नवरा अपघातात गेल्यावर या स्त्री सोबत असे काही घडले की, पाहून तुम्हाला घ-क्काच बसेल..

अचानक नवरा गेल्यामुळे त्या तिघींच्या डोक्यावरच छत्रच हरवलं होतं, तिला कधी घराबाहेर पडण्याचा प्रसंगच आला नव्हता. तशी तिची परिस्थिती बेताचीच होती त्यातून तिचा नवरा गाडीवर ड्रायव्हर होता, त्यामुळे त्याच्या जागी काम करण्याची तिला काही संधीच नव्हती. ‘त्यातून माहेरचाही आधार न्हवता..’ तिला तिच्या डोळ्यासमोर अगदी काळोख दिसत होता, भविष्याचा विचार करून ती घाबरली.. तिच्यावर अगदी भिक मागण्याची वेळ आली होती.

तिला काय करावे काही समजेना शेवटी ती जवळच्याच एका देवीच्या मंदिरात बसायला लागली, पण आतून तिला तिचा स्वाभिमान त्रास देत होताच. पण भीक मागन्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणता पर्याय न्हवता. काय करावे काही सुचेना, दोन गोड पोरी पदरात होत्या. एके दिवशी तिने पाहिले की ती ज्या मंदिराजवळ बसत होती तिथे रंग रंगोटीचे काम चालू होते. तिथे विचारताच तिला समजले की नवरात्राची तयारी तयारी चालू आहे. तस तिचे मन बालपणात गेलं.

आपण किती आंनदी असायचो नवरात्रीतमध्ये, तिला आठवलं आपलं ढोलकी वाजवत आजोबा सोबत देवीचे गाणे म्हणत फिरायचो, तिला एकदम आपण हट्टाने आणलेली ती ढोलकी आठवली, त्याच पाठोपाठ तिने एकदा ती वाजवायला काढली म्हणून नवऱ्याने मारलेले देखील आठवले, तेंव्हा पासून तिने ती वरच फेकली होती. तिने जाळीच्या दरवाज्यातून देवीकडे पाहिले आणि क्षणात तिला देवीने सुचवले म्हणजे तिला जगण्याचा एक मार्गच दाखवला.

आणि तिने ठरवलं ते करायचच.. शाळेतून दोन्ही पोरी पळत आल्या तसं तिने त्यांना स्पीकर वर चालू असलेलं देवीच गाणं लिहायला सांगितलं, पोरींना समजेना की आईने अचानक असे का सांगितले त्यांनी देखील काही न विचारता गाणे लिहायला सुरुवात केली. त्यातून रोजच्या ओळखीने तिथली पोरं देखील ओळखीची होती. त्यांनी परत परत गाणं लावून ते लिहून घेतले. तिला ते येत होतेच फक्त त्यावर थोडी धूळ बसल्यामुळे तिला पूर्ण आठवत न्हवते.

फक्त वाचता येईल एवढे शिक्षण आणि त्या ढोलकीने तिचे काम करून दिले. पहिल्यापासून तिचा कान आणि गळा तसा तयारच होता. ती धावत धावत घरी आली, धुळीच्या गाठोड्यातून तिने ती जुनी ढोलकी काढली. खूप दिवसाची ठेवलेली असल्यामुळे म्हणावा तसा नाद येईना. मग तीला काय करावे हीच समजेना तिच्या जवळ तेवढे पैसे देखील न्हवते ती दिरुस्त करायला. तिने विचार केला आणि रात्रीच्या कालवणासाठी ठेवलेले पैसे घेतले आणि मनात बोलली.

आज कालवनात पैसे घालवायला नको, नुसता भात खाऊ पण हि दुरुस्त करू. पोरींना आईचा उत्साह पाहून आनंद झाला, भरभर दुकान गाठलं दुरुस्तीच खर्च 200 रु होता, पण तिच्या जवळ तर सगळं मिळुन 100 रुपये साठलेले, ती दुकानदाराच्या हाता पाया पडली, तशी दुकानदाराच्या पाहण्यातलीच होती, पण त्याच्या दृष्टीने तिची ओळख भिकरणीची होती. त्याने क्षणभर विचार केला. त्याच्या लक्षात आले काहीतरी करायची धडपड आहे.

भिकारणीच लेबल आता तिलाही नकोस होतं हे त्याला दिसत होतं. उधारी ठेवून बघू काय करते. त्या दुकानदाराने नवरात्रीच्या 9 दिवसाची मुदत दिली. आनंदाने त्या तिघींचे चेहेरे खुलले, घरी आल्यावर नुसता गरम भात त्या तिघींच्या पोटात पडला आणि त्यांची बोटं वळली ढोलकीवर, तिला फक्त एकदा बघावा लागला कागद मग सगळं कसं झरझर आठवत गेलं. सोबत ताल तर होताच न शिकताही आजोबा कडून वारसा हक्काने मिळालेला होता तिला.

रात्री झोपताना देवीचा चेहरा आला तिच्या डोळ्यापुढे, सकाळी उठून मंदिराजवळ बघते तर यात्रेचे रूप आलेलं तिला गे सर्व पाहून हुरूप आली मग तिने भर्रकन ढोलकी काढून थाप देत गाणं सुरू केलं, फरक फक्त इतकाच होता की ती आता भिकाऱ्यांच्या रांगेत बसली नव्हती तर विविध खेळांच्या रांगेत बसली होती. तिचा पहाडी आवाज आणि खणखणीत ढोलकी.. तिने गाणं सुरू केलं. आणि त्यात ती तल्लीन झाली, ‘तुने मुझे बुलाया शेरावालीये.

मै आया मै आया शेरावलीये’.. माणसाच्या आवाजातलं गाणं बाई गात होती, पण खुप भावपुर्ण होतं ते सगळ्यांना खेचणार देखील होत, तिचे डोळे बंद जणू ती शेरावाली समोर ऊभी होती. गाणं सम्पल ढोलकी थांबली तिने डोळे उघडले,व पुढे पाहिले तर समोर गर्दी, टाळ्या आणि समोरच्या फडक्यावर पडलेले पैसे, ते सर्व पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूच आले, आज ते पैसे कोणाचे उपकार नव्हते तर तिच्या कलेचे होते. दुपारी पोरी आल्या.

माय तू खुप छान दिसतीयेस देवीवाणीच वाटती जेव्हा गाती तव्हा, असे पोरी बोलताच ती हसली पोरींना म्हणाली,’ आता हे गाणे शिकायचे तुम्ही पण.. आणि जेव्हा शाळेला सुट्टी असेल तेव्हा माझ्या बरोबर गाणे म्हणत शहर भर हिंडायचे भीक मागणे आता बंदच करायचे. आपलं गाणं आवडलं तर लोक पैशे देतील.’ हे ऐकून आता पोरींना आनंद झाला. त्या बोलल्या आता आपल्याला कोणी भिकारी म्हणणार नाही. दिवसभरातच ढोलकी वाल्याची उधारी फिटून.

पोटभर भाजी पोळी मिळणार होती तिला, एवढे सर्व होऊन उलट 10 रु शिल्लक राहिले होते तिच्याजवळ. ती लगबगीने उठली देवीसाठी हार घेऊन पळत मंदिराकडे गेली. पुजारी बघतच होता तिच्यातील धडपड, त्याने तिने दिलेला हार मूर्तीला घातला तेंव्हा ती मूर्ती जितकी तेजस्वी दिसत होती तेवढीच ती कालची भिकारीण आणि आजची कलाकार आत्म तेजाने तेजस्वी भासत होती. मित्रांनो तुम्हाला या कलाकार स्त्री बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!