शिक्षणासाठी जेव्हा नवऱ्याने हिला टाकून दिले तेव्हा पहा या स्त्री ने काय करून दाखवले.

साधारण पण पाच वर्षा मागील गोष्ट असेल ही, तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाला गेले होते. आणि ते लग्न खूप थाटामाटात केले होते,, आणि ते नवरी आणि नवरदेव हे दोघेही खूप आनंदात होते. त्यानंतर लग्नानंतर जवळपास एका-दोन वर्षाने मी परत त्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. त्यावेळी तिची ताई तिच्या माहेरी गेली होती. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, त्यावेळी त्या मला जरा उदास वाटल्या. मी माझ्या मैत्रिणीला विचारले, ‘काय ग तनू.

अनु ताई येवडी नाराज का आहे.. घरी सर्वकाही ठीक तर आहे ना..?? ‘अगं. माझ्या ताईंच्या घरी थोडा प्रॉब्लेम चालू आहे,, म्हणून मागच्या एक महिन्यांपासून ताई इथेच आहे.’ ‘पण नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे गं..??’ अगं. माझ्या ताईचे जेव्हा लग्न झाले, त्यावेळी ती बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला होती. आणि तिच्या लग्नानंतर तिने कॉलेज तर रेग्युलर केलेचं नाही, पण तिला शेवटची परीक्षा द्यायची होती. दाजींची पण खुप इच्छा होती, की ताईने परीक्षा द्यावी..

म्हणून मग ताई परीक्षेसाठी इकडे आली होती. आणि ती जवळपास एक महिनाभर माहेरीच होती गं, आणि परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी, ताई परत सासरी जाणार होती, त्यावेळी तिच्या सासूबाईंनी आम्हाला निरोप दिला की, तिला आता परत सासरी यायची काहीही गरज नाही. तिला म्हणावं बस माहेरीच आता आणि देत जेवढा द्यायच्या आहेत तेवढ्या परीक्षा.’ ‘पण माझी ताई तर फक्त परीक्षा द्यायलाच आली होती ना अगं. मग तु सांग, तिच्या सासूबाईंना एवढा.

राग येण्याचे काय कारण आहे..?’ मग मी विचारले, ‘कारण तुझ्या ताईने परीक्षा द्यायची हा निर्णय परस्पर ताई आणि दाजींनी घेतला होत आणि त्यामुळे तिच्या सासूबाईंना राग आला. आणि ताई इकडे येताच लगेच दाजींच्या बहिणीने आणि तिच्या सासूने दाजींना ताईविरुद्ध खुप भडकवायला सुरुवात केली होती. हा सुरुवातीला दाजीनी त्यांचे काहीच एकूण घेतलं नाही. पण नंतर वेळेनुसार मात्र दाजींच्या वागण्यात खूप फरक दिसू लागला.

आणि आता तर दाजी माझ्या ताईचा फोन पण उचलत नाहीत.’ ‘मग आता पुढे काय करायचे ठरवलंय तुमचे.’ मी विचारले,’ माझे आई-बाबा त्यांना समजवायला त्यांच्या गावी गेले होते, पण त्यांनी माझ्या आईबाबांचा पण खुप अपमान केला. आणि ते काही ऐकुन घ्यायला तयारच नाहीत. आणि आता ताईला नांदवून घेण्यासाठी पण तयार नाहीत..’ अगं तनु. ‘हळूहळू होईल गं सर्व काही ठीक. तु काळजी करू नकोस.’ मी तिला थोडा धीर देत म्हणाले.

आणि तिथून निघून आले. माझ्या मनात मात्र हा एकच विचार होता. त्या दोन्ही कुटुंबांनी मागल्या चार महिन्यापूर्वीच किती थाटामाटाने दोघांचेही लग्न करून दिले होते. आणि लग्नात नवरदेव आणि नवरी दोघेही खूप आनंदात होते. आणि त्यांना पाहून कोणीच असा विचार केला नसेल, की येत्या अवघ्या चार महिन्यात त्यांचा संसार पूर्णपणे संपून जाईल. कधीकधी तर वर्चस्वाच्या लढाईत घरातील ज्येष्ठ माणसे मुलांचा संसार संपुष्टात आणतात.

किती लहानसहान गोष्टींवरून नाती तुटतात घरातील. अनुताईच्या बरोबर सुद्धा असेच झाले आहे. अनुताईच्या आई-बाबांनी तीच्या सासरच्या मंडळींना खुप समजावण्याचा प्रयत्न केला. अगदी त्यांच्या हातापाया पडले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आणि शेवटी त्या दोघांचा घटस्फोट झालाच. आणि त्यानंतर तीनच महिन्यांत तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न देखील केले. आणि यासगळ्यातून अनुताईला सावरायला बरेच महिने लागले होते..

आणि मग त्यानंतर अनुताईने पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते.. आणि हळूहळू तिने मागले सर्वकाही विसरून ती पुढे गेली. आणि आता बघता बघता चार वर्ष निघून गेली. अनुताई आता एका चांगल्या कंपनीमध्ये रुजू होती. तनुचे ही लग्न यंदा पार पडले होते. पण अनुताईने अजूनही दुसऱ्या लग्नाचा विचार काही केला नव्हता.. आणि आता तिचे पूर्ण लक्ष तिच्या करीअर वर केंद्रित होते. पण अचानक एका दिवशी तिच्या घरी, तिची सासू-सासरे.

आणि तिचा नवरा आले होते. आणि त्यांना बघून अनुताई आणि तिच्या आई-वडिलांना खुप आश्चर्य वाटले. आणि त्यांच्या येण्याचे त्यांना कारण विचारले, तेव्हा कळले की, तिच्या त्या नवऱ्याचा दुसऱ्यांदा सुध्दा घटस्फोट झाला होता.. मागल्या एका वर्षांपासून ते लोक परत त्याच्यासाठी एक मुली शोधत होते, पण त्याचे लग्न काही जमताजमत नव्हतं. आणि एकदा अचानक त्याने अनुताईला बाहेर कुठेतरी बघितलं, त्यावेळी त्याला ती खुप सुंदर आणि खुप आत्मविश्वासाने.

भरलेली वाटली होती, त्यांना माहीत होतं की, अनुताईने अजुन लग्न केले नाही ते, आणि आता त्यांना अचानक वाटलं की, अनुताईच त्यांच्या मुलासाठी एक योग्य मुलगी आहे ते. त्यांना वाटले होते की, अनुताईचे आई-वडील त्यांच्या या प्रस्तावाने खूप खुश होतील. आणि आपण तिला पुन्हा स्वीकारून तिच्यावर आणि तिच्या घरच्यांवर खुप मोठे उपकार करत आहोत. ‘तर मग आपण सगळे लवकरच ह्या दोघांचे लग्न लावून देऊयात.’ तिच्या सासुबाई म्हणाल्या.

‘पण आम्ही अजुन ह्या लग्नाला होकार दिलेला नाही..’ अनुताईचे बाबा त्यांना म्हणाले. ‘पण काय हरकत आहे ह्या दोघांच्या लग्नाला. नाहीतरी अजूनही अनुचे लग्न कुठे होऊ शकले आहे.. मग आपण सगळे मागचे सर्वकाही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे सांगा पाहू.. तिच्या सासुबाई म्हणाल्या. ‘हरकत आहे. घटस्फोट म्हणजे तुम्हाला काय गम्मत वाटते का..?? आणि एक आम्हाला एकदा तुमचा आणि मुलाचा अनुभव आलेला असताना.

आम्ही पुन्हा तुमच्याशी सोयरिक करू हा विचार देखील तुम्ही कसा केला..? अगदी छोट्यामोठ्या कारणावरून तुम्ही तुमच्या मुलाचा संसार मोडला होता. आणि एखादे खूप मोठे कारण असते, तर ते आम्हीही समजू घेतले असते. आणि घरच्या मोठ्या मंडळींनी तर त्यांच्या मुलांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या असतात, पण येथे तुम्ही स्वतःच तुमच्या मुलाला चूक करायला भाग पाडलं होतं. आणि एक माझ्या अनुचे लग्न झाले नाही, ह्याचा असा अर्थ नाही की.

तिला चांगले स्थळं मिळत नाहीय. तर आम्हाला आता तीच्याबाबतीत अजिबात घाई करायची नाही आहे. आणि तिच्या मागच्या लग्नाच्या बाबतीत माझा निर्णय चुकला होता, पण तीच चूक मला परत करायची नाही. मी माझ्या अनुसाठी एक चांगला, सुशिक्षित, आणि तिच्यावर खुप प्रेम करणारा नवरा शोधणार आहे. आणि एक तुमच्यासारखा श्रीमंत नसला तरी आम्हाला चालेल, मग थोडासा उशीर झाला तरी चालेल आम्हाला. अनुचे बाबा म्हणाले.

‘पण ह्यांचा घटस्फोट होण्याआधी तर तुम्ही आमच्या हातापाया पडायला सुद्धा तयार होतात की, आमच्या अनुला नांदवून घ्या म्हणून..’ तिच्या सासुबाई म्हणाल्या. ‘तेव्हा मी एक लाचार बाप होतो, मला माझ्या मुलीचा मोडणारा संसार वाचवायचा होता. म्हणून मी तिच्या सुखासाठी तुम्हाला विनवण्या करत होतो. पण आता मला असं वाटतं की, जे त्यावेळी झालं ते अगदी चांगलं झालं. निदान आज माझी अनु तिच्या स्वतःच्या पायावर उभी आहे.

आणि स्वाभिमानाने जगते आहे. अनुचे बाबा म्हणाले. ‘पण तुम्ही एकदा परत विचार तर करून बघा. सासुबाई म्हणाल्या,’ आमचा विचार झाला आहे. आता तुम्ही गेला तरी चालेल..’ अनुताईचे बाबा म्हणाले.. अनुताईचे बाबा असे काहीतरी म्हणतील असे तिच्या सासूबाईंना वाटलेच नव्हते. त्यांना वाटले होते की, हा प्रस्ताव ते अगदी आनंदाने स्वीकारतील. पण त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर अनुताईचे सासू-सासरे आणि तिचा तो नवरा तिथून मान खाली घालून निघून गेले.

आज अनुताईला मात्र तिच्या वडिलांचा खुप अभिमान वाटला होता. तुम्हाला या बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!