
आता मी तर काय काय म्हणून बघावं किती आवराव आता सगळीकडे काय मी एकटीच पुरणार आहे का….? मलाही काही कंटाळा येत असेल की नाही,… सस्वतःशी पुटपुटत, बोलत आणि भरपूर राग राग करत ती गडबडीत चार-पाच घास नाष्टा करून गीता घरातुन निघून गेली तिच्या ऑफिसला…घरात आईने निराश होऊन तिची ती डिश उचलते, तेवड्यात टेबलावर उदास होऊन बसलेली पिल्लू म्हणाली, ‘आजी,.. अगं माझी आई किती राग राग करते ग घरतल्यावर, आजी तू सांग ना जरा तिला की मला तिच्या या रागात सोभावाचा आता त्रास होतो… आणि मला तर आता ती जर अशी चिडली की खूप भीती वाटते अगं…
आणि मला त्रास होतो मग मला रडू पण यायला लागतं… हो ग पिल्लू अस समजावत आजीने तिझ्या नातीला जवळ घेतलं… खरं म्हणजे माझ्यासारखं आयुष्य वाट्याला आलेली, आणि माझी ही दुर्भाग्यशाली लेक, तिला अजुनही तिचा नवरा गेलेल्या आहे हे सत्य स्वीकारता येऊ नये, हेच दुःख रेखाबाईला होतच,.. खरं म्हणजे आपल्यावर ही असाच प्रसंग आणि तोही अश्याच वयात आला होता, पणमी काय डगमगलो नाही…. हा वाईट तर खूप वाटलंच, पण कधी खचून माझं आयुष्य सैरभैर केलं नव्हतं मी… आणि मला माझ्या आई सारख्या सासूबाईंनी तेव्हा मला सावरलं होतं, माझी आई तर माझा जवळ नव्हतीच.
पण हिच्यासाठी तर मी वर्ष झाले माझ्या मुलाचं माझं घर सोडून हिच्याकडे राहायला आलो आहोत,…. आणि हि हे जगण्याचं सत्य कधी एकदा स्वीकारते, आणि आपले आयुष्य परत ह्या तिच्या लेकरासह सुरू करते, फक्त या गोष्टीची वाट बघत थांबलोय, पण ही तर स्वतःच आयुष्य आणि बाहेरच आयुष्य एक करून नुसती गडबडून गेली आहे, त्यामुळे खूप चिडचिड करतीये… खरं तर कस सांगावं हिला… रेखाबाई तर याच विचारात होत्या, आणि तेवढयात पिल्लुने त्यांच्या नाकाशी कम्पासपेटी धरली आणि म्हणाली, ‘आजी बघ ना किती मस्त, चांगला सुवास येतोय या माझ्या कम्पासपेटी मध्ये सांगू बघू कसा काय येतो ते..??
मी काय केलं माहीत आहे तुला, मी ना माझी थोडीशी पावडर त्या पेटीच्या खालच्या कागदाला लावली आहे, मग बघ की ह्यात किती मस्त सुगंध आला आहे… आजी बघ ह्या माझ्या पेन, पेन्सिल आणि पट्टीला त्यांना किती थकवा येत असेल, सतत लिहून मग त्यांच हे आराम करण्याचं घर कसं छान दिसलं पाहिजे ना… हे बघ की मी त्यांच्या साठी हा मऊमऊ कागद पण ठेवला आहे आत… आजीबाई जरा हसल्या, आणि त्यांना आठवलं की त्यांची लेक ही लहानपणी अशीच होती आणि अशीच जपायची आपला कम्पास नेहमी…. आणि एक छोटी अगरबत्ती ठेवत होती कम्पासमधल्या कागदाखाली कायमची…
आणि मला म्हणायची आई, मला ना हे माझं घर वाटतं अगं ह्यात असणारे साहित्य पेन्सिल, पेन, कोन आणि पट्टी हे सतत काम करून कंटाळतात, थकतात त्यांना जरा छान ठेवलं की त्यांना ही खूप बरं वाटेल ना आई… आणि मी ही हसुन तिला म्हणायचो, ”पण ही पेन्सिल संपली की मग..?? तर ती म्हणायची, ‘तिला मी जेव्हा शार्पणरने छिलताना तिचे ते गोल गोल साल ठेवलेत आहेत की मी त्या कागदाखाली आडवण म्हणून.. मग काय नवीन पेन्सिल घाययची, आणि जर आठवण आली त्या जुन्या पेन्सिलिची तर त्या तिच्या जुन्या गोलांना काढून बघायचं. पण त्यानांही ह्या त्यांच्या घरात खूप चांगलं आणि छान वाटावं म्हणून.
तर मी माझा कमाप्स छान सजवते… अगदी आपल्या घरातल्या देवघरासारखा… कधी कधी तरी मोगऱ्याची फुलं ठेवते मी त्यात… अबी मी वर्गात गेल्यावर जेव्हा कम्पास उघडला की सगळ्या वर्गात सुगंध येतो ह्या माझ्या कम्पासचा,…. आई माझ्या ह्या कम्पासच विश्व छोटं असलं तरी खूप सुगंधी आणि छानच असावं… आणि आई मी कितीही पेन, पेन्सिल किंवा कम्पासपेटी बदलल्या तरीही,.. अगदी नंतर तिने हे बारावी पर्यंत सांभाळून ठेवलं होतं…हे सगळं आठवून आईला काहितरी सुचलं होतं.. आईने खोलीत जाऊन जुन्या कपाटातल्या एका खालच्या कप्प्यात तिने जी जपलेली ती कम्पासपेटी होती, ती आईने काढून..
एका अशा टेबलावर ठेवली की ती तिला लगेच दिसेल, आणि पिल्लूच्या कानात काहितरी सांगितलं…. संध्याकाळी गीता आली तिचं चहापाणी झालं मग पिल्लुने तिची ती कम्पसपेटी आईच्या नाकाखाली नेली तेंव्हा गीता म्हणाली, ‘अगबाई माझ्या पिल्लुच्या पेटीचाकिती छान सुगंध येतोय” त्यावर पिल्लू म्हणाली, ‘ हो मग पण बघ तुझ्या त्या जुन्या पेटीत कसा घाण वास येतोय ते,… आणि त्यातल्या सगळ्या वस्तू किती खराब झाल्या आहेत ते,… आणि तिने तिच्या आईसमोर ती जुनी कमप्सपेटी धरली… गीताने ही पटकन ती उघडली बघते तर काय खरंच त्यातील जून सगळं त्यात मळून पासलेलं आणि त्याचा वास ही घाण येत होता…
मागे एकदा आईकडे बाबांनी घरातील सगळ जून सामान भंगारमध्ये काढलं दिल होत, त्यावेळी आपण हि पेटी घेऊन इकडे आलो होतो… पण परत तिला काही पाहिलं नव्हतं,… आणि आज पिल्लूने ति पेटी तिच्या हातात देताच तिने पटकन ती झटकली.. हसत हसत ती पिल्लूला म्हणाली, अगं बाळा तुझ्याकमप्सपेटी पेक्षा ही मी माझी कम्पास पेटी खूप छान ठेवत होतो… हो ना ग आई, थांब तुला दाखवते म्हणत, तिने पेटीतलं सगळं जून सामान बाहेर काढलं आणि दुसरा नवीन कागद ठेवताना ती म्हणाली, ‘आई त्या कुंडीतल्या तो मोगऱ्याच्या कळ्या दे ना अगं जरा.. त्या घेऊन कागदावर ठेवल्या, जुनंच असलेलं तिचं ते सगळं.
सामान तिने खूप छानपणे मांडल, आणि ती पेटी दोन मिनिटं साठी बंद केली…आणि मग परत उघडून पिल्लूच्या नाकाला लावली आता बघ कसा सुगंध येतोय ते,… मला ही आवडायचं अग अस आपलं विश्व आहे असं सजवून ठेवायला… तिच हे वाक्य ऐकल्यावर आई मध्येच बोलली.. ‘ तू हे सगळं लक्षात ठेवलं आहेस, पण एक महत्त्वाची गोष्ट विसरली, तु ती सम्पणारी पेन्सिलची साल कशी त्या कागदाखाली घालुन ठेवलीस… आणि तू ती नवीन पेन्सील वापरात होतीस, आणि जर तुला त्या जुन्या पेन्सिलीची आठवण आली, की तु त्या कागदाखालून त्यांना साली काढून बघायची, तुला पण त्यांना कम्पासमधला कुबट, खराब वास नको वाटायचा,
म्हणून तुझी कम्पसपेटी स्वच्छ आणि सुगंधी ठेवायची आठवतं का नाही तुला… अगं बाळा हेच जगण्यात लक्षात ठेव की गं… तुझा नवरा त्या जुन्या पेन्सिलीसारखा होता ग, आणि तो आता या जगात नाही पण त्याच्या आठवणी फक्त तुझ्याच आहेत, आणि तुझ्या त्या आठवणी तू तुझ्या रागात आणि चिडक्या, कुबट वासात घालून टाकत आहे गं,… त्या जुन्या पेन्सिली पेक्षा आता आपली पिल्लू तुझी एक नवीन पेन्सिल आहे, आणि तिला खूप आंनदी ठेवायचं आहे हे तुझ्या या दुःखा मुळे तूच विसरून जातीयेस गं बाळा,…. जर तुझी ईच्छा नाही की दुसरं लग्न करायचं तर तू करू नकोस बाळा, पण तुझी आणि तुझा लेकीची असलेली..
हि कम्पासपेटी तू स्वच्छ, आंनदी ठेव.. त्या तुझ्या जुन्या पेन्सिली च्या सालपटांनी जसं तुझ्या मनावर संस्कार केलाय,आणि एक प्रत्येक माणसाचे आयुष्य हे कधीना कधी तरी संपत असतं, त्यात फक्त येवडच की कुणाच जरा लवकर तर कुणाच उशिरा संपत… पण हे संपलेले आयुष्य आपण आठवणीसारखं जपायचं असतं,.. पण यामुळे आपले चालू आयुष्य जर सतत रागीट आणि कुबट होत असेल, तर आपलं जीवन स्वच्छ आणि सुगंधी कसं होणार ना बाळा,… म्हणून जरा विचार कर बाळा… यासारखाच कम्पास मधला तो मोगरा बदलत राहायचा कधी कधी नव्या विचारांनी, नव्या कल्पनांनी, तर कधी नव्या स्वप्नांनी यामुळे.
आपल्या कम्पास मधल्या त्या जुन्या आठवणी ही सुगंधी राहतील आणि त्या नव्या पेन्सिलीही.. आपल्या आयुष्याची सगळी कम्पसपेटी सुगंधी करून टाकतील….. एवढं बोलतच रेखाबाईने आपल्या लेकीला आणि नातीला पोटाशी घट्ट धरलं… आणि टेबलावरच्या त्या कम्पसमधून मोगऱ्याचा वास दरवळत होताचं… जो आता कायम सरूपी येणार होता……