जेव्हा या व्यक्तीने एका अनाथाश्रमातील आजी आणि आजोबांना आपले वडील समजून घरी आणले तेव्हा पहा तेथील लोकांनी त्याचे काय केले..

‘अरे लोकांना हसु येईल तुझा हा निर्णय त्यांना कळला तर,…’ आताच त्यांना कळवून टाका की आमचा निर्णय बदलला आहे, त्यामुळे आम्ही येणार नाही म्हणून… रेखा मावशीचं हे वाक्य ऐकुन घरच्या दरवाज्यात मोठा लाल फुगा बांधण्यासाठी चढलेला तो एकदम दचकून खाली उतरला, आणि मावशीला म्हणाला, ‘ अगं मावशी प्लिज हं हा आमचा निर्णय पक्का झाला आहे, आणि त्यामुळे आम्ही तुला आमच्या ह्या आनंदात सहभागी व्हायला बोलावलं आहे, त्यामुळे प्लिज तू आता आम्हाला काही सल्ले देऊ नकोस ना… ‘त्यावर रेखा मावशी म्हणाली, ‘हो रे बाळा नाही बोलत कुणाला, मला काय आम्ही तर म्हातारा म्हातारी कधी कधी जड होतो.

आम्ही आमच्या लेकरांना आणि तुम्ही उपरे आणायचा विचार करत अहेसा, म्हणून विचार केला की एकदा सुचवून पाहावं..’ त्यावर अनु मावशींजवळ गेली आणि म्हणाली, ‘तुम्ही नका ना विचार करू मावशी आम्ही दोघांनी सगळा नीट विचार करून आणि चांगली माहिती काढून हा सगळा निर्णय घेतला आहे….अहो आणि एक “सावली” हे वृद्धाश्रम रवीच्या जवळच्या एका मित्राच्या बाबांचं आहे… आणि तेही बऱ्याच वर्षांपासुन चालवतात…यामुळे आम्हाला सगळी माहिती अगदी व्यवस्थित मिळवली आहे..’ त्यावर मावशी म्हणाल्या, ‘तुमचं ठरलंय तसं तुम्ही करा, आणि निघा आता तुम्ही दोघे वेळ झाली तुमची जायची मी मी पण जरा.

औक्षणच ताट करून ठेवते..’ रवि आणि अनु सावली या वृद्धाश्रमात आले… त्या वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये ते दोघे आपलं सामना घेऊन आले आणि तिथे बसलेले… ह्या दोघांना पाहिल्यावर एकदम चेहर्यावरील सगळा ताण कमी झाला, असं त्यांच्या तेव्हां व्यवस्थापक म्हणाले.. ‘बघा ते आले कि नाही, तुम्हाला उगाचच वाटत होतं की त्यांनी निर्णय बदलला कि काय..?? काही कागदांवर सह्या झाल्या तेंव्हा ती दोघे स्वयं खुशीने या आश्रमात राहायला आलेली होती.. त्यांना मुलं बाळ नाही असं त्यांनी आधीच प्रवेशाच्या फॉर्ममध्ये लिहून दिल होत आम्हाला, आणि तसेही रवि त्यांच्या माहितीतील असल्याने संस्थाचालकांनी ह्यांना ही संस्था सोडायला.

सहमती दर्शवली होती… रवी, अनु आणि ते दोघे ऑफिसातून बाहेर पडले, तेंव्हा तेंव्हा आश्रमातील अनेक थकलेले डोळे त्यांना या नव्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत होते… तेथील बायका आपल्या पदराने अश्रू पुसत होत्या, त्यांच्या आजुबाजुच्या अनेक खिडक्यांतून काही उत्साही, तर काही थकलेले काहीना अगदी उठताही येत नसल्याने हात त्यांना टाटा करून शुभेच्या आणि निरोप देत होते… त्यांच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होत होती… आणि आश्रमाच्या बाहेरच्या गेट येताच त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडुन रवि आणि अनु ने कमरेत वाकुन सन्मानाने त्यांना गाडी आत बसण्याचा ईशारा केला,. ते दोघे त्याक्षणी जर गडबडले.

कारण त्यांनाही हा निर्णय घ्यायला खूप विचार करावा लागला होता… पण रवी आणि अनुचा विचारां वरून च त्यांनी हा निर्णय घेतला होता, खरंतर ह्या निर्णयात आजींनी जरा जास्त पुढाकार घेतला होता, हे त्या दोघांना ही लक्षात आलं होतं… अनु आता गाडीच्या खिडकीतुन बाहेर बघत होती… आणि आता तिला एका महिनाभरापूर्वीचा प्रसंग आठवत होता.. रविच्या वाढदिवसानिमित्त रवीने त्या आश्रमात सकाळी लवकर जेवण आणि परत चार वाजता आईस्क्रीम छोटीशी पार्टी ठेवली होती… आश्रमाच्या हॉलमध्ये सगळे वृद्ध एका जागी जमले होते.. रविला सगळ्यांनी टाळ्या वाजुन खूप शुभेच्छा दिल्या, आणि वृद्ध अगदी एका लहान मुला.

सारखे त्या आईस्क्रीम वर ताव मारत होते… या वृद्धाश्रमात कितीतरी चांगल्या गोष्टी बाहेरचे लोकं देतात… कधी कधी फळ, बिस्कीट, गोड पदार्थ, औषधी, कपडे आणि काही तरी गिफ्ट असं बरंच काही, आणि एक मात्र खरं असतं या वृद्धावस्थेत थोडंसंच पण कित्येक वेग वेगळं काही खावं वाटतं पण, ते काही त्यांच्या हक्काचं घरं नसत त्यामुळे बऱ्याच इच्छा त्यांना माराव्या लागतात.. यामुळे ज्याच्या जवळ जरा पैसे असतात ते त्यांना मिळत ते आणुन खातात, पण बाकीचे ज्यांच्या जवळ पैसे नाहीत ते गप्प बसतात… तसंच उन्हाळ्यात आईस्क्रीम होतं असेल, त्यामुळे आजच्या ह्या खाऊला कोणीच नाही म्हंटल नाही त्या पार्टी मध्ये…..

गारेगार, गोड आईस्क्रीम त्या थकलेल्या सुरकुतलेल्या निराश गळ्यातून खाली जात होतं,. एक छान चांगला आनंद ते सगळेच घेत होते…त्या वृद्ध नी अगदी चाटून पुसून कप रिकामे ठेवले होते…. पार्टी झाल्यानंतर ज्यांनी पार्टी दिली आहे त्यांचे संस्थेकडून आभार मानण्याची संस्थेची प्रथा होती.. आणि तीच जबाबदारी नेमकी या साने आजींची होती… आयुष्यभर एका मराठी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असलेल्या त्या आजी ती अगदी आनंदाने पार पाडत असे… संस्थाचालक आजींना म्हणाले, ‘आजी थोडं आईस्क्रीम वर ही बोला, आणि जरा छान आणि गोड आभार माना आपल्या या अ रविचे..’ साने आजींनी माईक घेतला…

आजी अगदी आनंदाने आपल्या आश्रमातील सगळ्या मित्र मैत्रिणींना म्हणाल्या, ‘आता कसं वाटतंय..? ‘आणि हे विचारताच हॉलमध्ये जोरजोरात आवाज आला..’ गार गार वाटतंय,.. आजी हसत हसत म्हणाल्या,. ‘बस असंच कायम गार गार रहायचं आपल्या आयुष्यात,… आणि आपण स्वीकार करायचा ह्या आपल्या जगण्याचा प्रवास… या आईस्क्रीम सारखा…बघा दुधाला उकळी येते, परत ते गार होतं, परत त्याला घुसळून इतर सामग्री दूध ते स्वतःत सामावून घेत असत, आणि फ्रिजचा ही स्विकार करत आणि बसतं बर्फात थंड होऊन… आणि त्याचा शेवट होतो, स्थितप्रज्ञ होण्याचा आणि इतरांना लोकांना गार आनंद देण्यासाठी,…

मला आवडते म्हणुन माझ्या उरलेल्या आयुष्याच्या तक्रारी नको करत बसायला… आपण सर्व इथे का आलोय, आपली मुले असे का निघाली..? आपले संस्कार कुठे चुकले..? आपल्या बरोबरच असे का घडलं..? हे सगळे प्रश्न सोडुन, आपण हे वृद्धाश्रम एक फ्रिज समजून आणि आपण एक आईस्क्रीम म्हूणून त्यामध्ये बसायचे… आपल्यासाठी या आश्रमात ही किती छान छान उपक्रम प्रयोग आहेत… आणि या आश्रमातील झाडांना आपलीच लेकरं समजून दत्तक घ्यायला शिका… या आश्रमातील कित्येक कर्मचारी आपल्याला जीव लावतात, आपल्याला त्यांना ही प्रेम द्यायला शिका… ज्यांना आपली काळजीचं नाही त्यांच्यासाठी आपुन कशाला.

जीव गळायला..?मी एक वाक्य ऐकलेले कुठं तरी की ‘ Life is ice cream enjoy it before melt.’ आपल्या या उतारवयाला अगदी योग्य हे वाक्य आहे,.. बरं माझं आपलं सुरूच झालं लेक्चर, आपल्या या पाहुण्यांचे आणि आपल्याला अशी गारेगार ईसक्रीम पार्टी देणाऱ्याचे खरंच आभार.. यांच्या साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, आणि मग हॉलमध्ये टाळ्या वाजतच राहिल्या,… आणि घरी आल्यावर माझं आणि रविच एक मत झालं… रविच्या मोठ्या भावाने घरात गळफास लावून आत्मत्या केली, तेव्हा पासुन त्यांची छोटी मुलगी काही केल्या खुलत नव्हती..’ बुजरी, घुमी होत चालली होत… आणि एका डॉक्टरांच्या मते घरात आणखी.

जास्त माणसे असतील तर ती कदाचित बोलेल… तिची आजी आणि आजोबा असतील तर त्यांना तुम्ही लवकर बोलवून घ्या… तेंव्हा त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्या चिऊला दोन्हीकडचे आजी आजोबा नव्हते… आणि तेंव्हा पासुन मनात विचारचक्र सुरूचं होतं ते आता थांबलं आहे साने आजींना पाहिल्यावर….रवीने आणि अनु ने दोघांनी मित्राच्या वडिलांकडे ही चौकशी केली… तेंव्हा त्यांना कळलं कि… ते आजी आजोबा दोघे आहेत, आणि त्यांच्या पोटच्या दोनी सुंदर मुली एक मवाल्याने काही वर्षांपूर्वी मारली आहेत,.. त्यांच्या मोठीने मुलीने प्रेमाला नकार दिला म्हणून, तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिला वाचवत असताना त्या मावल्याने.

दुसरीला ही सम्पवून टाकलं… आणि यामुळे साने जोडप्याच आयुष्य एका क्षणात नेस्तनाबूत झालं होतं… त्यामुळे साने आजोबा मोठा धक्का बसला होता, पण त्यांना माणसात आणण्याच काम साने बाईने अगदी जिद्दीने केलं होतं… त्यांनी स्वखुशीने या आश्रमात प्रवेश घेतला होता… त्यांना आयुष्य एकड्याने जगायचं नव्हतं. त्यांना माणसात जगुन कोणाला हसवता आलं, कोणाला समजवता आलं, आणि कोणाला काही शिकवता आलं, टी त्यांना आनंद होईच्या, आणि तसं ही येथे त्यांना त्यांच्या वयाची सगळी टिमच भेटली, आणि यामुळे हळूहळू त्यांच्या जख्मेवर खपली ही चढल्या, त्यांना आपल्या पेक्षा कितीतरी कठिण दुःख घेऊन.

जगणारी लोक दिसले… दहा-अकरा वर्ष झाले आहे त्या ह्या आश्रमात आहेत. रविने जरा घाबरत विचारलं जर ते तयार असतील, तर मला त्या दोघांना माझ्या घरी आणायचं आहे, कायमचं.. आणि काका हसुन म्हणाले, ‘अरे बाळा रवी माणस मुल दत्तक घेतात आणि तू तर आई वडिल दत्तक घेतो, काय.?? ‘त्यावर रवि म्हणाला, ‘हा तसच समजा तुम्हाला हवं तर त्यांना येणार आहे उद्या भेटायला मी… तुम्ही पहिल्या विचारून बघा त्यांना आणि लगेच कळवा मला. ‘त्यांनंतर काही तासात त्यांचा फोन आला होता रवीला… की या म्हणून उद्या भेटायला आश्रमात… आम्ही त्याच्या खोलीत गेलो तर त्यांची खोली किती छान, स्वच्छ दोघेही अगदी प्रसन्न होते…

रविने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली आणि शेवटी तर त्यांचे पायच धरले, आणि म्हणाला दोघांनी ही माझ्या लेकीसाठी हो म्हणा… आपण सगळे एकमेकांचा आधार होऊन पुढचंय आयुष्य जगू…. साने आजी म्हणाल्या, ‘खरंतर कोणतीही गोष्ट स्वीकारायला माझं मन आता तयार असतं, कारण हे सगळं लिखित घडत असतं असंच असावं विधात्याच्या मनात कदाचित… हो येतो आम्ही दोघे.. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्हला ज्याक्षणी वाटेल की आम्ही दोघे नको तुमच्या संसारात तेंव्हा तुम्ही मोकळेपणाने आम्हाला सांगा… तुम्हाला कोणतंही दडपण नको, आणि आम्हाला कोणताही उपकार नको.. ‘असं म्हणत म्हणत सगळं ठरलं.

आणि आज हा दिवस आलाच… माझ्या चिऊला तर एक मोठं सरप्राईज आहे… हा विचार करता करता घर आलं… अनु चटकन उतरून घरात आत पळली.. आणि हात-पाय धुवून मावशीने तयार केलेलं औक्षणच ताट घेऊन दारात अली… आणि चिऊला ही हाक मारली. चल ये बाळा हा लाल फुगा तू फोडणार आहेस ना, अगं तुझे आजी आणि आजोबा आलेत आहेत.. चल म्हणत म्हणत तिला एका खुर्चीत उभं केली… रवि त्या दोघांचं सामान गाडीतून घेऊन त्यांना घरात घेऊन आला… अनुने त्यांचे औक्षण केलं… आणि चिऊने तो लाल फुगा फोडला, त्या दोघांनी सुरकुतल्या डोळ्यांनी हसत हसत वर बघितलं तर टाळ्या वाजवत हसणारी चिऊ दिसली…

आजीने तर पटकन जवळ घेतलं तिला,.. आणि लेकीला मिळणारी प्रेमाची मायेची ऊब दुरूनच रवि आणि अनुने अनुभवली… त्यांचं हसुन स्वागत झालं… चिऊने आजी आणि आजोबाचे बोट पकडून तिची खोली आणि पूर्ण घर दाखवून झालं… मग चिऊ म्हणाली, ‘आता आजी तुझ्या आवडीचा खाऊ.. आई देकी ग खाऊ सगळ्यांना अनु जाऊन मस्त आईस्क्रीमचे डब्या घेऊन आली…. रवि म्हणाला, ‘आपलं हे नवीन आयुष्य आपण भरभरून जगुया एकमेकांना आधार देत,… आणि जगण्याचा आनंद घेऊ या.’ आणि आजी आजोबा ही म्हणाले, ”हो बरोबर पण तेही विरघळण्याच्या आधी…? आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!