आई वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने एवढा मोठा त्याग केला की पाहून तुमचा थरकाप उठेल..

मुकेश मुंबईत एका मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीत एका मोठ्या पदावर रुजू होता.. तो त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक होता, आणि दिसायलाही खुप देखणा होता.. आणि त्याचे त्याच्या कंपनीतील एका मुलीवर खुप प्रेम होते, पण ते एकतर्फी होते.. तिचे नाव मेघा, तीही त्याचं कंपनीत इंजिनिअर पदावर, 2-3 महिन्यांआधी रुजू झाली होती.. ती दिसायला खूप सुंदर होती,, तिचा नाजूक सडपातळ बांधा,, गव्हाळ वर्ण, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तिझा स्वभाव खूप शांत होता..

आणि यामुळे तिला बघताच मुकेशला ती फार आवडली होती, पण तो आजपर्यंत तिला प्रपोज करू शकला नव्हता, कारण की, ती कोणाशी जास्त बोलायची नाही.. ती कामाव्यतिरिक्त कुणाशीही लय बोलायची नाही… तरी पण त्याने अगदी हळूहळू तिच्याशी ओळख वाढवत गेला. कारण ती दोघेही येताजाता एकाच बस ने जायचे, त्यामुळे कामापुरते हसणे बोलणे होते होतं,, बस मध्ये गर्दीच्या वेळी तो तिझ्या साठी जागा धरायचा.. आणि तिची काळजी घ्यायचा..

परंतु त्याची तिला प्रपोज करायची, हिम्मत काय झाली नव्हती. आणि गावाकडे त्याचे आई-वडील त्याच्या लग्नासाठी त्याला खूप जबरदस्ती करत होते.. आणि मुकेश च्या आई-वडिलांनी त्याच्या साठी मुली बघणे पण सुरु केले होते,, मुकेशच्या बाबांनी लग्नाचा विषय काढला, तर तो नेहमी टाळा टाळ करत असे, पण किती दिवस चालणार होत हे.. तो खुप कोंडीत सापडला होता.. कारण तो मेघावर खुप प्रेम करत होता.. आणि त्याने तिला पाहील्यापासून त्याला ‘मेड फॉर इच इदर’ ची फीलिन्ग येत होती..

आणि कालच त्याला बाबांचा फोन येऊन गेला होता. ते म्हणत होते कि, तू आता येत्या रविवारी गावी ये, मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आहे म्हणून, आणि हे ऐकल्यावर तो बाबांशी फार काही बोलला नाही.. त्याने आपला तो नाराजी होकार त्यांना कळविला होता, त्याला यावेळी मात्र गावी जाणे भागच होते.. त्याला काहीच कळेना कि आता आपण काय करावे ते..?? हा विचार करत करत तो ऑफिसला गेला. आणि तो बस स्टॉपवर गेला आणि त्याला मेघा दिसली, त्यांची नजरानजर होताच.

त्या दोघांनीही एकमेकांना स्माईल दिली,, आणि नंतर काही वेळात बस आली.. दोघेही त्या बसमधे चढले, पण आज बस मध्ये जरा जास्तच गर्दी होती,, आणि त्यामुळे ते दोघेही एकमेकांपासून जरा लांब उभे होते.. मुकेश आज तिला खुप निरखून पाहत होता,आणि तिचे लक्ष आपल्याकडे येताच तो नजर फिरवून घेत होता.. आणि एक दोनदा असे झाले होते… तिच्याही ते लक्षात आलं होतं., त्यांचा स्टॉप येताच ते दोघेही उतरले, आणि ऑफिसकडे जायला बरोबर निघाले..

मुकेशच्या डोक्यात काहीतरी सुरु होते, आणि हे तिला त्याचा खिन्न चेहरा समजले होते… पण ती काहीचं बोलली नाही,, आज मुकेश शरीरानेच कामावर होता, पण आज कामात त्याचं मन नव्हतं,, आणि तो फक्त ५ वाजण्याची वाट बघत होता..,, आणि आता ठीक ५ वाजता बेल वाजली, आणि त्याला हायसं वाटलं.. तो गडबडीत बाहेर पडला… आणि मेघाची वाट बघत थांबला होता.. आणि ती येतांना दिसल्यावर लगेच त्याने तिला हात दाखविला… तिनेही तिची मान हलवून त्याला स्माईल केलं..

आणि ती जशीजशी त्याच्या जवळ येत होती,, तसे त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते… ‘चला आपण निघू या..’ मेघा म्हणाली.. हो चल…’ तो हडबडत म्हणाला… ते दोघे जरा पुढे जाताच तो तिला म्हणाला… ‘ मेघा बस यायला अजून थोडा वेळ आहे.. आणि त्या वेळात आपण दोघे थोडी कॉफी घेऊ या का..?? मेघाने होकारार्थी मान हलवून.. ‘चालेल.. जाऊया या’ मेघा म्हणाली…. तेथील जवळच्याच कॉफी शॉप मध्ये ते दोघे गेले., आणि बसण्यासाठी नेमका त्याने शेवटचा टेबल निवडला..

ते दोघेही बसले,, मुकेशने कॉफी ऑर्डर केली…. आणि हलक्या आवाजात म्हणाला, ‘मेघा मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे,’
ती म्हणाली, ‘बोला ना..’ त्याला काही कळेना, काय बोलावे, आणि कशी सुरुवात करावी…… आणि शरीरातील सर्व शक्ती एकत्र करून तो बोलला, ‘मेघा, तू मला खुप आवडतेस,.. आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे… आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय आहे…. मुकेश एका दमात सगळं बोलून गेला होता.. मेघा मुकेशकडे बघतच राहिली..

तीही आतून थोडी धास्तावली होती… कारण की, हे झालेल सगळं तिच्याकरिता अगदी अनपेक्षित होतं… मुकेशला आता तिच्या उत्तराची अपेक्षा लागली होती.. तो आतून खूप बेचैन होता.. की, तिला वाईट तर वाटले नाही ना, आणि ती आता माझ्याबद्दल काय विचार करेल… तो अधून-मधून तिच्याकडे पाहत होता, आणि तिच्या एक्सप्रेशनवरून आढावा घेत होता.. तितक्यात वेटर त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आला..
त्या दोघांनीही कप हातात घेतले…

आणि मग थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही… आणि मग थोड्या वेळाने मेघा बोलली… मुकेश मला तु माफ करा,, पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही..’ तिने स्पष्टपणे त्याला नकार दिला होता.. तीने तिझी कॉफी संपवली, आणि कप टेबलवर ठेऊन, म्हणाली की, मला थोडं मैत्रिणीकडे जायचे आहे , माझं थोडं काम आहे तिच्याकडे… आणि ती कॉपीशॉप मधून निघून गेली… तिला जाताना मुकेश बघतच राहिला, आणि त्याला काहीच कळेना, की आता काय करावे..

त्याने काउंटर वर बिल दिलं आणि तो बस स्टॉप कडे निघाला… तिचा नकार ऐकून मुकेश खूप उदास झाला होता त्यावेळी, त्याला अपराधीपणा जाणवत होता… आपले काय चुकले का,? असे उलटसुलट विचार त्याच्या मनात येऊ लागले.. थोड्या वेळात बस आली, आणि तो बसमधे गेला, आणि त्याच्या रूम वर आला… आणि त्यांनंतर त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं… तो न जेवताच त्याच्या खोलीत बेडवर झोपला होता, पण त्याला झोप हि येत नव्हती. आणि सतत विचार केल्यामुळे.

आता त्याचे डोकेही दूखत होते… तिने मला नकार का दिला.?? या प्रश्नाचे उत्तर त्याला हवं होतं.. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बसस्टॉप वर त्याला मेघा दिसली नाही… मग तर त्याचे विचारचक्र अजून जोरात सुरु झाल होतं… ती आज का आली नसेल, तिला काय झालं असेल,, या विचारांनी त्याचं डोकं भांबावलं होतं.. आणि त्याचा स्टॉप कधी आला हे त्यालाच कळले नाही… तो त्याच्या ऑफिस मध्ये आला.. सगळ्यात आधी त्याचे लक्ष मेघाच्या टेबलकडे गेले, आणि तो अवाक झाला होता.

कारण, मेघा आज त्याच्या आधीच आली होती ऑफिस ला, आणि आपल्या कामात मग्न होती.. आणि हे त्याला थोडंस बर वाटलं, तो त्याच्या खुर्चीत बसला… आणि त्याने कॉम्पुटर सुरु केले, पण आज त्याचे कामात अजिबात लक्ष नव्हतं, आणि त्याचं डोके, हात बधिर झाले होते.. त्याची रात्री झोपही झाली नव्हती, आणि सतत विचार केल्यामुळे त्याचे डोकेही खुप ठणकत होते…… पण त्याला नकाराचे नेमके कारण कळाल्याशिवाय तो शांत बसणार नव्हता..

त्याचे ऑफिस सुट्टल, आणि तो बाहेर पडला, आणि मेघाची वाट पाहू लागला… मेघा बाहेर आली, पण आज तिने त्याच्याकडे लक्ष ही दिले नाही.. आणि तेथील निघून गेली, ती थोडं पुढे गेल्यावर मुकेश तिच्या बरोबरीने चालायला लागला… आणि तिला म्हणाला, ‘मेघा मी तुला आपल्या लग्नासाठी बोललो होतो.. पण तू मला स्पष्टपणे नकार दिला होतास, मला हे माहित नाही की, तू माझ्याबद्दल काय विचार करते, पण तुला माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे..

एका मुलीला योग्य असा जोडीदार म्हणून ज्या त्या अपेक्षा असतात, त्यामध्ये मी कुठेतरी कमी पडतो, आणि तेचं मला जाणून घ्यायचे आहे बघ.. तुझ्या नकारामागे काहीतरी कारण आहे ते मला जाणून घ्यायचे आहे… काल तू मला नकार दिल्यापासून माझी काय अवस्था झाली आहे, हे तुला समजणार नाही… प्लीज मेघा तू एक मैत्रीण म्हणून तरी मला सांगू शकतेस की, प्लिज… मेघा काहीतरी बोल गं..’ मेघा जरा पुढे जाऊन थांबली आणि म्हणाली,, ‘हे बघा मुकेश तुम्ही जे काही समजत आहात.

तसं काहीच नाही… आणि तुम्ही कोणत्याही मुलीसाठी एक उत्तम जोडीदार म्हणून अगदी परफेक्ट आहात… पण हा, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत..’ मुकेश अजून जास्तच गोंधळला होता.. आणि तो म्हणाला,, ‘पण का गं’ मला कारण तरी सांग ना..? मुकेश तिला वारंवार हेच विचारत होता.. मेघा अगदी शांत झाली होती, आणि हे बघून मुकेश खूपच अपसेट झाला आहे… हे त्याच्या चेहऱ्यावरून तिला अगदी स्पष्ट दिसत होतं.. आणि नंतर ती त्याला म्हणाली.

‘चला आपण थोडी कॉफी घेऊ’. काल गेलेल्या हॉटेल मध्ये ते गेले, मुकेशने कॉफी ऑर्डर केली.. पण मुकेश तिच्या उत्तराची खूप आतुरतेने वाट पाहत होता… मेघा बोलायला लागली, ‘हे बघा मुकेश, मला तुमचे मन दुखवायचे नाही.. पण माझी विवशता आहे. प्लीज तुम्ही मला समजून घ्या.. ना, त्यावर मुकेश म्हणाला,, ‘ मेघा मी समजू शकतो, तु मला नकार दिलास त्यामागे निश्चितच काही तरी कारण असेल… तु कमीत कमी माझी एक मित्र म्हणून, तर तु तुझा प्रॉब्लेम माझेशी.

शेयर करावा असे मला मनापासून वाटते..’ ‘ठीक आहे मुकेश’ ती म्हणाली.. ‘माझ्या घरी माझे म्हातारे वडील आणि मी असे आम्ही दोघेच राहतो… माझ्या आईला जाऊन आता बरेच दिवस झाले आहेत… मला दोन मोठे भाऊ आहेत, त्या दोघांचीही लग्न झाली आहे, पण ते दोघे वेगळे राहतात.. माझ्या बाबांना मागीलाच वर्षी पॅरालीसीसचा अटॅक आला होता, त्यामुळे ते पूर्णवेळ अंथरुणावरच असतात… ते स्वतःहून त्यांचे जेवणही करू शकत नाही… माझे मोठे भाऊ अधून-मधून.

बाबांना भेटायला येतात घरी, आणि परत निघून जातात… पण माझ्या बाबांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीच तयार होत नाहीत… त्यामुळे बाबांची पूर्ण जबाबदारी माझेवरच पडली आहे, आणि त्यामुळे मी लग्न केल्यावर त्यांचे काय होणार… मी लग्न केल्यावर माझा होणारा तो नवरा त्यांची जबाबदारी घेईल का..?? आणि त्यांचा स्वीकार करेल का..?? आणि त्याच्या घरचे लोक हे सगळं मान्य करतील का..?? आता तुम्हीच मला सांगा की, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असता.

तर तुम्ही काय केले असत सांगा… आणि हे बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.. मुकेश अगदी शांतपणे ऐकत होता… तो निशब्ध झाला होता. आणि नंतर थोडावेळ कुणीच काही बोलले नाही… मुकेश मनोमन विचार करीत बसला होता,, आपल्या कर्तव्याची जाणीव जर तिच्या त्या मोठ्या भावांना असती, तर आज मेघा सुद्धा तिच्या वैवाहिक जीवनात किती सुखी झाली असती… आणि किती मोठा त्याग करत होती ती… अगदी खरं एक मुलगीच असं करू शकते..

त्याला तिच्याबद्दल खूप अभिमान वाटला… आणि तो म्हणाला,, ‘मेघा खरोखर तू खूप ग्रेट आहेस.. मला खूप गर्व आहे कि, माझी तुझी निवड केली.. एक मुलगा म्हणून मी तुझ्या बाबांची जबाबदारी घ्यायला तयार आहे… तु आता तरी माझ्याशी लग्न करशील का.?? आणि त्याने तिच्या नजरेत बघत विचारले… ती जरा लाजली आणि हसून नजरेनेच त्याला होकार दिला. त्याने लगेच तिचा हात स्वतःच्या हातात घेतला… आणि तो कायमचा… ते कॉफीशॉप मधून दोघेही बाहेर पडले.

आणि दोघे हातात हात घालून चालू लागले.. आणि आयुष्याच्या एका नव्या वाटेवर एकमेकांच्या साथीने निघाले…..तुम्हाला या लेकी बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!