व्हॅलेंटाईन डे दिवशी याने हिच्या सोबत असे काही केले की पाहून तुमचा थर-काप उठेल..

ती बस स्टॉपवर उभीच असायची तेव्हा हा नेमका तिच्यासमोरून बाईकवर बसून जायचा, दिसायला तसा काही तो ‘हँडसम’ नव्हता पण चेहऱ्यावर एक निरागस हास्य विलसत असायचे, ती ही हल्लीच या शहरात बदली होऊन आलेली होती. ऑफिस आणि सहकारी तिच्यासाठी तसे नवीनच होते, सलग दोन दिवस तो तिच्यासमोरून जात राहिला, आणि तिसऱ्या दिवशी टी टाइम मध्ये तो तिला तिच्याच #कमर्शियल कॉम्प्लेक्समधून’ बाहेर पडताना दिसला.

तिच्याकडे एक नजर टाकून त्याने बाईक चालू केली. आणि तिच्या नजरेत त्याला ओळख वाटली. व तो बाईक वरून जाताना त्याच्या पाठीवर रेंगाळलेली तिची नजर त्याला जाणवत होती. नंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याची बाईक तिच्याजवळच येऊन थांबली. आणि तो तिला म्हणाला “चला सोडतो मी तुम्हाला,” त्याचे चेहऱ्यावरील हास्य पाहून ती भारावली व काही न बोलता ती त्याच्या बाईकवर मागे बसली. कॉम्प्लेक्समध्ये बाईक पार्कजवळ येताच.

तिने त्याला सहज सांगितले की, मी पाचव्या मजल्यावर आहे, तो देखील म्हणाला की, मी तिसऱ्या मजल्यावर आयटी मध्ये आहे. ती त्याला बाय करून निघाली, टी टाईमला मात्र तिची नजर त्याला शोधू लागली, तिने पार्कजवळ नजर टाकली तर तो बाईकजवळ उभा होता.. “चहा पिवूया”? तिने सहज त्याला विचारले, तो मुकाटपणे तिच्या मागून कॉफी शॉप मध्ये शिरला, आणि संवादमध्ये त्या दोघांचे एकमेकांबद्दल बोलून झाले, व इतकेच न्हवे तर.

त्या दोघांनी मोबाईल नंबर देखील शेयर केला. मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे रोजचे वेळापत्रक चालू झाले. सकाळी ऑफिसला एकत्र जाणे.. दुपारी कँटीनमध्ये चहा पिणे.. कधी कधी तर ते संध्याकाळी सिनेमाला किंवा बीचवर देखील फिरायला जाऊ लागले. एके दिवशी बोलता बोलता त्याने तिचा हात सहजपणे हाती घेतला तर, तिने देखील त्याला काही विरोध दर्शविला नाही. तेव्हा तिच्या दृष्टीने एक सहज झालेली ती कृती होती. मात्र आज व्हॅलेंटाईन डे होता.

व तिने त्याला घरीच बोलावले कारण तिची रूम पार्टनर बाहेर जाणार होती व बाहेर त्या गर्दीत फिरण्यापेक्षा आपण घरीच बोलत बसू असा प्रस्ताव तिने ठेवला.. तो चालेल बोलला आणि लगेच हातात केक आणि चॉकलेट बॉक्स घेऊन त्याने तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हा एक अनामिक हुरहूर त्या दोघांना जाणवत होती, बोलता बोलता दोघे शरीराने कधी जवळ आले ते तिला कळलेच नाही. संध्याकाळी काही अनिच्छेनेच तो तिच्या घरातून बाहेर पडला.

आणि बाहेर पडताच त्याने एक फोन केला, व बोलू लागला ‘साहेब.. आता दुसऱ्या ऑफिसचे काम द्या मला, इथल्या ऑफिसमधले डिलिव्हरीचे काम खूप कमी झाले आहे, थोडे लांब असले तरी चालेल पण इथे जवळपास कोठेच नको” स्वतःशी हसत हसत तो त्याच्या घरी निघाला. संध्याकाळी मित्रांसोबत तो नेहमीच्या बारमध्ये शिरला. आणि मित्रांशी बोलू लागला “चला, आज अजून एक माझ्या लिस्टमध्ये ऍड झाली आहे बघा. आता उद्यापासून दुसरीचा शोध घेऊ.

समोरच्या बिल्डिंगमध्ये नुकतीच एक भाड्याने राहायला आली आहे. पुढच्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत तिचा नंबर लागेलच, आणि नंतर तिचीही बदली होईल, चला आज बियर प्या माझ्यातर्फे.. ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ चियर्स, मित्रांनो तुम्हाला आशा मुलांबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!