विधवा स्त्री कडे पाहिले की प्रत्येकाला वाटत असते की ‘तिला शरीरसुख हवे असणार’ पण हे खरं आहे की खोटे ते या माहितीमध्ये नक्की पहा..

तो धापा टाकत ट्रेनमध्ये चढला होता…. आणि आज चक्क ट्रेनमध्ये गर्दी कमी होती… त्याला खिडकीजवळ सिट रिकामी दिसली, आणि लगेच त्याने झेप घेऊन ती सिट पकडली… आणि त्याच्या समोरची खिडकी पण रिकामीच होती.. ट्रेन सुरू झाली आणि धापा टाकत ती त्या सिट वर येऊन बसली…. आणि बाहेर बारीक आलेल्या पावसा मुळे तो जरासा भिजला होता.. तो रुमालाने डोकच पुसत बसला होता,, आणि रुमालाच्या अडून तो तुझ्याकडे बघत होता…अगदी सुंदर घारे डोळे, पावसामुळे जरासे ओले झालेले ते तिझे केस, ती खूप सुंदर होती दिसायला.. चला आजचा प्रवास चांगला होणार आहे, असं दिसतंय तो मनाशीच म्हणाला..

ती जरा स्थिर झाली,, आणि तिला आठवलं आज येत्या वेळी आपली किती धावपळ झाली ते, पिलूने निघताना किती गोंधळ घातलेला तिला आठवला… ती मनाशीच हसली आता किती लबाड झाली आहे आपली पिल्लू.. आणि आता तिला समजत की, आपण तिला चुकवून पळणार आहे ते.. आता घरात सासूबाईंची पुरती वाट लावणार आहे ती,… माझी आई पण ना तब्येतीची कधीच काळजी घेत नाही, आणि मग मला यावं लागत ती आजारी पडली कि.. ती बसून हा सगळ्या विचारात करत होती, आणि नेमका त्याने खिडकीजवळ सुकवायला घातलेला रुमाल वाऱ्यामुळे तिच्या तोंडावर येऊन पडला…. तिने तो झटकन काढला..

आणि तिने त्याच्याकडे अगदी सहज बघितलं पण काय महित त्याला उगाच अपराधी असल्या सारख वाटलं… तो एकदम गडबडून म्हणाला, ‘ सॉरी अहो हे चुकून झालं आहे.’ आणि तिच्या ही लक्षात आलं की हे त्याने मुद्दाम केलं नाही ते… पण तिला मात्र मनातून हे जरा छान वाटलं होतं, कारण रवि म्हणजे तिचा नवरा.. जो सेंट वापरायचा अगदी तसाच तो लेमन फ्लेवर आणि एकदम फ्रेश करणारा वास होता त्या त्याच्या रुमालाला… रवि जाऊन आता दोन वर्ष पूर्ण झाली होती… त्यामुळे आज कित्येक दिवसांनी तिला असं शहरल्यासारखं झालं होत… ती जरा हसली, तोही अगदी जरा हसला होता, आणि यामुळे तेथील वातावरण.

जरासं सैलावलं…. ट्रेन बाहेर सर्वत्र हिरवीगार झाडी आणि अगदी रिमझिम पाऊस सुरूचं होता, त्याने त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि चाळायला सुरुवात केली… त्याने पाहिले की, त्याच्या आईचे दहा-आकरा MASSAGE येऊन पडलेले होते… आई पण ना, असं म्हणत म्हणत त्याने ते आईचे MASSAGE उघडले…. अरे बाप रे ही काय सारखे त्या पोरींचे फोटो टाकते, आहे मला… किती घाई झाल्या हिला माझ्या लग्नाची… त्यातील फोटो डाउनलोड होई पर्यंत, तो आईचे MASSAGE वाचू लागला होता. जाधवबाईंच्या वधूवर सूचक केंद्रात काही नवीन ठिकाणं आलेत, म्हणुन त्यांनी लगेच पाठवले… अरे बाळा.

महिन्याला 200 रु देते, मी त्यांना जाधवबाईन तुझ्यासाठी खास चांगले स्थळ बघायला.. तू आता तरी ठरव ना ह्यातली कोणती तरी, आणि एक ह्यात दोघी-तिघी विधवा आहेत, बघ त्यांचे ठिकाणं तू पाहू नकोस, नाहितर येईल तुझी समाजसेवा लगेच बाहेर.. आणि आईच्या ह्या वाक्याला हसत हसत त्याने ते फोटो डाउनलोड करायला सुरुवात केली… तिसऱ्या फोटोला बघताच तो अचानक थांबला… त्याने लगेच समोर बघितलं, तर ती नेमकी खिडकीतून बाहेर बघत होती… तेवढ्यात ट्रेन मध्ये चहावाला आला… ए चाय गरम, चाय गरम… त्याने मुद्दाम आवाज काढला आणि विचारले, ‘ अहो मॅडम चहा घेता का.?? ‘ती झटकन वळाली.

आणि म्हणाली… नको… आणि तुम्ही परत घेऊ नका मी आणलाय आहे चहा, थर्मासमधून… O YES तो मनाशीच म्हणाला.. हि त्या फोटोतलीच आहे… आणि त्याने तिची माहिती न वाचता लगेच मोबाईल बंद केला… आणि तिने त्याला ऑफर केलेला चहा त्याने घेतला… आणि त्यालाही आता जाणवलं की त्याच्या हृदयाची धडधड खुप वाढली आहे ते… मस्त छान चहा, बाहेर होणारा रिमझिम पाऊस, अगदी शहारून टाकणारा तो गार गार वारा, आणि सोबत ती, त्याला हे सगळं एका फिल्मी सारख वाटत होतं… तेवढ्यात तिचा फोन वाजला… घरी पिल्लूने मोठ्याने भोंगा पसरलं होता… ती फोनवरचं म्हणू लागली… ‘आईचं शहाणं बाळ आहेस ना तू..

मी परत येताना तुला एक मोठा फुगा घेऊन येईन…. रडू नकोस पिल्लू हा आणि आजीला त्रासही देऊ नकोस… पिल्लू तिकडून रडत रडत म्हणाली, मला नको तुझा तो फुगा, मला माझा बाबाच पाहिजे, तू त्याला आण पहिला… बरं पिल्लू मी बाबाला आणते हं.. चल बाय… तिने तिचा फोन बंद केला, आणि डोळ्यात आलेलं पाणी पटकन पुसलं…. ह्याला हे सगळं ऐकून एकदम शॉक बसला… ह्याने पटकन आईचं व्हाट्सप उगठलं..आणि तिच्या फोटोच्या खालची महिती वाचली… ती विधवा होती, आणि तिला एक मुलगी होती… हे वाचल्या नंतर तो जरासा नाराज झाला… आणि त्याला स्वप्न तुटल्यासारखं वाटलं… त्याच लक्ष तिच्याकडे गेलं..

आणि ती बिचारी अजुनही डोळ्यात येणार पाणी कटाक्षाने पुसत बसली होती… त्यालाच जरा वाईट वाटलं, आणि तो लगेच म्हणाला.. ‘हा चहा फार छान झाला आहे बरं का..’ चहा मध्ये आल्याचा स्वाद अगदी मस्त पणे उतरला आहे… हा थँक्स बरं का… अश्या या पावसाळी दिवसात असा घरचा चहा दिल्याबद्दल.. ती म्हणाली, ‘अहो धन्यवाद कशाला म्हणताय… मला चहा कधीच एकटीला प्यायला आवडत नाही, मला चहा घेताना नेहमी कोणीतरी सोबत लागतंच… आणि यामुळे चहा घेण्याची मजा काही वेगळीच येते… आणि मग सोबतीचा चहा हा ”आठवण चहा” बनून जातो…’ तो हसत म्हणाला.

अगदी बरोबर आता हि आठवण किती छान की मी रेल्वेत घरचा चहा पिला..’ ती म्हणाली, ‘मी कधीही रेल्वेने प्रवास करते तेव्हा निघाताने, आवर्जुन थर्मास मध्ये चहा घेते… माझ्या नवऱ्याला आवडायचं असं करायला.. मग त्यामुळे मलाही सवय लागली..’ तेवढयात पिल्लूचा परत फोन तिला… ती।म्हणाली तू घेतलं ना माझ्या बाबाला देवाच्या गावावरून सांग लवकर.. हो ग तू पहिला रडणं बंद कर बघू…’ तशी पिल्लू आणखी रडू लागली … आणि म्हणाली तू नेहमी खोट बोलते.. तू आता लगेच व्हिडीओ कॉल लावून दाखव, मला आणि पिल्लू आणखी जास्त रडायला लागली… मग हीने चटकन फोन बंद केला..

आणि तिच्या सासूबाईंनी परत हिला फोन लावला… म्हणाल्या अग ती फार रडतीये ग… तू आता लगेच व्हिडीओ कॉल कर आणि बोल जरा तिच्याशी… आणि यामुळे आता हिलाच रडू यायला लागल… हे बघून तो म्हणाला की काही अडचण आहे का..?? ती गडबडली… आणि म्हणाली नाही काही नाही, पण ती जरा अस्वस्थ होती…. तो म्हणाला… तुम्हला मी काही मदत करू शकतो का.??कोणाची तब्येत बिघडली आहे का..?? तुमचं गाव, पत्ता सांगा माझा कोणी मित्र आहे का तिकडे बघू, असेल तर मी फोन करून मदत करायला सांगतो त्याला…. तिला परत परत सासुबाईचा फोन येत होता… आणि ती तो फोन उचलतच नव्हती..

शेवटी ती ह्याला म्हणाली… तुम्ही थोडी मदत करता का माझी..?? दोन मिनिटासाठी तुम्ही माझ्या मुलीचे बाबा होशील काय..?? तिच्या ह्या प्रश्नाने तो आवक झाला होता, अहो हे कसं शक्य आहे..?? ती रडत रडत बोलत होती,, एका वर्षांपूर्वी माझा नवरा अपघातात गेला आहे… हि पिल्लू त्याच्या खूप प्रेम करायची… तो गेल्यापासून ती सौरभैर झाली आहे… ती चार वर्षाची पोर ती हे सगळं विसरेल अस तिचं वयही नाही… मी कुठं बाहेर निघाले कि, धामाचं धरते की, बाबाला आण म्हणून… आता परवा तिचा वाढदिवस आहे, तर मला म्हणाली की, ‘बाबा आला तरच मी केक कापणार आहे..’ पण परवाच्या संकटा पेक्षा आजच संकट.

जास्त गम्भीर केलं आहे अहो… माझ्या बिचाऱ्या सासुबाई एकट्याने सांभाळतात तिला, पण आज जरा जास्तच त्रासच देतीये ती,… माझ्या आईला ऍडमिट केलं आहे, म्हणून मी गडबडीत भेटायला निघाले आहे तिला, तर जाताना तिला म्हंटल हो बाबाला आणते तर तेच सुरू आहे तिचं.. आणि ती पुन्हा तिच्या पदरात तोंड खुपसून रडायला लागली होती… तो म्हणाला,.. ‘ अहो पण ती चेहऱ्याने ओळखतच असेल ना तिच्या बाबांना..??? ती म्हणाली… नाही अहो माझ्या सासूबाईंनी बळजबरीने माझं नाव वधूवर सूचक केंद्रात टाकलं आहे, आणि पिल्लुच्या मनाची तयारी ही केली की, तुझा बाबा आता वेगळाच दिसतो म्हणून..’

तेवढ्यात तिला सासुबाईंचा व्हिडीओकॉल आला होता… तिने तो उचलला… तर तिकडून मोठ्याने रडणं सुरूच होते. तू खूप खोटरडी आहेस… बघ माझ्या बाबा नाहीच तुझ्याजवळ… गे ऐकताच त्याने पटकन, तिच्या शेजारी उडी मारली… आणि हाय पिल्लु.. अगं तुझ्या बाबाला ओळखलं का तु..?? आपण किती दिवस झालेत भेटून…. तशी पिल्लू हसायला लागली… अरे बाबा तुझी ती मोठी मिशी कुठे गेली..! आणि काळा झाला आहेस तू..?? पण तरीही तू मला खुप आवडतोस ये लवकर घरी तू..

आणि तू आलास तरच आणि फक्त तरच मी माझ्या बड्डेला केक कापणार आहे… तिने लगेच चल पिल्लु मग बोलते नंतर आता खूप गर्दी आहे ग बाळ गाडीत असं म्हणत फोन बंद केला… आणि डोळे मिटून तिझ्या सीटवर डोकं ठेवलं… आणि घळाघळा रडू लागली… त्याला काही करायचे काय सुचेना, मुळात हे सगळंच किती दुःखदायक आहे,… मग थोडं स्वतःला सावरत सावरत ती त्याला म्हणाली,.. ‘खुप आभार हं तुमचे.. चला माझं स्टेशन आलं आहे.. आपण भेटू परत कधी तरी चहाला जमलं तर…. ती ट्रेन मधून उतरली आणि गेली…. मग त्याने त्या रिकाम्या कागदी कपकडे पाहिलं… कप ऑफ टी, सोबतीचा नक्कीच होऊ शकतो..

आपल्याला आता आईला तयार करावंच लागणार आहे… पिल्लुच्या वाढदिवसाला तिने खूप गोंधळ घातला… पिल्लू काही केला केक कापत नव्हती… अग तुझा बाबा त्या ट्रेनने पुढे गेला… त्याच महत्त्वाचं काम होतं ऑफिसचं…. अगं बाळ यईल तो चल.. पिल्लू काही तयार नव्हती… रडून रडून तिने फार वाईट अवतार केला होता., आणि ती फुगून जाऊन अंगणात बसली होती… आणि जोरात ओरडली,, हे माझा बाबा आला.. तो तोच रेल्वेतला माणूस होता, हि घराच्या दरवाज्यातून बघतच राहिली.. त्याने पिल्लूला उचलून घेतलं, आणि तिच्याजवळ येत येत म्हणाला, ‘मला माझं पूर्ण आयुष्य, तुझ्यासोबत तो अद्रकचा चहा प्यायला आवडेल..

तुला आवडेल ना..?? वाचकहो चहा सोबतीचा झाला म्हणुन आणखी चवदार होतो नाही का..???

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!