
ये.. आई तुला जरा वेळ आहे का मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे गं…. बघ की थोडावेळ काढ… आणि आपण आज बाहेर जाऊया जरा निवांत वेळ मिळेल आणि आपले बोलणे पण होईल… पियुषने असे बोलल्यावर रेखा थोडीशी बावरली होती.. तिला कळेना की नक्की ह्याच्या मनात काय चालू आहे ते.. माझं आयुष्य कसं कडक आणि शिस्तीत गेलेलं, आणि माझा नवरा हा मिल्ट्रीमन.. अनिलच्या पुढे माझे काहीच चालायचं नाही, पण आताची ही पिढी मुले हे सहन करू शकतील का.?? एक तर त्यांच्या डोक्यावर कामाचं खूप जास्त प्रेशर होतं..!
मनात कित्येक विचारांनी अगदी काहूर माजलेले, ह्यापुढे अशा एकाद्या प्रसंगाला खोटा का होईना..
पण हसरा मुखवटा घालून ती सामोर जायला, आता रेखा सज्ज झाली होती, पण आता अनिलच काय..?? आता घरात नवीन येणारी माझ्या सुनेला ह्याच्या या कडक शिस्तीत राहणे, जरा कठीणच जाणार आहे…. दुपारचं जेवण झाल्या नंतर रेखा थोडी झोप घेण्यासाठी खाटावर आडवी झाली, आणि तिच्या भूतकाळात रमली.. आणि म्हणता म्हणता माझ्या जीवनाची अठ्ठावीस वर्षे पार पडली आहेत… ती नेहमी नवऱ्याच्या बदलीच्या ठिकाणी जात होती. त्यामुळे तिझा पूर्ण भारत फिरून झाला होता..आणि ति परदेशी ही गेली होती… आपल्याला इतकं सुख, आणि ऐश्वर्य मिळून ही आता आपण खरंच या आयुष्यात.
समाधानी आहोत का..?? कुठंतरी काहीतरी चुकतं हे नक्की आहे, आणि काहीतरी आपल्या हातातून निसटून गेलं हे ही तितकंच खरं आहे.. पण आताच्या पुरुषप्रधान संस्कृतीत भांडून वाद घालून आपण स्वतःची स्पेस, सुख थोडंच मिळणार आहे आपल्याला..! जेव्हा लग्नानंतर रेखा तिच्या माहेरी आली होती, आणि तिचा अनिलबद्दलचा तक्रारी सूर झाल्या त्यावेळी त्या ऐकून आई ने तिला सुनावले… हे बघ बाळ आपल्या संसारात आपली आवड-निवड ह्याची सांगड घालताना, आपल्याला तडजोड ही करावीच लागते…आणि आपला संसार हा तडजोडीवरच टिकतो पोरी।… तेंव्हा आपण सासरच्या प्रवासात एकरूप हो, तेव्हा अनिल खूप हुशार आहे.
आणि तो मिल्ट्रीत असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टी अगदी वेळेत करायची सवय होती.. आणि यामुळे मला ही वाटतं होत की तुला ही त्याची हळूहळू सवय होईल, आणि तू ही रुळशील त्याच्यात..! तू पण तुझे छंद, आवड जपत जा पण, त्याच्या कामाच्या वेळेत नको तू अनिल चे काम बघ आणि त्यांनंतर तू तुझं शेड्युल सेट कर पोरी…. आणि त्यानंतर रेखा हळूहळू तिझ्या संसारात छान रुळली होती… अनिल बरोबर त्याच्या पोस्टिंगवेळी पण तिने त्याची साथ दिली आणि दोघेच फिरत राहिले.. तिला अनिलचा सहवास तर खूप मिळायचा पण त्यात एक तिला रिकामेपण जाणवायचे… तिला वाटायचं की आपण माया.
आणि प्रेमा पेक्षा जास्त जबाबदारीचं ओझं बाळगतोय… अनिलला सतत मिळणारा मानपान त्याची हुशारी आणि पैशाच्या जोरावर सर्व काही जिंकायचा नादात… आपण बरीच नाती दुरावली होती. आणि स्वतःच्या आवडी-निवडी, तिचे छंद ह्यांना रेखाला मुरड घालावी लागली होती… माणसाच्या संसारात दोघांचे मनं जुळायला ह्याही गोष्टींना थोडे प्राधान्य द्यावे लागते ना. हे आपल्या पूर्वीच्या पिढीला कधीच रुचलं नसतं, म्हणूनच तिच्या घरातल्यांच्या इच्छेला मान देऊन रेखा लग्नासाठी तयार झाली होती… तिच्या घरात तिची सून म्हणून घरात येणाऱ्या अनु कडे ती स्वतःची लेक म्हणूनच बघत होती… त्या दोघींचे कायम छान जमायचं..
पण यावेळी पियुष आपल्याला काय सांगणार, हा विचार करत करत, तिला कधी डोळा लागला हे तिलाच समजलेच नाही, आणि म्हणून आज बाहेर गेल्यावर पियुषला आपले प्लॅनिंग सांगायचा निर्णय रेखाने घेतला होता, त्यासाठी तिला तिच्या नवऱ्याशी न भांडन न करता,, पियुष व होणारी आपली सून अनुला तिची स्पेस मिळावी, ह्यासाठी सासुपणाची जबाबदारी पेलायला रेखा आता सज्ज झाली होती… अगदी वेळ पडली तरी अनिलच्या विरोधात जाऊन… आपल्यावर झालेल्या त्या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी हीच तर ती खरीवेळ आहे, आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीला पारखताना, तिने स्वतःच्या नजरेने पारखले होते.
आणि अनिलला हवे तशीच ती वागली अगदी, पण ती स्वतःची ओळख मात्र कुठेतरी हरवून बसली होती… पियुष ने तिला आवाज दिला आणि ती भानावर आली.. अनिल त्याच्या मित्रांसोबत गोल्फ सरावासाठी घराबाहेर मैदानात गेलाच होता.. आणि घरात पियुष आणि ही अशी दोघेच होती.. तरीपण त्यांनी ठरवले की जवळच्या पार्कमध्ये फेरफटका मारायचा आणि त्यांनंतर संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये अनुला भेटायला जायाचे. त्यांच्या गप्पा सुरू होत्या अचानक आई ने सांगितलेला निर्णय ऐकून मात्र पियुष आईकडे ”आ ” वासून बघत राहिला… जे सांगण्यासाठी आईला आज मी तिला इथे घेऊन आलो होतो ते तर आईला आधीपासूनच कळलं होतं…
पियुष अगदी गोंधळून गेला होता, ते बघून रेखाताई नी त्याच्या पाठीवर हलकीच थाप मारली… आणि पियुष म्हणाला ममा थँक्स..!! तू माझा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहेस… कारण माझ्या पप्पांच्या दहशतीखाली आणि ताणतणावाखाली राहणे अनुला पटेल का गं.?? हाच विचार मी करत होती कित्येक दिवस…!! चल आता बघूया, अनुला आपला निर्णय एकदाच सांगून टाकू.. तिला हे ऐकून खूप आनंद होईल, गप्पा मारत मारत ते दोघे कॉफीशॉप मध्ये गेले… आणि समोरून येत असलेल्या अनुला साडीत पाहून, ते दोघे तिच्याकडे बघतच राहिले… लाल कलरची ती साडी, व स्लिव्हलेस ब्लाऊज, आणि मानेवर रुळलेले ते मोकळे केस सावरत.
ती अगदी डौलदारपणे पावले टाकत टाकत, ह्यांच्यासमोर आली… तिचे ते देखणे सौन्दर्य पाहून आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो कॉन्फिडन्स पाहून रेखाताई ही भारावल्या होत्या… थोड्याच वेळात गप्पा रंगात गेल्या असता पियुषने तिला आपण वेगळं राहण्याविषयीचे प्लॅनिंग सांगितले… रेखा ताई गप्पचूप बसून त्या दोघांचे बोलणे ऐकत होत्या.. पियुषच्या ह्या निर्णयावर एका क्षणातच अनु खूप भडकली होती…. अरे पियुष..! तू त्यांचा पोटचा मुलगा आहेस ना… तू अस कसं बोलू शकतोस….?? ज्या आई-बाबांनी तुला लहानाच मोठं केलं तू त्यांना या वयात असा धक्का देणार आहेस का..?? आणि मला तुझं हे प्रपोजल कधीच मान्य होणार नाही..
माझ्या घरचे माझी फॅमिली जरी स्वतंत्र रहात असली तरी, आम्ही सगळे सणवार किंवा फॅमिली फंक्शन असो ते आम्ही एकत्रच साजरे करतो तुला माहीत आहे हे…. आणि आम्ही एकमेकांच्या अडचणी मिळूनमिसळून सोडवतो, आणि कोणतेही संकट एकत्र संभारतो… आम्ही आनंदाच्या क्षणाबरोबर दुःखातही सहभागी होतो.. फक्त आम्ही जागेअभावी वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहोत… तू तरी एकुलता एक आहेस त्यांच्यासाठी… तूच त्यांचा आधार आहेस.. आणि तू आपली जबाबदारी ओळखून आपण वागायला हवे ना… आणि एकत्र राहण्याचं ते सुख तुला कधी समजणार रे..! आणि एक तू लक्षात ठेव जी, मी जरी तुझी बायको होऊन आले त्या घरात..
पण त्यांच्या साठी मी लेक म्हणूनच येणार आहे त्या घरात… त्यामुळे हा प्रस्ताव मला मला मान्य नाही… आणि मी त्यांच्या जवळच राहणार आहे… आणि राहिला तो प्रश्न आपल्या बाबांचा…. मी त्यांच्या स्वभावाशी मिळतेजुळते घेऊन मी त्यांचे मन जिंकणार आहे… कारण एक बाप नेहमी आपल्या लेकीला सुखातच ठेवण्याचा प्रयत्न करतो असतो…. हे ऐकून रेखाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहातच होते… गेले कित्येक दिवसपासून त्या पियुष गेल्या नंतर आपण घरी एकटे पडणार ह्या दडपणाखाली वावरत होत्या… रिकाम्य ते घर त्यांना खायला उठणार होतं, परंतु आता त्यांच्या भरल्या घरात आता वेळ कमी पडणार होता…
आई गप्प बसा…. – अनु…. अहो आई माझी ममा मला नेहमी सांगते असते की, ती।म्हणते मोडतोड करायला कधी ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला मात्र खूप जास्त शहाणपण लागतो.. आणि यातच तर सुखी संसाराचं ज्ञान आहे… आपल्या पायात एक काटा घुसला म्हणून जगणं कुणी सोडत का ओ..?? किंवा चालायचं कोण राहतं का..?? त्या पायात घुसलेल्या काट्याला एक फुल समजून त्याला अलवार हाताळा, मग बघा वेदना कशी चुटकीसरशी दूर होता ते.. आपल्याला नको असण्याऱ्या गोष्टींकडे, जर आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले तर बघा जगणं सुसह्य होऊन जातं… ते लोक म्हणतात ना, की सुंदर आयुष्य हे सहजपणे कधी घडत नाही.
तर ते आपल्याला जाणीवपूर्वक घडवावं लागतं… ते पण आपल्या वागण्यातुन बोलण्यातून आणि प्रेमाने… SO MOM AND PIYUSH DONT WORRY..! मी हे सगळं अगदी छानपणे सांभाळून घेईन… रेखाताई भारावल्या आणि अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी अनु कडे पाहत होत्या…
आज कितीतरी दिवसांनी त्यांच्या मनावरील तणावाचे ओझे दूर झाले होते. आणि त्या आता सासुपणाची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाल्या होत्या ते ही अगदी आनंदाने……. तुम्हाला या आर्मी रिटायर ऑफिसर बद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा..