सुनेला मुलबाळ होत न्हवते म्हणून सासूने वासुदेवासोबत मिळून केले असे काही की पाहून तुम्हाला आ-श्चर्यच वाटेल..

‘रामराया कल्याण करील तुझं… अरे तुझी आई तर खुप प्रेमळ आहे. आणि तुझी बायको तर साक्षात लक्ष्मी आहे, यांच्या कृपेनेच तू ही सगळी प्रगती केली आहे तुझ्या आयुष्यात… वासुदेव हे बोलत होता, तेव्हा लगेच लखनने त्याला अस बोलू नकोस म्हणून हाताने खून करून सांगितले…’ अरे तुला काय वाटलं वासुदेवा, तुझी ही बडबड ऐकायला आलो नाही आहे बाहेर मी.. तू छान सुंदर भजन म्हणतोस म्हणून माझ्या आईने बक्षीस दिलंय आहे तुला… आणि हे घे दहा रुपये आणि हा गरमागरम चहा पी , वासुदेव लखनकडे बघत बघत हसला… तो म्हणाला माझं गाणं आवडलं तुम्हाला पण माझे बोलणे नको वाटतंय काय..

पण मी एक सांगतो, माझ्या ह्या बडबडीने तुम्ही जाऊन बघा घरात तुम्हीची आई आणि बायको कश्या आनंदी झाल्या आहेत त्या… आता निघतो मी म्हणत वासुदेव गेला..’ रामाच्या पारी दान पावलं…दान पावलं…” लखन मनातल्या मानत पुटपुटत आत आला.. ह्या दोघी तरी मला कधी पटल्या नाहीत.. दोघी नेहमी दुरमुखलेल्या असतात आणि हा म्हणतो की, एक लक्ष्मी आणि एक खूप प्रेमळ आहे.. अरे स्वतःच्या कष्टावर कमावतो मी आणि ह्यांच्या मुळे कसली येते लक्ष्मी…. हे म्हणत म्हणत तो घरात आत शिरला.. तसं घरातील वातावरण बदललेलं आहे असं जाणवलं त्याला… तिची आई काहीतरी हसत हसत सांगत होती.

तिच्या सूनबाईच्या कानात.. लखनला खूप आश्चर्य वाटलं, अरे या दोघींचे चेहरे तर नेहमी सुतकी असतात, आणि आज इतके खुलले कसे काय..?? आणि त्यानेही मुद्दामच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. लवकर आवरून तो त्याच्या ऑफीसला निघाला… दुपारी जय माऊली थोडे पाणी देता ना… असा गेटमधून आवाज आला.. तो सकाळचाच वासुदेव होता… लखनची आई पाणी घेऊन घराबाहेर आल्या… तो म्हणाला काय माऊली जमलं का सकाळचं नीट मला..?? लखनची आई हसली आणि म्हणाली.. खूप छान पण पूर्वी तुझे वडिल म्हणायचे तसं काय जमलं नाही तुला…. तू त्यांना घरी गेल्यावर विचार की..

जोश्याच्या घरातल्या हाका काय होत्या,….. वासुदेव हसला, ‘ अहो माऊली खरंच कमालच आहे तुमची,, काही माणसं तर बाईला कचराच समजतात जगण्यात… माझ्या बापाच्या हाकेत त्यांनी सगळं सांगितलं होतं मला… आता उद्या मी सगळं नीट पाठ करून येणार आहे… बरं येतो आता मी उद्या… आज सकाळी लखनची सुरुवात चहात साखर नाही, म्हणून बायकोच्या अंगावर कप फेकेन्यापासून झाली होती… ती बिचारी तोंड पडून, घरातील बाकीच कामं करत होती… तेवढ्यात घरबाहेरून हाक आली… ‘रामाच्या पारी….. जोशींच्या दारी’….. आली वासुदेवाची स्वारी..’ लखन आधीच खूप चिडलेला होता…

तो घराच्या गॅलरीत गेला आणि ओरडला, दररोज तुला पैसे मिळणार नाहीत… चल निघ बघू येथून..’ वासुदेव हुशार होता, त्यानेही लगेच संवाद सुरू केला… अहो साहेब तुमची हुशारी तर सगळ्या जगात चांगली आहे… आणि तुमची बायको तर लक्ष्मी चे रुप आहे.. आणि तीच खूप जास्त कष्ट करते, म्हणूनच तुमच्या आयुष्यात सुख नांदत आहे… आणि फक्त तिच्यामुळेचं तुमच्या घराचं वैभव वाढेल आहे… तुमची हुशारी आणि त्याला तिची साथ मोलाची आहे… आणि त्यावर तुम्ही आई तर प्रेमाचा पाझर आहे… तुम्ही ह्या दोघींशी छान वागलं की, तुमच्या जीवनात सुखच सुख आहे बघा..’ तुम्ही मला काही पण देऊ नका.

साहेब पण हे पक्क मनात ठेवा की, तुमचं सगळं असंच आहे ते… एवढं सांगून तो वळाला आणि पावली खेळवत पुढच्या दारी पळाला… लखन गॅलरीतून घरा आत आला.. मघाशी तोंड पडून फिरणारी ती आता अगदी फ्रेश दिसत होती… आणि त्याची आईदेखील खूप प्रसन्नपणे देवघरात पूजेला बसली होती… आणि हे पाहून त्याच्या मनात वासुदेवाचे ते शब्द घुमत होते.. आणि त्याच लक्ष बायकोकडे गेलं.. आणि ती तिच्या कामात मग्न झाली होती, पण तिचा चेहरा अगदी आनंदी होता… स्वतःच्या मनाशीच काहीतरी हसणारा होता.. लखन ला वाटलं की हिने त्या वासुदेवाच बोलणं ऐकलं असेल काय.. हिच्या पायामुळे घरात लक्ष्मी आहे.

हे ऐकून तर हि एवढी खुश नसेल ना.. पण खरंच मागल्या ह्या पाच एक वर्षात तिने मला खुप साथ दिली आहे… तिचे आपल्याला जास्तीचे खर्च नाही.. त्यात काही अडीअडचणीला तिने आपल्याला खूप साथ दिली आहे हेही खरं… मी कितीही चुकलो, तरी ती नेहमी मला समजून घेते… खरंच तो वासुदेव सांगतो ते काही सगळं खोटं नाही… आणि नंतर आईकडे त्याच लक्ष गेलं… आई खूप प्रेमळ आहे असं म्हणाला वासुदेव… खरं तरी आपणच तिच्यावर रागवत असतो… तिला गावाकडून इकडे आणलं तरी तिने ऍडजस्ट करून घेतले… आपण दिवसभर किती चिडचिड करतो, पण ती दिवसभरात घटकाभर बसतेच मला जवळ येऊन…

ह्या अनेक विचारांनी त्याच त्यालाच छान वाटाय सुरू झालं… आणि तेव्हा पासून तो ही दररोज वासुदेवाच्या हाकेची वाट पाहत बसायचा… आणि त्याला स्वतःमध्ये आणि बायको मध्ये होणारे बदल जाणवत होते…. तिला ह्या महिन्यात एकदा ही मानसिक उपचाराला डॉक्टरनकडे न्यावं लागलं नाही… घरातील सगळं वातावरण अगदी बदलून गेलं होत… तो एकदा त्याच्या आईला म्हणाला, ‘ अगं आई तुला हे दिसतंय का, मी आणि तुझी सून किती बदलून गेलो आहे ते..?आणि तू देखील मागल्या काही दिवसांपासून खूप आनंदी आहेस ना… आई हसली आणि त्याचा हात हातात घेऊन बोलू लागली…

‘चाळीस एक वर्षांपूर्वी माझाही अगदी असाच संसार होता, मी तेव्हा नवी नवरी होते, माझ्या सासुबाई म्हणजे तुझी आजी आणि तुझे रागीट बाबा.. तुझे बाबा कोणत्याही गोष्टीवरून माझ्या नेहमी चिडायचे… आणि त्यांना घाबरून घाबरून माझं मन भित्र झालं होतं.. आणि त्यावेळी आतासारखे असे मनासाठी डॉकटर नव्हते रे बाळा.. त्यावेळी एक दिवस अचानक आपल्या घरी वासुदेव आला.. माझ्या सासूबाईंनी मला घरातील थोडं धान्य त्याच्या झोळीत टाकायला संगितले.. सकाळची वेळ होती, घराबाहेर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता… वर आकाशात केशरी रंग सांडून, तो सूर्यदेव येतोय हे सांगत होता.

आणि त्याच्या सोनेरी प्रकाश आपल्या अंगावर पडत होता…सगळं कसं अगदी प्रसन्न होतं.. आणि त्यात ती पूर्णपणे मोरपिसांची टोपी घालून आणि तो पांढराशुभ्र वेष धारण करून… तो वासुदेव.. मी धान्य देताच तो म्हणाला.. ‘लक्ष्मी आहेस ग तू.. आणि फक्त तुझ्यामुळं हे घराणं फार पुढं जाईल बघ तू… सगळी सुख तुझ्या पायाशी येईल… आणि त्याच हे बोलणं ऐकून मन कस आनंदी झालं होत… कारण आजपर्यंत मनाला कुणीच अस बोललं नव्हतं… तुझे बाबा नेहमी रागाने माझ्याशी वाईटच बोलायचे,, त्यांच्या त्या रागीट सभावणे घाबरून गेलेली मी, वासुदेवाच्या ह्या चांगल्या शब्दांनी खूप आनंदून होऊन गेले…

माझं मन स्वतःलाच मान द्यायला शिकलं होतं त्यानंतर….. सासूबाईंनीही ह्या वासुदेवाच्या हाकांचं औषध लागु पडलं होतं.. आता त्याही रोज पहाटे लवकर त्या वासुदेवाच्या हाकेकडे कान लावून बसायच्या… मी त्याच्या त्या शब्दांनी रोज खुलत फुलत गेले… माझा आत्मविश्वास वाढला, तुझ्या बाबांना ही हळूहळू माझातला बदल जाणवला… आणि त्या वसुदेवामुळे सगळं काही बदलून गेलं… माझ्या सासुबाई म्हणाल्या, ‘ह्या वासुदेवाला आपण क्षणभर दिसणारा देवच समजू या… त्याने आपल्या दारात येऊन हाक मारून आपल्या सगळ्यांनाच खूप आनंदीत केलं आहे. त्याने एकमेकांचा विषयी आणि स्वतःविषयी.

स्वतःच्या मनात आदर वाढवला आहे… तसाच देवही आपल्याला अंतरमनातून हाका मारत असतो रे, फक्त आपल्याला त्या ऐकू येण्याची क्षमता वाढवली पाहिजे बघ. कदाचित देवाने आपल्याला त्या ऐकू याव्यात म्हणूनच त्याने ह्या वासुदेवाला आपल्या घरी पाठवला असेल… पुढे कित्येक वर्ष हा वासुदेव आपल्याकडे येत राहिला.. लखन तुला फार काही आठवत नसेल रे, कारण तू लहानपणापासून इथे शहरात मावशीजवळ वाढला आहेस… पण तुझ्या लग्नानंतर तूही अगदी तुझ्या बाबांन सारख वागू लागला आणि माझ्या सुनबाईला एका मनाच्या डॉकटर कडे घेऊन गेलास… त्याक्षणी मी ह्या वासुदेवाचा शोध लावला.

आणि मला कळालं की तो ह्याच शहरात आहे म्हणून… मी त्याला भेटले आणि त्याला सर्व काही सांगितले… आणि आपला इतिहास त्याला त्याच्या वडीलांकडुन ही कळला… मग त्याने सुरू केल्या, तुला तुझ्या अहंकारातून जागवण्याच्या या हाका… आणि तुझ्या बायोकोचा आत्मविश्वास हरवून बसलेला परत मिळवण्याच्या हाका.. आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणतंय हे, आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत हे जेव्हा आपल्या मनात रुजतं तेव्हा आपलं मन उभारी धरतं… इतक्या सोप्या हाका आहेत ह्या… तू खूप कष्टाळू आहेस, आणि तू लक्ष्मी आहे या घरची हे शब्द सन्मानच आहेत.. त्यात किती सत्य ते मला माहित नाही.

पण यामुळे माणसं पुन्हा उभी राहतात, आणि मी स्वतः हे अनुभवलं आहे, त्याकाळात. आणि मागल्या काही दिवसापासून तुही अनुभवत आहे हे…. आणि हे ऐकून सुनबाई तिकडून हसत म्हणाली, ‘आणि हे मी देखील अनुभवलं आई… आणि त्यामुळे मला आता कधीच त्या मनाच्या डॉकटरकडे जावं लागणार नाही बघ तुम्ही… कारण हा वासुदेव आज आहे, उद्या आहे का नाही हे आपल्याला माहीत नाही.. पण आता त्याने माझ्या मनातला आत्मविश्वास कायमसाठी वाढवला आहे आता तो परत कधीच कमी होणार नाही… आणि झालाच तरी माझे मन सांगेल मला, ‘तुझ्या अंतर्मनात लक्ष्मी आहे.. जी जिद्दीची,, कष्टाची,, यशाची मग माझे मन.

रमेल त्या हाकांमध्ये परत, आणि मी करेन सगळं आनंदाने.’ लखनला हे सगळं ऐकून खुप खुप छान वाटलं होतं.. त्याला वाटलं की, बर झालं ह्या हाका आपल्या आयुष्यात वेळेवर आल्या, नाहीतर आपण आपल्या अहंकाराने हे आपले आंनदी घर गमवून टाकले असते…. पहाट झाली आणि लगेच चिपळ्या वाजल्या,. ‘वासुदेवाची स्वारी,, आली बघा तुमच्या दारी..’ हे ऐकून लखन स्वतःबाहेर आला होता… त्या वासुदेवाला त्याने चहासाठी पैसे दिले… आणि म्हणाला, ‘वासुदेवाची ही स्वारी, पुढे अशीच येऊ देत, आमच्या या दारी.. आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या त्या हाका मनाला ऐकवून… घेऊ द्या आम्हाला उंच भरारी..’ वासुदेव हसला…

आणि तो पावली खेळत खेळत पुढे गेला होता…. पण लखन मात्र त्याच्या त्या मोरपंखी टोपीकडे पाहतच राहिला, त्यातुन त्याला मोरपिसाशी एक घट्ट नातं, असलेला कृष्णच दिसला होता…. जो आपल्याला गीतेतूनही अश्याच हाका मारून जगण्याचं मर्म सांगत असतो….

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!