हुंड्यामध्ये 2 तोळे सोने दिले नाही म्हणून यांनी सुने सोबत केले असे काही की पाहून तुम्हाला ध-क्काच बसेल

आंब्याच्या झाडाच्या पाने तोडून त्याचे एक सुंदर तोरणं दारावर खूप छान शोभून दिसत होते… घराची दारे जुनी होती, पण कविता ने ती रंगवून त्यावर सुंदर नक्षी काढली होती…. अगदी तिची स्वतःच नवरी असल्या सारखी हौसेने आणि उत्साहाने ती कामं करत होती… तिने अगदी रांगोळी, आणि घराच्या दारातली प्राजक्ताची छान छान फुलं जमवून तिने देवघरातल्या देवीसाठी एक सुंदर हार बनवून ठेवला होता,.. सगळी गडबड पाहून घरात आलेल्या मावश्या, आत्या म्हणत होत्या..’ ही पोरगी गेलं तर काय होईल या घराचं काय माहित…. तिच्या आईची नवी साडी घालून कविता देवब्राह्मणाच्या पुजेला बसली होती….

आपल्या घरची परिस्थिती ओळखून कधीही हट्ट न करणारी अशी ही कविता… आणि ती एका मराठी शाळेत नोकरीला पण होती.. आणि तिला मिळेल तो पगारही ती घरी देत होती.. हाताशी आलेला त्यांचा मुलगा त्यांनी काही दिवसा मागेच गमावला होता, त्यामुळे त्यांच्या जवळ होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं…. आता फक्त हे दोन खोल्याच घर आणि ह्या घराच्या अंगणातलं हे किराणा दुकान ह्यावरच घरचं सगळं सुरू होतं… लांबच्या नात्यातल्या एका लग्नात कविताला त्या मंडळीने बघिल्यापासून हा योग जुळून आला होता… घराजवळ लग्न करायचं ठरलं होतं… पण बैठकीत झालेल्या तीन तोळ्याच्या हरावरून.

लग्न मोडायला आलं होतं.. पण कोणत्या तरी पाहुण्याने मध्यस्थी केली, आणि दोन तोळ्यावर सगळं जमवलं दिलं होतं… त्यावेळी मात्र कविता म्हंटली होती की, मला हार नको, त्या हारा ऐवजी मला दोन सोन्याच्या बांगडया करूया.. त्या हिरव्यागार चुडयासोबत त्या सोन्याच्या बांगडया, तिनी तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात त्यांच्या लग्नात पहिल्या होत्या, आणि तिझीही खुप इच्छा होती तश्या बांगड्या घालण्याची…. हे असं बैठक ठरून आज दोन महिने झाले होते.. आणि आज लग्न येऊन ठेपलं होतं… घरात बारीक सनई सुरू होती, घराच्या दारातला मांडव ही आता सजलं होता.. चला आता नवरीने चुडा भरून घ्या.

सगळ्यात आधी… भडजीने सांगितलं.. आणि मग त्या सगळ्या बायकांच्या घोळक्यात कविता येऊन बसली होती.. तिझी आत्या म्हणाली, ‘ये पोरी तुझ्या बाबांनी त्या सोन्याच्या बांगडया केल्या आहेत, ना तुला त्या मागे घाल मग त्यांनंतर हा चुडा घालूया आपण… तसं तिला जरा धस्स झालं,… आणि ती म्हणाली..’ हो आता लगेच आलेच घालून… ती आतल्या खोलीत गेली आणि आई म्हणाली माझ्या बांगडया दे लवकर… आईने तोंड पडून तिच्याकडे बघितलं.. त्यावेळी तिला आई जरा केविलवाणी वाटली होती… आई एक डबी लपवत त्यातून हळूच फक्त आईने त्या बांगडया कडून दिल्या… आणि ती तशीच घाबरत बसली.

तो चुडा भरायला… आणि तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी तिच्या त्या सोन्याच्या बांगडया बघत होत्या… जरा जास्तच पिवळं दिसतंय ना सोनं.. कोणी तरी म्हणले की, दोन तोळ्याच्या नसतील गं, जरा जास्त लागलं असेल याला सोने… कुणी म्हणे कोणत्या सोनाराकडे केल्या आहेत… आणि कविता अगदी कावरीबावरी झाली होती… ह्या सगळ्या प्रश्ननांनी, तेवेढ्यात लगेच भडजीनी हाक मारली आणि ती काही विचार न करता पळत सुटली… तिच्या नाजुक आणि गोऱ्या हातावर तो चुडा अगदी उठून दिसत होता, तिने स्वतःच काढलेली ती मेंदी, आणि तो त्या मेंदीचा सुंदर सुगंध… पण ह्या सोन्याच्या चुडयामुळे आता.

ती अस्वस्थ होत होती… कसं होईल आपलं लग्नानंतर..?? आपल्याला कोणी या बांगड्यांच विचारलं तर काय होईल… तिला आता घाबरून घाम फुटाय लागला… तिचे आई आणि बाबा दोघेही एकमेकांना अपराधी असल्यासारखे पाहत होते… आज कविता खुप खुप सुंदर दिसत होती.. स्वतःबनवलेलं रुखवत आणि तिने केलेली सगळी बारीक सारीक तयारी… माझं लेकरू आज सोन्यासारखं दिसतंय ग बाई, ते लोक पुण्यवान आहेत बाई, आजीच हे बोलणं ऐकल्यावर माय-लेकीं एकमेकांना पाहू लागल्या…. त्यांना वाटलं की, फक्त आपल्या तिघांत असलेलं ही गोष्ट आता आजीला कळलं कि काय रे देवा…

असंच जर तिकडे काही चुकीचं कळलं तर ते लोक वरात परत नेतील… तिच्या बापाला ही आता धस्स झालं… पण आता आजी पुढे म्हणाली, ‘याकाळात असे समजुतदार पोरी राहिल्या नाहीत.. म्हणून म्हणते की, सोनं काय करायचं आहे.?? किती गुणी सुन मिळाली त्यांना आता.’ आजीचं हे वाक्य पूर्ण ऐकल्यावर, त्या तिघांचा सुटकेचा श्वास सोडला,.. मुहूर्त घटिका जवळ आली, आणि आता कविताच्या डोक्यावर अक्षता पडल्या होत्या… आज दिवसभर सगळी लगबग सुरू होती.. तीच्या नवीन झालेल्या नंदा, आणि जावा तिच्या जवळ येऊन तिच्या हातातील तो सोन्याचा चुडा बघत होत्या…

आणि त्या प्रत्येक क्षणाला हिच्या मात्र काळजाचा ठेका चुकत होता… आता निघण्याची वेळ आली होती.. आणि ती आई-बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडत होती… घराच्या देवघरातल्या देवीला नमस्कार करून, ती निघताना देवीला ठेवलेला तो चुडा पाहून ती म्हणाली.. देवीआई आता ह्या चुड्याची लाज तुलाच बाई… सगळं सांभाळून घे आई.. जगदंबे…’ ती वळून बघत होती,, आपलं हे गरिब माहेर, आणि सुंदर प्राजक्ताखाली सजलेला हा मंडप, घराचा तो नक्षीदार लाकडी दरवाज्यात केविलवाणे.. अपराध्यासारखे उभे ते आपले हतबल आई- वडील,.. आणि हे पाहून ती परत माघारी पळाली आणि येऊन दोघांना घट्ट धरलं…

तुम्ही आता माझी चिंता करू नका, मी सगळं सांभाळून घेईन… तुम्ही आता निश्चिन्त रहा… लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या विधी पूर्ण झाल्या..आणि तिच्या नवऱ्याने तिला रात्री जवळ ओढलं… आणि म्हणाला मला ते तुझे मेंदीने भरले हिरव्यागार हात आणि चुडा बघू दे जर मनसोक्त पणे… जादू आहे तुझ्या हातात.. त्याने तिचे हात निरखले, आणि ओठावर ठेवले तशी ती जरा शहारली, आणि मनातून घाबरलीही… ती म्हणाली तुम्ही चुड्याचे हात बघत आहात कि, तो सोन्याच्या बांगडीचे हात बघत आहात.?? आणि तो म्हणाला चुड्याचेच गं… आणि किती छान दिसतो, तो हिरवा रंग तुझ्या या हातावर.

आणि मुळात तुझं तुझं आयुष्य कष्टमय होत मला माहित आहे… तुझ्या आईबाबांना सावरून घेणारे हे तुझे हात खुप सुंदर आहेत गं.. आणि ते माझंही आयुष्य सावरायला आले आहेत हे माझं भाग्यच आहे… आणि तिला आता जाणवलं होतं.. की या बांगडयाच दडपण नाही आता पेलू शकणार आपण… ती हा विचार करताना तिला एकदम रडूच आलं… त्यालाही काहीच कळेना की काय झालं हिला अचानक… ती जरा शांत होत होत तिच बोलायला लागली.’ तुम्ही माझ्यावर रागावणार नसाल तर एक सांगते… आम्ही त्यादिवशी सोन्याच्या बांगडया घेऊन घरी आलो, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी बँकेवाले हजर झाले..

आम्ही दादाच्या आजारात काही कर्ज घेतलं होत.. आणि त्यांनी आमच्या घरावर जप्ती आणली… आणि मला त्या सोन्याच्या बांगडया मोडाव्या लागल्या होत्या… आई-बाबाला आता माझं लग्न करणं मुश्किल झालं होतं… पण तेही मी कसं तरी पेललं, पण आता हे बांगड्याचं ओझं मला नाही पेललं… त्याने त्या सोन्याच्या बांगडयाला हात लावला.. आणि म्हणाला मग ह्या बांगडया..?? कविता म्हणाली ह्या खोट्या आहेत,, आणि हेचं खोटं माझ्या मनाला खुप त्रास देत होत… जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे, आता तुम्ही ठरवा की मला नांदवून घेयचं आहे का नाही ते… तशी शाळेत काम करून लवकर लवकर करेल.

मी ह्या बांगडया पण मला तुम्हाला असं फसवायचं नाही… तो म्हणाला, ‘ मग आता तर पोलिसच बोलवायला हवेत घरी, मला पकडायला, कारण तुझ्या एवढ्या हुशार आणि कष्टाळू हातांना मी ह्या सोन्याच्याबांगड्यांची लाच मागितली आहे.. मला नाही कळलं की, हे हातच सोन्याचे आहेत ते.. तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिले… आणि त्याने पुढे सरकुन तिचे डोळे पुसले. अगं वेडाबाई लोक असं म्हणतात की, पहिल्या रात्री काहीतरी भेट द्यावी नवरा-बायोकोने एकमेकांसाठी… त्यात काय आपण उद्या जाऊ सोनाराकडे आणि अश्याच डिझाईनच्या बांगडया करून आणू तुझ्यासाठी आणि हे आपण अगदी गुपचूप करू..

आणि तू आज मला काय गिफ्ट दे तुला सांगू… ती म्हणाली काय.?? तो म्हणाला… तू असाच हिरव्यागार चुडयासारख्या बांगडया भरलेले हात नेहमीसाठी.. जे माझ्या गळ्यात जे किणकिण वाजत माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलत जातील… चालेल ना तुला… ती जरा लाजुन गोरिमोरी झाली होती… आता येथून पुढे त्या हिरव्या बांगडया तिला नेहमी प्रेमाची आठवण करून देणार होत्या… पण त्या तिच्या मागच्या सोन्याच्या बांगडया मात्र तिला कोणीतरी सोन्यासारखं माणुस हिच्या आयुष्यात आलं ह्याची आडवण करून देतात.. आणि यामुळे तिचे हात आणखी जास्तच खुलुन दिसतात…….. तुम्हाला या बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!