हुशार मुलगी असूनही बाबाने तिचे लग्न लावून दिले पण नवऱ्याने तिचा वापर करून तिला सोडून दिले मग पहा त्या मुलीचे काय हाल झाले..

अहो ह्या तुमच्या लेकीला कसलं ही वळण नाही.. आणि त्यामुळे हिला मी कधी बाहेर घेऊन जात नाही कारण मला हिजी लाज वाटते, मी हिला आजिबात ठेवणार नाही माझ्या बरोबर’ विजय अगदी रागात बोलत होता… स्नेहा मात्र त्या वेळी खोलीच्या एका कोपऱ्यात भीतीने अगदी थरथरत उभी राहील होती.. पण तिची आई तिला सावरायचा प्रयत्न करत होती, पण तिची आई देखली मनाने खूप घाबरली होती त्यावेळी.. फक्त त्यांना ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर दाखवायची नव्हती, म्हणून त्याही कंबिर पणे तिला धीर देत होत्या.

त्या बैठकीत स्नेहाच्या आणि विजयच्या घरातील सगळी मंडळी त्यांचे त्यांचे मुद्दे सगळ्यांन समोर मांडत होते.. विजयच्या घरातल्यानी सुद्धा त्याला स्नेहाला आपल्या घरी पुन्हा नांदवायला नेण्याची विनंती केली, पण विजय चा निर्णय ठाम झाला होता.. आणि त्यामुळे दोन्ही घरातील व्यक्तींच्या चर्चेचा कोणता ही निकाल लागत नव्हता… मग शेवटी स्नेहाचे वडील मोठ्या धाडसाने उभे राहत, म्हणाले… ‘बरं ठीक आहे.. जर तुम्हाला स्नेहाला वागवयचेच नाही, तर मीही नेहमीप्रमाणे तुम्हाला तिला घेऊन.

जायची जबरदस्ती करणार नाही… जर तुम्हाला घटस्फोट पाहिजे तर यावेळी तुम्हाला आम्ही घटस्फोट द्यायला तयार आहोत..’ आणि हे वाक्य ऐकताच घरात शांतता पसरली. आणि घरातील सर्वजण स्नेहाच्या वडिलांच्या कडे बघत होते.. जो विजय आतापर्यंत खूप रागाने बोलत होता, तो सुद्धा गप्प झाला हे ऐकून.. जे कालपर्यंत माझ्या पोरीला नांदवून घ्या म्हणून, विजयच्या पायात पडत होते.. ते स्नेहाचे बाबा आज अचानक घटस्फोट द्यायला तयार झाले होते…

आणि हे सगळं विजयच्या अगदी मनाचे होत होते… पण हे सगळं इतक्या सहजपणे होईल असे त्याला कधीच वाटले नव्हते… विजयला वाटत होते, की स्नेहाच्या घरातील सर्व मंडळी त्याची खूप विनवण्या करतील.. स्नेहा तर त्याचे पाय धरेल आणि तिला नांदवून घ्यायची भिक मागेल, आणि तो स्नेहाच्या घरच्यांच्या यथेच्छ अपमान करून तिला घटस्फोट देणार होता.. पण स्नेहाचे वडील तर लवकरच घटस्फोट द्यायला तयार झाले होते, आणि त्यामुळे विजयला ही जास्त काहीचं बोलताच आले नाही…

या चर्चेच्या शेवटी जे लग्नात मुलीला स्त्रीधन म्हणून दिले होते ते सगळं परत देऊन घटस्फोट घेण्याचे सर्वांचे मत ठरले होते.. आणि त्या दोन्ही घरातील पक्षांची बैठक संपली होती.. पण स्नेहाला या घटलेल्या घटनेवर विश्वासचं बसत नव्हता, यामुळे ती किती तरी वेळ, कुणा सोबतचं काहीच बोलली नाही… स्नेहाच्या घरातील कोणीच कोणाशी बोलत नव्हते.. स्नेहाचे वडील मात्र त्यांच्या भूतकाळाच्या विचारात गढून गेले होते… त्यावेळी स्नेहाचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते…

आणि स्नेहा ही लहानपणा पासूनच खूप हुशार मुलगी होती.. हा ती नाका डोळ्यांनी नीट होती, फक्त रंगाने जरा सावळी होती.. आणि स्नेहाचे लहानपणी पासूनच एक स्वप्न होते की, तिला एक सरकारी अधिकारी व्हायचे होते… ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार होती, तिला बारावीला चांगले मार्क्स मिळाले होते, तरीही तिने कलाशाखेत प्रवेश घेतला होता…. स्नेहाच्या वडिलांना लहानापासून स्नेहाचे फार जास्त कौतुक होते.. पण एका दिवशी त्यांच्या घरी अचानक विजयचे वडील आले.

आणि त्यांनी विजयसाठी स्नेहाला मागणी घातली होती… सुरुवातीला स्नेहाच्या बाबांनी साफ नकारच दिला होता त्यांना… पण विजयच्या वडिलांनी त्यांना सांगितले की स्नेहाच्या पुढील अभ्यासासाठी आम्ही सर्व तिला मनापासून सहकार्य करणार आहे, आणि तिला अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळू घेऊ, असा शब्द दिला होता.. त्यामुळे स्नेहाच्या वडिलांनी होकार दिला होता… सुरवातीला विजय तसा चांगला मुलगा आहे असं वाटल हितं त्यांना, तोही लहानपणा पासून गावातच शिकला होता.

आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला होता, आणि पुण्यातचं शिकून तिथेच चांगल्या नोकरीवर लागला होता… त्यामुळे तो स्नेहाच्या शिक्षणालाही खूप महत्व देईल, असे स्नेहाच्या वडिलांना वाटले होते… स्नेहाच्या वडिलांनी स्नेहाला विजयच्या स्थळाबद्दल आणि त्याच्या बद्दल ही खूप काही सांगितले होते… स्नेहाला एवढ्यात लग्न करायचे नव्हते, पण तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, की विजय आणि स्नेहा ह्या दोघांचं लग्न व्हावं. शेवटी बाबांच्या मनासाठी स्नेहाने विजयशी.

लग्न करण्यासाठी होकार दिला, कारण विजयच्या घरातल्या सगळ्यांनी तिला अभ्यासासाठी आधीच परवानगी दिली होती…. स्नेहाने लग्नाला होकार दिला, आणि लगेच पुढल्या पंधरा दिवसात त्यांचा साखरपुडा आणि पुढच्या दोन महिन्यात त्या दोघांचे लग्न पार पडले होते.. . स्नेहा ही तिच्या वडिलांची एकुलती एक लेक होती, त्यामुळे त्यांनी ही स्नेहाचे लग्न अगदी दणक्यात लावून करून दिले होते.. लग्न झाल्यानंतर काही दिवस ते गावात राहून परत ते दोघे पुण्याला निघून गेले होते.

आणि तिथे त्या दोघांनी आपला एक नवीन नवीन संसार थाटला होता… प्रत्येक मुली सारखी स्नेहाने ही तिच्या नवीन संसाराची अनेक स्वप्ने रंगवली होती.. पण प्रत्यक्षात मातुर तिच्या आयुष्यात काहीतरी खूप वाईट आणि वेगळेच लिहिलेले होते देवाने, विजय पहिल्या पासूनच तिच्यासोबत थोडा तुटक तुटक वागत होता.. तो लग्न झाल्या पासून तिच्याबरोबर अगदी मोजकेच बोलायचा.. त्याने कधीच तिला कुठे बाहेर नेले नव्हतं, की तिला कधी हौसेने काहीचं आणले नाही…

स्नेहाने त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायची, पण तो नेहमी तिच्यावर चिडायचा.. तो म्हणायचा की मला जास्त बोलायला आवडत नाही, आणि तिलाच तू खूप बडबड करतेस, आणि तू एक गावंढळ आहेस असे म्हणून हिणवायचा.. पण तिच्यासाठी त्याचे हे रूप अगदी नवीन होते… तिला वाटायचे की विजयला आणखी थोडा वेळ हवा असेल, म्हणून तो अस वागत असेल, आणि ती ही गप्प बसली… पुढे काही दिवसांनी विजय आपल्या बरोबर मनमोकळेपणाने बोलेल.

म्हणून ती त्याचे वागणे गुपचूप सहन करत होती.. पण जसा जसा वेळ गेला तशी परिस्थिती आणखी जास्त बिघडत गेली. विजय आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर तिच्यावर खूप जास्त चिडायचा.. काही वेळा त्याने तिच्यावर हात उचलायला ही मागेपुढे पाहिले नाही.. कायम हसत राहणारी आणि बोलकी असणारी स्नेहा आता घरात मात्र सतत भीतीच्या सावटाखाली राहायची. आणि या अशा मनःस्थितीत तिचा अभ्यास ही होत नव्हता…

लग्न झाल्यावर चार-पाच महिन्यांनी स्नेहा जेव्हा गावी माहेरला आली तेव्हा ती पार सुकलेली होती… तिच्या आईवडिलांनी तिला विचारले देखील बाळ सासरी काही त्रास आहे काय तुला?? तेव्हा पण स्नेहाने त्यांना काहीही सांगितले नाही, नवीन वातावरण असल्याने जरा तिथे जुळवून घेता आले नाही, असे सांगत स्नेहाने त्यांना विजयच्या बदल काहीही सांगितले नाही… दोन-चार दिवस गावी माहेरी राहून आता ती पुन्हा विजयसोबत शहरात निघून गेली.

मात्र यावेळी सुध्दा विजयचे वागणे काही बदलले नव्हते.. त्याउलट तो आता जरा जास्तच चिडचिड करायचा तिच्या वर, तो स्नेहावर प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींवरून राग राग करायचा, पण स्नेहा मात्र कायम सारख त्याचं सर्वकाही गुपचूप ऐकुन घ्यायची. आणि मग एका दिवशी विजय घरी दारू पिऊन आला होता, आणि आल्याबरोबर लगेच स्नेहाला काहीबाही बोलायला लागला.. तेव्हा मात्र स्नेहा मनातून खूप जास्त घाबरली होती, पण त्यावेळी विजय तिच्यासमोर बोलत होता.

तेव्हा त्याच्या बोलण्यातून स्नेहाला त्याच्या असं वागण्याचे खरे कारण समजले. विजयला स्नेहा मुळात पसंतच नव्हती, स्नेहा ही रंगाने थोडी सावळी होती, आणि विजयला तर एखाद्या गोऱ्यापान, आणि खूप सुंदर मुलीशी लग्न करायचे होते… जी त्या शोभून दिसेल.. आणि तो तिला मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये घेऊन मिरवू शकेल, पण विजयच्या वडिलांनी त्याला स्नेहाशी लग्न करायला, खूप जबरदस्ती केली होती. त्याचे कारण हे की स्नेहा ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक होती.

आणि तिच्या लग्नानंतर तिच्या वडिलांची सर्व संपत्ती स्नेहाच्याच नावी होणार हे त्यांना माहीत होतं.. म्हणून विजय च्या वडिलांनी स्नेहा आणि विजयचे लग्न करून दिले होते. विजयने स्नेहाशी लग्न तर केले होते, पण ज्या ज्यावेळी तो त्याच्या मित्रांच्या सुंदर बायका बघायचा, तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटायची. आणि ह्या सर्व गोष्टींचा राग तो स्नेहावर काढायचा… विजयचे बोलणे ऐकून स्नेहा मात्र पूर्णपणे कोलमडून गेली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी लवकर स्नेहाने विजयला.

या गोष्टीचा जाब विचारला, तेव्हा विजय ने तिला सरळ तिच्या गावी माहेरी नेऊन सोडले, आणि त्याउलट तिच्याचं वडिलांना म्हणाला की, तुमचीही मुलगी खूप जास्त उद्धट आहे. आणि आपल्या नवऱ्याला जाब विचारते… हिला जरा समजावून सांगा तुम्ही, तेवेळीच हिला परत नेईल पुण्याला नाहीतर ठेवा तुम्हीच तुम्हची मुलगी…. तो खूप रागात बोलला.. यावेळी मात्र स्नेहाच्या वडिलांना तिच्या त्या कोमेजलेल्या चेहऱ्यामागचे खरेखरे कारण समजले होते..

विजय स्नेहाला माहेरी सोडून एकटाच परत निघून गेला होता. दोन-तीन दिवस स्नेहा ही खूप रागात होती… विजयने तिचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले होते… त्याला जर ती आवडली नव्हती, तर तसे त्याने पहिलाच सांगून टाकले पाहिजे होते, असे स्नेहाला अन् तिच्या वडिलांना दोघांनाही वाटत होते.. पण हळूहळू विजयवरचा राग कमी झाला… आणि त्यानंतर आजूबाजूचे हे स्नेहाच्या माहेरी राहण्यावरून कुजबुज करत होते, शेवटी आपले लग्न झालेले आहे आणि ते आपल्याला निभावावे लागणारच.

म्हणून स्नेहा परत विजयकडे गेली होती… स्नेहाचे वडील तिला सोडवायला गेले होते विजयकडे आणि विजयला स्नेहाशी चांगलं वागण्याची विनंती ही केली होती त्यांनी… विजयने त्यांच्या पुढे त्यांना होकार दिला, पण आता मात्र त्याची हिम्मत खूपच वाढली होती… आणि यामुळे तो प्रत्येक लहानश्या गोष्टींमध्ये भांडण मुद्द्यांम उकरून काढायचा, आणि उठसुठ स्नेहाला तिच्या माहेरी पाठवायचा, आणि त्यानंतर प्रत्येक वेळी स्नेहाचे वडील विजयला गयावया करायचे.

आणि स्नेहाला परत विजयकडे सोडवून परत गावी यायचे.. पण आता मात्र विजय खूप रागात होता.. त्याला स्नेहाकडून घटस्फोट पाहिजेच होता.. यावेळी विजयला सर्वांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.. आता मात्र स्नेहाच्या वडिलांनाही हे कळलं होतं, की अजय आता कधीच सुधारणार नाही… आपण इतके दिवस झाले, त्याचे सर्व काही निमूटपणे सहन करून घेतले, त्यामुळे ह्याने आपल्या असहायतेचा खूप जास्त फायदा घेतला आहे…

त्यामुळे त्यांनी सस्नेहाला या लग्नाच्या बंधनातून मोकळे करायचे ठरवले होते.. कोर्टातमध्ये डिव्होर्सची तारीख ही पुढ्याच्या सहा महिन्यानंतरची पडली होती… काळजी करून स्नेहा तर पूर्ण कोमेजून गेली होती. शेवटी स्नेहाच्या वडिलांनी स्नेहाला काही दिवसांसाठी त्यांच्या बहिणीकडे म्हणजे तिच्या आत्याकडे पाठवले होते… या वातावरणातून बाहेर गेल्यामुळे स्नेहामध्ये आता जरा सकारात्मक बदल दिसत होते… स्नेहाची आत्याची मुलगी ही त्याच्या वयाची होती.

आणि ती पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, आणि त्यामुळे स्नेहाने ही पुन्हा एकदा अभ्यासाला सुरवात केली होती.. स्नेहाने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे बुडवून घेतले होतं. हळूहळू स्नेहाचा स्वतःवरचा आत्मविश्वास ही वाढू लागला, आणि तिनेही तिच्या आतेबहिणी बरोबर परीक्षेचा फॉर्म भरला, आणि पहिल्याच परीक्षेत चांगल्या मार्कनी पास होऊन, ती एका चांगल्या नोकरीवर लागली होती.. आणि यामुळे तिचे आई-वडिल ही खूप आनंदात होते..

स्नेहा आता तिच्या त्या वाईट भूतकाळातून पूर्ण बाहेर पडली होती… तिच्या त्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आत्मविश्वासाने तिचे ते सौंदर्य आणखी जास्त खुलवले आले होते. सहा महिन्याने जेव्हा कोर्टामध्ये घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्यासाठी स्नेहा गेली होती, त्यावेळी विजय तिच्याकडे बघतच बसला होता.. स्नेहाचे राहणीमान अगदी बदलून गेले होते. आणि तिचा स्वतःवर असलेला आत्मविश्वासाने तिचे ते सौंदर्य आणखीनच जास्त खुलुन गेले होते…

तिला सरकारी नोकरी लागली आहे हे त्याला आधी कळले होते…पण इतके दिवस तो एकट्या राहून त्याला स्नेहाची किंमत काय आहे हे कळाले होते.. त्यामुळे त्याला आता स्वतःच्या आयुष्यात स्नेहा परत हवी होती… तसे त्याने मधल्या काळात स्नेहाच्या घरच्यांना कळवले देखील होते, पण स्नेहाच्या बाबांनी ह्याला साफ नकार दिला होता… आणि आज कोर्टामध्ये विजय स्वतःहून स्नेहाशी बोलायला आला होता.. ‘तुझ्या नोकरीबद्दल तुझे अभिनंदन..’ विजय म्हणाला तिला…

‘धन्यवाद..’ स्नेहाने अगदी रागात उत्तर दिले त्याला. ‘जर तुझी इच्छा असेल, तरचं आपण आपल्या या नात्याबद्दल परत एकदा विचार करूयात.… कारण आज तुलाही एक चांगली नोकरी लागली आहे, आणि त्यामुळे आज मीही तुला चारचौघात मिरवू शकतो, कारण तुझे स्वतःचे असे काहीतरी कर्तृत्व आहे या समाज्यात. आणि तू जर हो म्हणशील तर आपण हा घटस्फोट रद्द करू शकतो..’ विजय स्नेहावर फार मोठे उपकार केल्यासारखा बोलत होता.

‘स्नेहा मला तुमच्याबरोबर परत एकत्र यायला कधीच आवडणार नाही.. आज फक्त मला एक चांगली नोकरी आहे, आणि त्यामुळे मी परत तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे.. कारण तुम्ही मला सोबत घेऊन मिरवू शकाल.. नाती ही नोकरी किंवा सुंदरता पाहून नाही, तर प्रेमाने बनतात हे तुम्हाला कळणार नाही.. मी तुम्हाला तुमच्या सर्व गुणांसह स्वीकारले होते, त्यामुळे मला तुमच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा होती… माझे बाबा ज्यावेळी तुमच्यासमोर मला नांदवून घेण्यासाठी हात पसरत होते.

त्यावेळी सुध्दा तुम्ही मला स्वीकारले नाही… खरं म्हणजे मी माझ्या मनातून आणि माझ्या आयुष्यातून तुम्हाला कधीच काढून टाकले होते..
आता फक्त आपले नाते या कागदा पुरते आहे… आता माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही जेव्हा दुसरं लग्न कराल तेव्हा पहिलाच त्या मुलीला तुमच्या ज्या सगळ्या अपेक्षा तिच्याकडून आहेत, त्या अपेक्षा तिला आधीच सांगून टाका.. जेणेकरून माझ्या सारखे तिचे हाल होणार नाही..’ असे स्नेहाने विजयला सांगितले…

विजय हे सगळं ऐकताच रागाने तेथून निघून गेला होता.. आणि थोड्याच वेळात कोर्टामध्ये त्या दोघांचे नाव आले, आणि त्या दोघांनीही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या देखील केल्या आणि त्यांनी एका नवीन आयुष्याला सुरुवात केली.. स्नेहाच्या वडिलांनी स्नेहा आणि विजयच्या पुढे काहीही होणार नाही हे समजून उशिरा का होईना, पण घटस्फोटाचा निर्णय घेतला, आणि तेव्हापासूनच स्नेहाच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली.. कधीकधी माणसाला भविष्याचा विचार करून..

आपल्या वर्तमानात काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात असतात…

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!