जेव्हा हिने काचऱ्याच्या डब्यात पडलेल्या मुलाला घरी आणले तेव्हा पहा घरातल्यांनी तिच्या सोबत काय केले..

महादेवाच्या मूर्तीजवळची एका दिव्याची काजळी काढत काढत आजी त्या मूर्तीकडे डोळेभरून पाहत उभी राहिली होती,. आजीचा देवासमोर संवाद सुरू झाला, आणि तिचे अश्रू वाहायला सुरू झाले. दररोज आजीचं मन संध्याकाळी असचं निःशब्द उभराहून महादेवाचं आभार मानायची… पांढरीशुभ्र ती महादेवाची मुर्ती आजीची जीव की प्राण होता.. ही महादेवाची भक्ती तिला तिझ्या लहानपणापासून तिच्या आजोबांकडून मिळाली होती आणि तीही वारसाने. आणि आजी नेहमी सांगत, की ती लहानपणी खुप लाडकी होती.. तिचे आईवडील ती लहान होती तेव्हाच वारले आणि यामुळे तिला तिचा मामा त्याच्या घरी नेले होते…

तेंव्हापासून हिचे आजोबा दररोज हिला घेऊन दर संध्याकाळी याचं महादेवाच्या मूर्तीसमोर बसायचे… आणि तिचे आजोबा तिला सांगायचे की, हे बघ तुझे आई-वडील लवकर गेले असले, तरी हा मूर्तीमध्ये आपले आई बाबा असतात बरं…. आणि तो आपलं काही चुकीच की, आपल्याला शिक्षा ही करतो बरका… त्यामुळे तो कायम आपल्याला पाहत असतो हे लक्षात ठेवून तू तुझं आयुष्य जगत झा.. आणि हेही लक्षात ठेव की, जेवढी तुझी देवावर भक्ती जास्त असेल, तितकी तुझी भीती कमी होईल बाळ.. कारण हा माझा हा देव ह्या सगळ्या विश्वाचा बाप आहे, आणि तो सगळ्यांच्या सोबत ही आहे, हे आपण आपल्या मनात ठेवलं की.

आयुष्यतील सगळी सुख आणि दुःख आपण अगदी सहज पार करतो… आणि आजीला ही आठवलं की आपली मानसिकता आपल्या आजोबांनी ह्या भक्तीसाठी बळकट केली होती… आणि आजोबा म्हणायचे की, आपण त्या मूर्ती समोर असो किंवा नसो पण आपण त्याच्या शक्तीच अस्तित्व अनुभवलं पाहिजे… आपल्या घराच्या अंगणातल्या परिजातकाकडे संध्याकाळी अरधोंनमिलीत कळ्या दाखवत म्हणायचे की, आता तु सकाळी बघ जादू. सकाळी लवकर त्या केशरी सडा दाखवत ते म्हणायचे तु बघ कोणी होतं का या झाडावर… त्यांना खाली पाडायला.?? त्या जास्वंदाची कळी बघ आज कशी उमलली आहे.

पण ती कल तशी नव्हती… अश्या वेगवेगळ्या निसर्गाच्या गमतीजमती दाखवत ते म्हणायचे, ‘बाळ हा जादू दाखवणार दुसरतीसर की नसून आपला देव आहे.. तो असा वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्या सोबत आहे, हेच लक्षात ठेवायचं आणि आपले आयुष्य जगत राहायचे… आणि त्याचे आभार मानत राहायचे.. आजीला आठवलं की ती म्हणायची आपण कशाला आभार मानायचे ओ आजोबा..?? आजोबा हसत हसत स्वतःच्या कुशीत घेत सांगायचे मला.. तुला मला आपल्या सगळ्यांना हे सगळं बघण्याची, ते अनुभवण्याची, आणि ती व्यक्त करण्याची क्षमता बुद्धी त्यानेच तर दिली आहे, मग आपण त्याचे आभार मानायला नको का.?? आजीला आठवलं की.

जरवेळी आजोबांसोबत ह्याचं मूर्तीसमोर बसून आपलं नातं खूप खूप घट्ट झालं होतं…. आजोबा मला सोडून देवाघरी गेले होते, त्याआधीच त्यांनी मामाला सांगितलं होतं की, गंगूला तिच्या लग्नात हीच महादेवाची मूर्ती दे, तिला ही मूर्ती पाहिल्यावर आधार वाटतो, बिचारी एकटी आहे रे…. ही मूर्ती आपल्यासोबत आपल्या संसारात आली होती, त्यामुळे माझ्या संसारात अनेक अवघड अवघड प्रसंग आले होते, पण कधी आपण उद्धवस्त होऊ अशी भीती नाही वाटली…. आपली परिस्थती कितीही गरिबी असली, तरी पण ह्या भक्तीच्या श्रीमंतीनं आयुष्याचा अगदी सोहळा झाला होता.. आजीला असं आईपण कधीच अनुभवायला मिळलंच नव्हतं.

पण महादेवाच्या कृपेने तिच्या घराच्या पलीकडे केरात तिला एक मुल सापडलं होती’…. तिच्या घरच्यांनी तिला विरोध केला होता, पण तिच्या नवऱ्याने साथ दिली होती आणि त्या दोघांनी त्या मुलाला सांभाळलं होतं… आणि त्याचं नावही महादेव ठेवलं होत त्यांनी… ती आपलं आईपणाच दुःख ती ह्या मूर्तीला सांगत होती, म्हणून उशिरा का होईना पण हे सगळं तिच्या सोबत घडलं होत, असं आजीला वाटत होतं….. जसं आपलं लहानपण पोरकेपणात आपल्याला आजोबांनी ह्या भक्तीचा वारसा देत जपलं होतं, तसंच आपल्या हातून ह्या जीवाला जगायचं असेल, आणि त्या जिवातून माझ्या देवाला जपायचं असेल, असंही आजीला वाटू लागलं…..

आजीचा जोडीदार गेल्यावर आजीलाच घराची आर्थिकस्थिती सांभाळायची होती, कारण एक मुल महादेवाने तिच्या ओटीत दिल होतं… कदाचित माझे आयुष्य एकट्याने जाऊ नये, म्हणूनचं हे सगळं माझ्याबरोबर घडलं असेल, याचे आभार आजी दररोज महादेवाच्या मूर्तीसमोर मानतच होती… ती स्वतःच्या हिमतीवर मुलाला वाढवलं होतं… तिने खूप कष्ट करून महादेवाला वाढवलं होत… आणि तिची महादेववरची भक्ती तिला कधीही भविष्याची भीती दाखवत नव्हती…. आज मात्र तिला आयुष्याने एक सोन्याचा दिवस दाखवला, तिच्या मुलाला आज एक अशी नोकरी लागली होती, की आता आजीचं पुढल आयुष्य सुखाने जाणार होतं..

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या त्या दत्तमूर्तीला एक छान सुंदर मंदिर ही मिळणार होतं.. आजीला वाटत होतं, ज्या लेकराला जन्मानंतर उकिरडा मिळाला आणि त्याला वाचवण्याची बुद्धी मला महादेवांनी दिली, आणि आज हे दिवस आले आहेत माझ्यावर… म्हणूनच हे सगळं सुख पाहून आज आजी अश्रूंनी आभार मानत होती महादेवाचे…. आणि तिझ्या ह्या भक्तिसाठी तिला आयुष्यभर सांभाळणारा महादेव मुलाच्या रूपाने तिच्या जवळ आला आणि तिचे डोळे पुसत होता.. आणि आजीने दिव्याची काजळी काढल्यानंतर देवळाचा गाभारा प्रकाशाने अगदी उजळून गेला होता, आणि महादेवाच्यामूर्तीच तेज आजीच्या भक्तीतुन अगदी उजळून गेलं होतं……

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!