.

माझी दुसरी प्लेट संपत आली होती तरी देखील आजोबा तिथेच उभे होते.. तेवढ्यात मागून एक माणूस स्कुटीवरून आला. आणि काळजी करू नकोस आपले बाबा सापडले. असे कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. त्याच्या गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल आणि साधारण चाळीसीतला असावा तो.. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद साफ साफ दिसून येत होता. त्याने गाडी बाजूला करून स्टँडवर लावली.

‘काय बाबा आज मस्त पाणीपुरी खाताय? आपण अजून खायची का? त्याने आजोबांना विचारले.. पण तो व्यक्ती बोलत असूनही आजोबाचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले. आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले, आणि तिथला हा सर्व प्रसंग पाहून मला नवलच वाटले.. मी त्या व्यक्तीला विचारले, हे आजोबा कोण आहेत तुमचे? त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले की.

‘हे वडील आहेत माझे’, माझा पुढचा प्रश्न- त्यांना काही त्रास आहे का.? हो त्यांना अल्झा-यमर आहे. अत्यंत शांतपणे त्याने सांगितले, त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख किंवा ताण, त्रास दिसत नव्हता, अगदी सहजपणे तो बोलत होता.. मग हे आजोबा असे कुठेही जातात का? हो आत्ताचेच बघा ना..! जवळपास पाच किलोमीटर चालत आले आहेत, मी शॉकच झालो आणि विचारले मग तुम्ही यांना शोधता कसे?, आम्ही त्यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो.

आणि त्यात एक जी पी एस ट्रॅकर लावला आहे, त्याच्याच साहाय्याने शोधतो मी यांना.. असे वारंवार होत असेल ना. मी आश्चर्याने त्या व्यक्तीला विचारले, तो स्मित हास्य करुन म्हणाला.. महिन्याला एक दोन वेळेस काळजी घ्या आजोबांची.. बापरे काय हा वैताग मी बोललो..! त्यावर तो गृहस्थ म्हणाला, बाबा देखील मला लहानपणी असेच खेळायला गेलो की शोधून आणायचे, यात्रेत हरवलो तर हिकडे तिकडे फिरून मला शोधायचे.. त्यात काय एवढं.

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसवले, आणि तेथून निघून गेला, मित्रांनो तसे पाहायला गेले तर खूप काही शिकण्यासारखं होतं त्या व्यक्तीच्या बोलण्यात तुम्हीच बघा ना, त्याच्या वडिलांना इतका दुर्दम्य आजार असून देखील किती शांत बोलत होता तो.. बिलकुल चीड-चीड नाही की कोणत्याही प्रकारचा मनस्ताप नाही.. उतरत्यावयात आपल्या वडिलांना लहान बाळा प्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो.

मित्रांनो अगदी मनापासून आणि सत्य सांगा की, खरच आपल्याला ही जगता येईल का हो असं?, कमेंट करून तुमचे उत्तर आम्हाला नक्की कळवाच.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!