वडिलांना अटॅक आला म्हणून आईने मुलाला फोन लावला पण पुढे मुलगा आला नाही म्हणून घडले असे काही की पाहून तुम्हाला..

“काका चला मग तयार आहात ना..? चला आपण घरी जाऊयात… मी आज सगळी सगळी औपचारिक कामं पूर्ण केली आहेत, आणि परत डिस्चार्ज पण घेतला आहे… अनु चल ग लवकर, तू आणि काका ये बाहेर, मी जाऊन गाडी काढतो… आणि काकू आपली घरी वाट पाहत बसल्या असतील.’ अमोल चं हे वाक्य कानावर आलं आणि अनु सगळं आवरायला लागली.. रमाबाई घरी वाट पाहताच होत्या या सगळ्यांची.. यांनी तर घरामध्ये आरतीचं ताट ही करून ठेवलं होतं… आणि आता लवकरचं पांडुरंगराव घरी येणार म्हणून त्या घराच्या बाल्कनीत येरझाऱ्या घालता होत्या.. आणि अचानक त्या एकदम भूतकाळात गेल्या..

‘कित्येक वर्ष झाली ह्यांना कधी साधा खोकला ही झाला नाही. आणि माझ्या मात्र प्रत्येक वेळी काही न काही कुरबुरी चालू असतात.. पण परवा अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं होत, आणि तेव्हा आम्हाला काय करावं सुचेचना…आणि रात्रीचं १२ वाजता अनुच्या घराचं दार वाजवायचा म्हणजे त्यांना ही खरं म्हणजे तर प्रशस्त वाटणार नाही का..? अगदी ते आमच्या बाजूलाच रहात आहेत म्हणून काय झालं… तरीही मी ते नेहमीप्रमाणे माझी मदतीला नक्की येईल म्हणून मी त्यांच्या दाराची बेल वाजवली, आणि खरं म्हणजे अनु आणि अमोल लगेच ह्यांना त्यांच्या गाडीत घालून हॉस्पिटला घेऊन सुध्दा गेले…

त्या मुलांनी खरंच कोणता ही मागचा पुढचा विचार केला नाही त्यावेळी… तरीच ते गेल्या काही दिवसांपासून मला हे म्हणतच होते, की मला काही वाटत नाही की यावेळी मी आषाढीला पंढरपुरी जाऊ शकेन.’ मला ही वाटलं की असंच म्हणत असतील ते.. म्हणून तेव्हा मी ही त्यांना म्हंटल, ‘तो विठोबा काही फक्त तुमची वाट बघत नाही दर वर्षी…आणि तसही त्याला भेटायला आणि बरेच भाविक येतात जरवर्षी.. आणि ते सुध्दा पायी चालत चालत येतात… आणि तुम्ही तर छान चारचाकी गाडी करून जाता पंढरीला.. त्यामुळे नाही गेलं पंढरीला एखादं वर्ष तर काहीच फरक नाही पडत ओ..

त्यामुळे करा जरा यावेळी इथूनच नमस्कार विठ्ठलाला.. आणि मग हे त्या अगदी अचानकचं दुखणं आलं होत रात्री, आणि बरोबर याचं वर्षी विठुराया, आणि अगदी याच वेळी त्यांची पंढरीची वारी चुकणारच की रे बाबा.. एवढं के झालं रे?? मी ह्यांची नुसती गम्मत केली होती, तर तू पण लगेच असं मनावर घेतलंस, आणि माझीच ही बरोबर फजिती केलीस की रे.’ असं म्हणत म्हणत रमाबाईंनी देवघराकडे जरा रागानेच बघितलं.. आणि तेवढ्यात अमोलची गाडी गेटमधून आता शिरली त्यांनी बघितले… रमाबाई लगेच उठल्या आणि आता जाऊन आरतीच्या ताटातील दिवा लावला आणि बाहेर दारापाशी येऊन थांबल्या…

त्यांनी पांडुरंगरावांना ओवाळून घराच्या आत घेतलं मात्र.. अगदी लगेचच अनुने घराआता येऊन सगळ्या घराचा ताबा घेतला… चला आता काकांना थोडा आराम करुदे, आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते, आणि आपल्या काकांना साठी गरम गरम हळदीचं दूध आणते करून.’ रमाबाई अगदी हलक्या आवाजात म्हणाल्या. ‘अग नको गं मी बनवला आहे की चहा… तो तुम्ही दोघे घ्या आणि एक तुम्ही ही जरा आराम करा की… चार-पाच दिवस झाले तुम्ही ही खूप धावपळ केली आहेत आमच्या साठी… ह्यांचं ही दुखणं चार-पाच दिवसात कमी होऊन, आणि त्यामुळे डॉक्टरांनीही यांना घरी सोडलं म्हणून ठीक झालं…

नाहीतर वेळी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती रे, त्यात हा पाऊस तर खूप पडत होता. ‘ यावर अमोल म्हणाला, ‘अहो काकू आपल्या काकांना तर बरं व्हायचंच होतं… आणि तो अगदी छोटा सौम्य हार्टअटॅक होता… आता तुम्ही ही पहा की ते परत कसे फिट होतील तुमच्या हातचं चवीचवीच खाऊन.. अमोल असं म्हणताच घरातील सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटली होती.. आणि त्यामुळे सगळ्यांचा ताण थोडा हलका झाला होता.. चला तर काका आता जरा आराम करा.. तरीही काळजी मात्र सगळी मोठा असल्यासारखीच घ्यायची होती बर का..?

आणि डॉक्टरांनी देखील मला असंच सांगितलं आहे.. ‘हो रे अमोल.! तू म्हणशील तसंच होणार…. असं म्हणत पांडुरंगराव हळूहळू चालत खोली आत गेले… नंतर ही ते दोघे सारखी घरात ये- जा करतच होते… शेजारीच आहेत म्हंटल्यावर काय.?? ते पथ्यपाणी, खाणंपिणं पण अनु सारखी येऊन बघत होती… आणि बाहेरून काय हवे आहे तेही आणून देत होती ती.. अमोल पण कधी कधी ऑफिसमधून थेट इथेच यायचा आणि चौकशी करायचा…

१०-१५ दिवसांनी पांडुरंगरावांचा चेहरा पुन्हा एकदा थोडा होता, आणि तो पडलेल्या चेहरा बघून, रमाबाई घाबरल्या होत्या… त्या म्हणाल्या ‘काय हो परत काही होतंय का तुम्हाला?? चला आपण जाऊया डॉक्टरांकडे, ‘त्यावर पांडुरंगराव म्हणाले की डॉक्टरांकडे नको.. अहो काय झालं ते सांगा की लवकर.. ‘एक सुस्कारा सोडत सोडत पांडुरंगराव म्हणाले, अगं रमा आपला मुलगा तर अगदी काही तासांवर राहतो, आणि तू त्याला फोन ही करून तो आला नाही… एवढा कसा कठोर हृदयाचा झाला आहे तो गं.. आपण त्यावर तर असे संस्कार केले नाहीत कधी, त्याशिवाय आपल्याजवळ पहिल्यापासून माझे आईबाबा त्यानंतर..

मग तुझी आई असे सगळे होतेच की आपल्याबरोबर नेहमी, आणि तूही किती आनंदाने केल होतंस त्या सगळ्यांचे… कधी कधी तरी घरात भांडण होणारचं पण घर म्हंटल की ते सगळं आलंच ना.. पण तरी सुद्धा आपल्या घरातले वाद हे कधी घरा बाहेर पडणार नाहीत याची नेहमी काळजी घेतली.. आणि हेच संस्कार त्याच्यावरही झाले आहेत ना, मग तरीही आपण कुठेतरी चुकलो आहोत का ग?? इतका की,, तो आपल्या कडे आला तर नाहीच पण नंतर एक साधा फोन ही केला नाही त्याने… अग तो ही एक बाप आहेच ना त्याच्या मुलाचा… मग स्वतःच्या बापाचं हृदय ही कळलं नाही का त्याला, आणि हे एक आपल्या शेजारचे..

ना आपल्या नात्यातले ना आपल्या रक्ताचे, पण ते दोघे किती करतात आपल्यासाठी… आता गेल्या दोन-तीन वर्षपासून तर अगदी त्यांचे आईवडील असल्यासारखंच करतात ते..’ रमाबाई हे सगळं ऐकत तर होत्या पण त्या मनातून खूप रडत होत्या… पण बाहेर त्या अगदी कणखर आहेत असं दाखवत होत्या… त्यांनी पांडुरंगरावांना धीर देत समजावलं.. अहो असं दुःखी नाही व्हायचं बरं.. आणि तस ही ते चांगलं नाहीच तुमच्या तब्येती साठी… संजय आता परत आपल्याकडे कधीच येणार नाही हे आता तुम्ही तुमच्या मनाला समजावून टाका बर… त्याला येथे होणारी धावपळ आणि घड्याळाच्या काट्यावर धावणं हे नाही..

पसंत पडत त्याला… आणि त्यामुळे त्याला बाहेरगावी जास्त आरामदायी वाटतं पाहायला… त्याचा ही एक परिवार आहे आता, आणि तो त्यात पूर्णपणे रमलाय, यातच आपण समाधान मानायचं आणि पुढे जायचं… आणि तसं ही आपलं आता किती आयुष्य उरलंय.. आता आपण विठू माऊलीच्या चरणी लीन व्हायचं, आणि आपले शेवटचे क्षण हसत हसत, विठ्ठलाच्या चरणांना मिठी मारायची की झालं कल्याण… अहो, आपण तर फक्त संजयचे जन्मदाते आहोत, पण ती आपली माऊली तर बघा उभ्या विश्वाची आई आहे. ती कुठे कधी थकते आणि रुसते..’ तिच्या लेकरांवर… पांडुरंगरावांनी हलकीशी मान डोलवत म्हंटल..

‘हो. अगं तू त्याची आई असूनही अशी शांत कशी आहेस गं, मी तर सगळ्यात आणि विशेषतः संजय मध्ये अजूनही बाहेर पडलो नाही.. आणि तू जे म्हणतेयस तेही पटतंय ह मला.. शिवाय यावेळी मला पंढरीला ही नाही जाता येणार गं, आता बघ की किती जवळ आली आहे आषाढी. आणि माझा इतक्या वर्षांचा नेम यावेळी मात्र चुकणार बघ.. लहानपणापासून कित्येक वर्षे चालतच गेलो की मी वारीला पण आता गेल्या ७-८ वर्षात पायी जायला जमत नाही म्हणून गाडीचा खटाटोप करायचो… पण तुला आठवत का.?? पूर्वी मी कित्येक वेळा या गर्दीत संजय ला माझ्या खांद्यावर बसवून चालत चालत घेऊन जायचो….

तूही मला खूप चिडायचीस, पण तरी मी त्याला हट्टाने घेऊन जायचो कायम… आणि आज बघ..’ ‘अहो तुम्ही असं काय करताय.??तुम्ही जर परत परत त्याचाच विषय काढलात तर मग तुम्हालाच त्रास होणार ना.. अहो हा अमोल आपल्या संजय एवढाच आहे ना… अहो, मग संजयचा नाही तर, माउलींनी अमोल दिला आहेच की आपल्या आधाराला… अहो चला की आता सोडा तो विषय बरं, बघा बाहेर छान पाऊस पडतोय, चला मी तुम्हाला गरम चहा देते आल्याचा.. तो घ्या म्हणजे तुम्हाला कसं बरं वाटेल’ असं म्हणून त्यांनी स्वयंपाकघरात गेल्या, आणि त्यांनी आपल्या डोळ्यांना मनसोक्त वाहून जायला मोकळीक दिली होती.

आणि दोन-तीन दिवसांनी सकाळी लवकर त्यांच्या दारावरची बेल वाजली, म्हणून रमाबाईंनी दार उघडलं.. ‘अरे अनु, एवढ्या लवकर ७ वाजताच… काय ग काय झालं आहे का?? घरी सगळं ठीक ना?? ‘अहो काकू, आम्हाला दोघांनाही यायचंच होतं इकडे.. ते ही अमोल ऑफिस ला जायच्या आधी, आणि तेही आजच. मग बघू म्हंटल की तुम्ही उठला आहेत का नाहीतर नंतर येणार होतो संध्याकाळी..’ आत येत येत त्यांनी अनुला म्हंटल,, ‘अग ये की बाळ’ आता आम्हा म्हाताऱ्यांना कुठे येते जास्त झोप या वयात आम्ही सकाळी लवकरच उठतो गं… अगं आमचं आवरून झालं पण आहे कधीच…

त्यात आज एकादशी आहे न मग काय तुझे काका जपाला बसले आहेत सकाळ पासून.. आणि मीही पूजा करायला बसले होते तेवढ्यात तू बेल वाजवलीस… बरं आज खिचडी केली आहे नाश्त्याला तू जाताना खाऊनच जा बाळ… आणि अमोल कुठे आहे?? ‘तो येईलच इतक्यात’ असं म्हणून अनु आणि रमाबाई घराआत गेल्या… ‘काय काका बरं वाटतंय की नाही अजून’ अहो दोन दिवस मी खूपच बिझी होते ही म्हणून मी आणि अनोल आलो नाही… आणि एक गोष्ट बाजारातून आणायची होती त्यासाठी काल दिवस भर खूप फिरले आणि शेवटी मनासारखी गोष्ट मिळाली.. ‘काय ग कुठली गोष्ट?? अगं बाळ मला सांगायची होतीस..

गं माझ्याकडे असती तर मी दिली असती की तुला.. आता माझा मेलीचा इतक्या वर्षांचा संसार आहे, कित्येक जास्तीच्या वस्तू घेतलेल्या आहेत, ज्या आता लागतही नाहीत मला.. ‘हे काय, मी ती अमूल्य गोष्ट लगेच आलोच घेऊन थांबा.’ असं म्हणतंच अमोल घराआत शिरला… ‘अगं अनु उठ लवकर, आधी हे देऊयात की, मला या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे गं,’ असं म्हणत म्हणत दोघांनी त्यांच्या हातातली एक जड गोष्ट काका काकूंना हातात दिली. त्या दोघांनी ती उघडून बघितली आणि त्या दोघांचे डोळे पाझरू लागले.. थोडावेळ सगळंच शांत झाले, मग पांडुरंग काका खूप आनंदाने म्हणाले..

‘अमोल, बाळा ही तरी माझी मायमाऊली आहे रे’ किती सुंदर आहे, ही तर अगदी आखीवरेखीव आणि अगदी हसरी मूर्ती आहे रे… माझे मायबाप – माझा विठुराया आणि माझी रखुमाई.! काका आणि काकूने त्यांनी त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणले, ‘ अरे किती कराल रे आमच्यासाठी तुम्ही.. आमच्या सख्या मुलाने तर आमच्या कडे ढुंकूनही पाहिलं नाही, आणि तुम्ही तर रक्तापेक्षा ही खूप जास्त करताय आमच्या दोघांना साठी… आणि कसे ऋण फेडणार आम्ही तुमचे?’ रमाबाई तर काही बोलल्याच नाहीत, अमोल आणि अनु दोघे हे दृश्य पाहून खूप खूप आनंदीत झाले होते. अनु म्हणाली..

‘काकू, मी ह्यांनाच तर शोधत होते बाजारात… तुम्ही दोघे पाहून अगदी थक्क व्हाल अशी ही मूर्ती आणता-आणता पार पुरेवाट झाली बघा माझी… अहो, काका आम्हाला तुमच्या ऋणातच रहायचं आहे बघा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की माझे आणि अमोलने दोघांचेही आईबाबा आम्ही अगदीच लहान असताना आम्हाला सोडून गेले, आणि आम्ही दोघेही आईवडिलांशिवाय वाढलो आहे.. वेगवेगळ्या अनाथाश्रमात. त्यामुळे आम्ही आई-वडिलांच्या त्या विशेष, अशा वेगळ्या प्रेमाला भुकेले होतोच.. जेव्हा ५ वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो रहायला होतो, तेव्हा पासून ते प्रेम मला आणि अमोलला तुम्ही दिलंत…

त्याशिवाय जेव्हा मी इथे आले तेव्हा मला मेनोपॉज चा त्रास होत होता. त्यावेळी काकूंनी अगदी आईच्या मायेने केलं होत माझं सगळं…. मग त्यापुढे आम्ही करतोय ते तर काहीच नाही ओ काका… आपल्या घरांच्या मधली ती भिंत आपलं नातं थोडीच अडवू शकणार होती.. ते नात तर घट्टच राहणार होतं.. तुमची दर वर्षीची पंढरीला जायची इच्छा या वर्षी देखील पूर्ण होणार नाही म्हणून, ही आमच्या दोघांकडून, आम्ही दोघांनी मानलेल्या माझ्या मायबापाला दिलेली, ही त्यांच्या मायबापाची मूर्ती.. आणि हो, संजय दादांना पण हे नक्की कळेल की त्याच्या आईचं आणि बाबाचं प्रेम… मग तेव्हा कसे धावत धावत येतील बघाच तुम्ही..

चला आता मी माझं पुराण थांबवते.. चला आता आम्ही येतो. काकू तुम्ही रात्रीला काही जेवण करू नका, मी आज रात्री छानशी खारकेची खीर आणि त्याबरोबर बटाट्याचा किस घेऊन येते मग आपण सगळे एकत्रच जेवण करू..’ असं म्हणून ते दोघे दाराजवळ गेले, आणि पांडुरंगराव म्हणाले, ‘रमा ते बघ आपल्या दोघांचे खरे विठोबा- रखुमाई. ते आपली काळजी घेण्यासाठी आपल्या शेजारी आपल्या मानलेल्या मुलांच्या रुपात आहे आहेत गं’ ते दोघेही एकदा त्या मूर्तीकडे आणि एकदा अनु आणि अमोल कडे बघत राहिले होते आणि मग त्यांचं मन एकच गं म्हणत होतं,… आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!