दुसरे डोहाळे जेवण करणे कधी ऐकले आहे का नसेल तर नक्की पहा याचे बायकांनी काय केले..

अजयने त्याच्या आईला जरा लवकरच बोलवलं होत.. म्हणून आई आज दुपारीच पोहचली होती. वर्षा तिच्या ऑफिसला गेलेली होती… पण श्री स्वतः त्याच्या आईला आणायला स्टेशनवर गेला होता, आणि स्टेशन वर गाडीतबसताच आईने त्याला विचारलं, ‘काय रे बाळ वर्षाची तब्येत बरी आहे ना..?? अग आई वर्षाची तब्येत अगदी ठणठणीत आहे, पण आता येत्या चार दिवसांनी, तिला आठवा महिना लागणार आहे, आणि मला त्या आधी तिचं सरप्राईज डोहाळे जेवण करून घ्यायचा आहे बघ..

आणि म्हणून मी तुला आणि वर्षाच्या आईला दोघींना ही बोलावलं आहे, आणि हे ऐकून आई हसायला सुरू झाली… अरे वेड्या, दुसऱ्यांदा गरोदर असलं की नाहीत करत डोहाळे जेवण, ते फक्त सुरवातीलाच करतात रे बाळा… अजय म्हणाला, ‘ मला वाटलंच होतं की तू असं म्हणणार.. पण तु मला सांग की का करता ग हे डोहाळे जेवण..?? अरे का म्हणजे, ‘अरे ती आई होणार आहे म्हणून… तिने सृष्टीचा निर्मितीचा क्षण आनंदाने स्वीकारावा, मग तिला आनंद मिळावा.

आणि आपलीही सृष्टी कशी बहरली आहे, आणि हिरवीगार दिसते,, तसाच बहरण्याचा तिचा क्षण आहे, आणि नवनिर्मितीचे ते तेज तिच्या चेहऱ्यावर झळकून दिसत असते.. मग तिलाही ह्या आपल्या धरणी माते सारखं हिरवं वस्त्र घेतात, आणि म्हणून तर हिरव्या रंगाची साडी आणि त्या साडीची आठवण मग तिला आयुष्यभर त्या गोड आठवण आठवून देतात.. आणि तिझ्या बाळाला वेगवेगळ्या चवी हव्या असतात, आणि तिचे तिझे डोहाळे असतात.. आणि त्याच्या सोबतीला.

ते हलके झोके आणि ती आनंदाची गाणी..’ आई गुणगुणत होती… माझ्या लाडक्या राणीला लागले डोहाळे.. पुरवा सोहळे रामराया.’ आणि हे आई हेच गाणं मी परवा कुठंतरी ऐकलं होत.. आणि मग मला वाटलं की फक्त पहिल्याच वेळी एवढा मोठा थाट करायचा त्या बाळाच्या आगमनाचा, मग दुसर्या बाळाच्या वेळी का नको..?? अग आई आताही तिला आनंदी रहायच आहे ना, आणि त्याही बाळाला तिचे आनंदाचे ठोके ऐकायला हवेत ना.. आणि पहिल्या वेळेस ती नव्हती.

एवढी खम्बीर, पण आता ती एक आई आहे, पण तरीही आपण हा सोहळा करायला काय हरकत आहे सांग ना.. आता बघ आपण करतोच की सगळे सणवार परत परत, तसचं हे पण दुसर्यांदा साजरा करायला काय हरकत आहे आपल्याला… आणि म्हणून मी मग ठरवलं आहे की, तिला काही सांगायच नाही म्हणून… नवीन झोपाळा, आणि फुलांची वाढी ही सगळी ऑर्डर देऊन झालं आहे.. चल आता आपण फक्त एक मस्त हिरवीगार साडी घेऊया तिच्या साठी…

आणि त्याबरोबर एक रेडिमेड ब्लाउज ही घेऊया… आणि उद्या एकदाचं हा सोहळा करून ठाकू… हे ऐकून आईला मनोमन समाधान वाटलं, की एवढा छान विचार आपल्या मुलाच्या मनात आला.. आई होतानाच्या त्या आठवणी कितीतरी सुंदर असतात, आणि आजही त्यांना त्यांच ते डोहाळजेवण आठवत होतं… आणि त्यांना जरा हसू आलं… तेवढ्यात त्यांची गाडी एका साडीच्या दुकानासमोर जाऊन थांबली,, त्या दोघांनी खूप हौसेने एक हिरवीगार सुंदर साडी निवडली वर्षासाठी…

आणि दुसऱ्या दिवशी अजयच्या सासुबाई पण आल्या घरी, आणि वर्षाला काही कळेचना की ह्या दोघी का आल्या आहेत ते..?? पण त्या दोघींनी वेगवेगळी कारणे सांगितली तिला… आणि ते ऐकून वर्षा तिच्या ऑफिसला निघून गेली, आणि ती गेल्या नंतर मग त्यांची ह्या सोहळाची मोहीम सुरू केली… अजयच्या सासुबाईला ती जावनाची कल्पना आणि अजयने केलेली सगळी तयारी खूप आवडली होती… अजय स्वतः आर्टिस्ट असल्याने … त्याने होडी, चंद्र, रथ ह्याचे सुंदर सुंदर.

सेट तयार केले होते.. आणि तेही त्याने सगळं मांडून दाखवले, मग काय वर्षाच्या आईच्या डोळ्यात पाणीच आलं होतं.. विहिणबाई नशिब लागतं हो, त्यावर हसत हसत अजयची आई म्हणाली, ‘अहो या नशीबापेक्षा नव्या विचारांनी, आणि कल्पनांनी घ्यावं लागतं आपल्याला… आपल्या तर हे कधीच डोक्यातचं, आलं नाही की आपण दुसरं डोहाळजेवण ही करू शकतो ते..’ आणि दोघीही हसल्या खळखळून… आणि त्यांची छोटीशी चिमणी दुपारी शाळेतून घरी आली, आणि हे सगळं आईला.

बसायला केलं आहे, म्हंटल्यावर तर तिला खूप हसूच आलं… मग तिनेही तिच्या आजीला रांगोळी काढायला मदत करू लागली… वर्षा ऑफिसमधून घरी येण्यापूर्वी पाहुण्यांनी घर गच्च भरलं होतं… तिच्या सगळ्या मैत्रिणी, आणि त्यांचे नातेवाईक ह्या सगळ्यांना हा थाट पाहून जरा वेगळंच वाटलं होतं… मांडणी, सजावट अगदी छान होतं, पण दुसऱ्यांदा डोहाळजेवण कसं..?? असा प्रश्न अनके वयस्कर बायकांना पडला होता… आणि मला असा नवरा हवा, म्हणून किती तरी.

मुलं देवाला साकडं घालत होत्या… वर्षा घरा बाहेरच चपलांचा ढिग पाहून भांबावली होती, आणि मग सनईचे सुर, तो फुलांचा घमघमाट तिला एकदम प्रसन्न वाटलं.. ती आतमध्ये शिरताच सगळ्यानी टाळ्या वाजवल्या.. आणि समोरचा सजवलेला झोपाळा पाहून तिला सगळं कळून चुकलं होतं… अजयचं नेहमी सारखं ते आगळंवेगळं सरप्राईज, आणि मग तिला तिच्या आईने फ्रेश होऊन यायला सांगितलं.. आणि तिच्या आईने देवापुढे बसवून तिला ती हिरवीगार साडी तिच्या ओटीत घातली..

अगदी तिला आवडतो, तसाच तो गर्भरेशीम हिरवा रंग.. तीझ मनोमन सुखावल होतं… आधीच तिच्या गर्भाच ते तेज आणि आता त्यात हा सगळा आनंद… ती साडी नेसताच तिची मैत्रीण ती फुलांचे दागिने घेऊन आली, आणि तिला घातले… ते दागिने घालताना तिला आठवलं की, आपण पहिल्या डोहळजेवणाला एवढं एन्जॉय केला नव्हता… कारण ती त्यावेळी घरात नवीन होती, त्यात सगळ्यांचे स्वभाव एवढे जुळले नव्हते… बऱ्याच वेळा घरात होणारे वाद, रुसवेफुगवे आणि त्यात.

ते न पेलवणार हा गर्भारपण, पण आता आपण एका बाळाची आई आहे.. आणि अतिशय विचारपूर्वक हे गर्भारपण आपण स्वीकारलं होतं… त्यामुळे मन आधीच खूप आनंदी होतं, आणि त्यात हा नवा आनंद….. आणि त्याच आंनदी चेहऱ्याने ती झोपाळ्यावर, रथावर, चंद्रावर, आणि होडीतही बसली होती…. तिची ट्रीटमेंट ज्या डॉक्टर कडे चालू होती, त्या पण आल्या होत्या… त्यांनाही हे सगळं खुप खुप आवडलं होतं, आणि त्यांनी आवर्जून दोन शब्द व्यक्त केले..

बाळाला जन्म देताना होणारे त्रास तिच पेलणार आहे… पण प्रत्येकांनी असं जर आईची आनंदाच्या क्षणांनी ओटी भरली, तर हे क्षण तिच्या त्या वेदनादायी प्रवासात नक्कीच बरोबर असतील..’ दोघी विहिणबाईनी मिळून ..’ लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराया” हे गाणं म्हणत होत्या… आणि तिने भावूक होऊन अजय कडे बघितले.. आणि बरोबर त्याच क्षणी तिच्या पोटातील बाळ पण मासोळी सारखी हालचाल करून त्याचा आनंद व्यक्त करत आहे असं तिला जाणवलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!