मुलीच्या सासरचे यांच्या सोबत असे ही वागले की वडील घरी येऊन ढसा ढसा रडू लागले..

वडिलांनी त्यांच्या मुलीचा एका चांगल्या मुलाशी साखरपुडा केला,, आणि तिचा होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व एका चांगल्या घरचा, आणि नवऱ्या मुलाचे आई-बाबांचा स्वभाव ही घरकुलाला शोभावा असाच होता… बाबांना याचा खुप आनंद होताच, पण त्यांच्या मुलीला मिळणाऱ्या एका चांगल्या सासरवरुन, त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझही कमी झाले होते… नंतर एक दिवस लग्नाच्या आधी, मुलांकडून मुलीच्या बाबांना त्यांच्याकडे घरी जेवणाकरीता अमंत्रण आले होते…

मुलीच्या बाबांची तब्येत थोडी खराब होती, तरी पण ते तब्येतीचे कारण मुलीच्या होणाऱ्या सासरकडच्यांना न देता आले नाही, त्या मुलांकडच्यांनी त्यांचे मोठ्या आदर आणि सत्काराने स्वागत केलं होते… मग मुलीच्या बाबांसाठी चहा आणण्यात आला, त्यांना मधुमेह होता त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साखर वर्ज्य करायला सांगितले होते. पण पहिल्यांदाच मुलीच्या लग्नाआधी सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे, आणि त्यांच्या घरात असल्याने बाबांनी गपगुमान चहाचा.

कप हातात घेतला होता, आणि त्यांनी चहाचा पहिला घोट घेताच, त्यांना अचानक आश्चर्य वाटले, त्या चहात साखर अजिबात नव्हती… शिवाय त्या चहामध्ये वेलदोड्याचा सुगंधही खुप येत होता, त्यांनी जरा विचार केला की, ही लोके पण आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात भावतेक… आणि दुपारचं जेवण ही घरच्या सारखच होतं.. आणि दुपारचं जेवणा झाल्या नंतर त्यांना थोडा आराम मिळावा, म्हणून त्यांना डोक्याखाली दोन उशा व एक पातळ पांघरूण ही दिल होत.

त्यांनंतर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आले होतं… आणि मुलीच्या होणाऱ्या सासरहून येताना, बाबांना त्यांच्या इतक्या आदरतिथ्यात घेतलेल्या काळजी बद्दल त्यांना विचारल्याशिवाय राहवलं नाही… आणि त्यांनी मुलांकडच्यांना याविषयी विचारले, ‘तुम्हाला मला काय खायचं आहे, आणि मला काय प्यायचं आहे, माझ्या तब्येतीला काय चांगलं आहे, हे आपल्याला एवढया चांगल्याप्रकारे कसे काय माहिती आहे..? यावर ते म्हणाले, ‘आज तुम्ही येण्यापूर्वी तुमच्या.

मुलीचा फोन आला होता आम्हाला, ‘ती म्हणाली की, माझे चांगला स्वभावी बाबा तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत, आणि त्यांच्या तब्येतीकडे बघता, आपण जरा त्यांची काळजी घ्यावीत ही विनंती आहे आपल्याला.. ‘आणि हे ऐकून बाबांचे डोळ्यात पाणी आले होते… बाबा जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांच्या घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या फोटोवरील हार त्यांनी काढून टाकला.. आणि हे पाहून पत्नी लगेच म्हणाली,, ‘अहो हे तुम्ही काय केलं..?? यावर डोळ्यात.

पाणी आणीत, मुलीचे बाबा म्हणाले, ‘माझी सतत काळजी घेणारी माझी आई आजही या घरात आहे.. आणि ती अजून कुठेच गेलेली नाही….. ती माझ्या लेकीच्या रुपात इथेच आहे या घरात… आपण सर्वच म्हणतो.. मुलगी ही शेवटी परक्याचे धन असते.. एक दिवस ती आपल्याला सोडून जाईलचं.. पण मी आज जगातील सर्व आई-वडिलांना सांगतो की, मुलगी ही कधीही तिच्या आई-बापाच्या घरातून कुठेही जात नसते, तर ती त्यांच्या हृदयात राहत असते…

आणि आज मला अभिमान वाटतो की, मी एका “मुलीचा बाप’ आहे तो..!!

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!