वाढदिवसाचा केक आणायला गेलेल्या बायकोचे जेव्हा प्रे-त घरी येते तेव्हा पहा त्या नवऱ्याचे काय होते..

विवेक – अनुजा हे एक प्रेमळ आणि चांगलं जोडपं होतं…. आणि त्यांच्या संसरवेली त्यांची दोन छानशी मुले, त्यांना संसाराचा पूर्ण आनंद देत होती… किरण, आणि सुरजच्या या त्यांच्या मुलांच्या रूपाने त्यांच्या जिवनात एक चैतन्य बहरत होतं…. अनुजा सकाळी लवकर तिच्या ऑफिसला जायची, आणि मग विवेक त्यांच्या मुलांना शाळेत सोडायचा आणि परत तो फॅक्टरीत कामाला जायचा… शाळा सुटल्या नंतर किरण आणि सुरज त्यांच्या पिंका मावशीच्या पाळणाघरात जात होते… आणि ती पिंका एक गावाकडील कमी शिकलेली, पण खूप हुशार आणि एक खूप समजदार मुलगी होती….

काही वर्षा मागे तिच्या पतीच्या निधनानंतर ती खचून न जाता तिने घरच्या घरीच एक छोटेसे पाळणाघर चालू केलं आणि आता तीच आपल्या सासू सासऱ्यांचा आधार बनली आहे… अचानक काळाने धाव साधला…. विवेकच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या त्याच्या बायकोला आणि मुलाला एका भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली, आणि अनुजा आणि सुरज त्यांना सोडून कायमचे निघून गेले.. आणि ते आता कधीचं परत येणार नव्हते… विवेक तर या घडलेल्या घटनेने खूप हादरूनच गेला होता…. आणि आता त्याची काहीच करण्याची मनस्थिती होत नव्हती…

किरण तर खूपच लहान होती तेव्हा… आणि तिला काहीच कळलं नव्हतं की काय झालं आहे ते… पिंका मावशीला ही घटना कळतच ती लगेच येऊन, किरण ला तिच्या घरी घेऊन गेली होती..विवेकला तसे कोणाची जवळचे नातेवाईक नव्हते, फक्त त्याची आई होती… ही दुःखद बातमी तिला कळताच ती धावत अली होती…. पण किरण, आणि विवेककडे बघून आई ने ही धक्का खाल्ला होता… आणि त्यामुळे आता विवेकपुढे काही पर्याय नव्हता, त्याला कामावर तर जाणं भाग होतं… त्याने घरी पूर्णवेळ मदत करण्यासाठी एक बाई ठेवून तो कामावर गेला.. किरणने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं….

त्या लहान जीवाला तिचे आई आणि दादा हवे होते.. मग तिच्या आज्जीने किरणला कसं बसं सावरलं होतं… नंतर चार-पाच दिवसानी पिंका मावशीने तिची पूर्णता जवाबदारी घेतली होती… आता दिवसभर किरण पिंका मावशीकडेगेच राहायची… तिला ही आधीपासून पिंका मावशीचा खूपच लळा होता, आणि आता तर किरण तिझ्या मावशीत तिझी आई शोधत होती. किरण कडे बघून पिंकाच्या जीवाचा नुसता कालवा कालव व्ह्यायचा… आणि खूप प्रेमाने तिने किरणला सांभाळलं… कधी कधी पिंका विवेकच्या घरी जायची आणि त्या घरातील जवाबदारी ही उचलायची.. आणि यामुळे आजीला.

आणि विवेकला ही आता जरा धीर आला होता… आता किरणची काळजी जवळ पास मिटलीचं होती…. आणि किरणने आता तर पिंकाला आपली आईचं मानलं होतं. किरणच्या शाळेतही मदर्स मीटिंगला पिंकाला पाहून तिच्या मैत्रिणी म्हणायच्या, ‘ अगं ही कोण आहे?? आणि किरण तुला तर आई नाही ना गं.’ असे विचारायच्या तेव्हा ती, ‘मी किरण ची आईचं आहे, फक्त मी तिला जन्म दिला नाही, पण आता ती मला आईच मानते..’ असं पिंकाने सांगितलं होते. आणि तेव्हापासून त्या दोघी एकमेकींसाठी मानलेल्या आई – लेकी झाल्या होत्या.. किरण हळूहळू मोठी होत होती..

आणि या मधल्या काळात आजीही देवाघरी गेली होती.. आणि तिने मानलेली आईचं आता तिचे सर्वस्व झाली होती… विवेकला कधी कधी एकटेपणा जाणवायचा पण त्याने किरणचा विचार करून, कधीच दुसरं लग्न करण्याचा विचार केला नाही. किरण आता मोठी झाली त्यामुळे ती आता पाळणाघरात जात नव्हती, पण ती दिवसात एकदा तरी पिंका मावशीकडे जायची.. त्याशिवाय तिला चैनचं पडत नव्हता.. पिंका मात्र यादिवसात खूप एकटी पडली होती… किरण नसल्यामुळे तिला ही खूप जास्त वाईट वाटत होतं. आणि वयात आलेल्या किरणला तिच्या वडिलांचा एकटेपणा ही दिसत होता…

आणि तिला एक छानशी कल्पना सुचली..! तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘ बाळ तुला काय हवं’ असं तिच्या बाबांनी आणि पिंका मावशीने ही तिला विचारलं होतं, आणि तिला जे हवं ते देण्याचं प्रॉमिस ही त्यावेळी तिने त्यांच्याकडून घेतलं होतं… तिच्या वाढदिवसाची सगळी तयारी तिच्या पिंका मावशीनेचं केली होती… आणि आता तिची वेळ होती तीच गिफ्ट मागण्याची.’ ती म्हणाली मला माझे आई आणि बाबा दोन्ही एकत्र हवे आहेत..’ आणि तिने लगेच तिच्या बाबांचा आणि पिंका मावशीचा हात एकमेकांच्या हातात दिला… ते दोघेही आनंदी झाले कारण आता त्या दोघांना बरोबर येऊन किरणला.

सगळी सुख देण्याची संधी मिळणार होती. आणि त्या तिघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते..! आणि तिने मानलेली आई आज खऱ्या अर्थाने तिची आई बनली होती..!

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!