जेव्हा एका अनाथ आईच्या मुलीचे लग्न होते तेव्हा नातेवाईकांनी तिच्या सोबत असे काही केले की पाहून तुम्हाला ध-क्काच बसेल..

‘अग त्या फोनवर रात्री जास्त वेळ गप्पा करत जास्त खप वेळ जागरणं करू नका,.. झोपा की आता किती वाजले ते बघितले आहेसा काय… आणि हा आजच्या सात-आठ दिवसाला तुम्ही तिकडेच असताल बाई तुम्ही झोपा आता,.. ‘खोलीत येऊन आई खूप ओरडून गेली… आणि ती ही हसत म्हणाली,..’ ऐकलंस ना ओ.. ठेव की आता फोन बघा नाहीतर आई चिडून येतील आणि फोनच कट करतील..’ आणि तो ही तिकडे खूप जोरात हसला म्हणाला.. ‘तुझी तर काय झोपण्याची तयारी झाली आहे, माझ्याकडे तर गावाकडून माझ्या बहिणी आल्या आहेत, त्या काय आता पहाटे चार पर्यंत मला झोपू देत नाहीत आता तर नुसत्या गप्पा,…

हा आणि माझी मावशी आली आहे गावाकडून त्यामुळे आई च्या आणि मावशीच्या गप्प चालूच असतात… बाबा तर काय त्यांच्या बहिणीत.. माझी आत्या फार चेष्टा करते माझी.. तू फोन ठेवल्यावर खूप चिडवते गं मला म्हणते.. बायकोने फोन ठेवला वाढत..?? आणि म्हणते की जागरणात खूपच कच्ची दिसते बाबा होणारी तुझी बायको… आणि तिला म्हण, ‘अकरा ही काय झोपायची वेळ झाली का,.?? इकडे ती खूप लाजली आणि परत म्हणाली,. ‘तुमच्या कडे आल्यावर मी पण तुमच्या गप्पांमधली असेल ना,.. मग तेंव्हा जागेन तुमच्या सोबत आता ठेवा की फोन…. ती तिच्या खोलीत आली,..’तिच्या आईने कुस बदलली.

आणि ती आईच्या जवळ गेली,.. आणि आईचा हात धरला आणि म्हणाली, ‘आई आपल्याकडे तर लग्न असल्यासारखं वाटतच नाही ग,.. ते सांगत आहेत की त्याच्या गावाहून बहिणी आल्या आहेत… तिझी मावश्या ही आली आहे.. आत्या आणि सगळे नातेवाईक गोतावळा जमलाय, ग ते खूप गप्पा मारत आहेत,… त्यात त्यांना वेळेच ही भान नाही, कोणाला….. आपण मात्र घरी दोघीच आहे, असं म्हणताना तिला खूप भरून आलं… आईने लगेच कुस बदलून तिच्या कडे पाहिलं.. तिच्या गालावर हात फिरवत फिरवत आई म्हणाली,.. ‘अगं मी आणि तुझे बाबा एक अनाथ म्हणूनच वाढलो आहे… मग नंतर आपल्याला तुझे बाबा.

ही सोडून गेले… पण तुझ्या बाबांन आणि मला कायम हे दुःख होतच… आपलं एक तरी माणूस आपल्या जवळ पाहिजेच तो आनंदाच्या क्षणी असो किंवा दुःखाच्या क्षणी असो… हक्काची माणसं पाहिजेत म्हणजे कस आपलं आयुष्य सुंदर होतं ग… कधी खळखळून हसणारे चेहरे, आणि आपल्या पाठीवरून फिरणारे ते आशीर्वादाचे हात,. मायेने प्रेमाने गालावर फिरणारे ते हात,.. बहीण, भाऊ, मामा, मावश्या ह्या सगळ्यांचा गोतावळा असायलाच पाहिजे आपल्या आजूबाजूला,… असं मलाही खुप वाटलं गं, पण मी तरी काय करणार गं जन्मपासून अनाथ असलेल्याना मला आणि तुझ्या बाबांना रक्ताची नाती कधी मिळाली नाही ग…

हा पण आता मी तुला एक सांगते,.. ‘आता तुझ्या नशिबाने तुला हा गोतावळा मिळाला आहे, तो मनापासुन जपाय शिक,… अग मी एक अनाथ आहे, म्हणून मी एकटी आहे, पण मी माझ्या आयुष्य अशी माणसही बघितली आहेत, ग जी छोट्या छोट्या कारणावरून रुसून फुगून खूप एकटी पडली आहेत या जगात… त्यांनी हरवल आहे ते हक्काचे गाव आणि घर जिथं आपलेपणा असतो.. ती नाती आयुष्यातून गमवाय फार काही लागत नाही ग… तुम्हाला अहंकारी भावना आली की तुम्ही जवळची माणसं गमवाय चालू करता,..आणि बाळ तू ती काळजी घे आणि माणसं जप, ह्या गोतावळ्याभोवती जगण्याचा गोफ विणला.

की तो उबदार होऊन जातो.. हे लक्षात ठेव… बाळ झोप ग आता अस म्हणत म्हणत आईने तिला जवळ घेतलं… पण आता लेकीच्या बोलण्यावर आई विचार करू लागली… आणि आई काहीतरी विचार करत झोपी गेली,… सकाळी लवकर काहीतरी घेऊन येतो असं सांगून आई तडक घरातून निघाली, आणि ती अनाथआश्रमात गेली,…… आश्रमाच्या प्रमुख कार्यालयात नेहमी प्रमाणे जाधवबाई कुणाला तरी आयुष्य किती सुंदर आहे, आणि ते आपल्याला कसे जगायचे आहे ते आपल्या हातात आहे, हे सांगतच होत्या… हिला बघताच त्या म्हणाल्या, ‘अग ये कीत ईकडे दारात काय उभी आहेस गं,. ‘ आणि खुर्चीवर बसताना त्यांनी.

आईला प्रश्न केला की, काय म्हणते ग तुझ्या मुलीच्या लग्नाची तयारी,..’ आई हसत हसत म्हणाली, ‘तुमच्या शिवाय ती आणि मीही अपूर्ण आहे..’ जाधवबाईना काय कळेना,.. जाधवबाई म्हणाल्या,.. अग तुला काही पैश्याची मदत हवी का..? त्यावर लगेच आई म्हणाली, नाही नाही पैसा आहेत की मी तिच्या लग्नासाठी साठवले आहेत, पण मला तुमच्याकडून पैसे नाही तर एक दुसरी गोष्ट हवी आहे… ‘जाधवबाईना काही कळाले नाही,.. आणि ते बघत आई म्हणाली… मला जेव्हा पासून आठवतं तेव्हा पासून तुम्हीच ह्या अनाथ जगण्यास मदत केली आहे.. आणि इथेच तर मला आई, बहीण, भाऊ, मावशी यासारखी नाती सापडली आहेत…

मला आयुष्याचा जोडीदारही दिलात पण तोही दुर्दैवाने अनाथचं,.. मला माझ्या आयुष्यात जगताना खुप वेळा नात्यांचा गोतावळा नसल्याची जाणीव व्हायची, पण आयुष्य एकमेकांना साथ देत देत गेल.. तुम्ही मला सुंदर आयुष्याची सुरुवात करून दिलीत… आणि आता त्यातलं एक वळण आलं लेकीचं लग्नचं,.. माझा आयुष्यचा जोडीदार तर पहिलाच मला सोडून गेला आहे, पण मला नात्यांच्या भुमिका वठवायच्या आहेत.. कधी कधी तरी माझं अनाथपण मला ही केविलवाण करून टाकतंय ओ,.. मला आणि माझ्या लेकीलाही अनुभवायचं आहे ते नात्याच्या माणसाचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला… माझ्या आयुष्यात.

एक छान मंगल कार्य घडतंय मग मला आणि माझ्या लेकीला ही हवी आहे, ती नातेवाईकांची धावपळ… मामा, मामी मावशी, बहिण, भाऊ चा आनंदाचे क्षण मलाही वाटून घ्यायचा आहे, मला ही माझ्या गोतावळ्यात,…बाई मी आपल्या आश्रमतली दहा जणींना विंनती करते.. तुम्ही आणि माझ्या मित्रांनी फक्त दोन दिवस माझ्या घरी या माझा गोतावळा होऊन,… आणि माझी लेक ह्या सगळया गोष्टींन साठी खूप आसुसलेली आहे,… बाई तुम्ही जर होकार दिला, ना तर माझी नाती असो नसो माझ्या आणि माझ्या लेकीच्या जगण्यात येणारं प्रत्येक माणूस जपुन गोतावळ्याच्या गोफात विणून घेऊनही आयुष्य खूप सुंदर करता येते, ही शिकवण मी माझ्या लेकीला या महत्वाच्या वळणावर देऊ शकेल,,.’ जाधवबाईंनी चष्मा काढून डोळे पुसत पुसत… आईचा हात हातात धरुन म्हणाल्या.

‘आजच संध्याकाळी पोहचतो आम्ही सगळे,..’त्यांच्या बोलल्याला ह्या वाक्यावर, आई रडता रडता हसत होती… आणि त्या आश्रमाच्या हॉलमध्ये जाऊन जाधवबाई आणि तिने सगळ्यांना आमंत्रण दिलं….. आणि आज तिझ घर गजबजून गेलं होतं… नवरी मुलीला ही कोणीतरी चिडवत होतं,… कुणी तरी सामानाची बांधाबांध करत होत.. कुणी तरी हक्काने खोलीचा ताबा घेऊन याद्या बनवतन्यात वेष्ट होतं… कुणी तरी रुखवत बांधत होतं… कोण तरी मंडपात माणसासाठी गाद्या टाकत होतं.. आणि लग्नाचे लाडू चिवडा पाकिटं करण्यात एक घोळका गुंग झाला होता… आणि त्यात नवरदेवाचा फोन आला आणि नवरीबाई पळाली खोलीत..

तेव्हा ही अकरा वाजले होते आणि तोच म्हणाला की, ‘अग तुझी तर झोपायची वेळ झाली ना,… ती हसत हसत म्हणाली,..’छे छे ओ आता तर गप्पना फक्त सुरवात झाली आहे,.. माझ्या आज्या, मावश्या, आत्या लाडू करत बसल्या आहेत… माझ्या मते अजून दोन तास तरी लाडूच बांधतील त्या..” तो हसुन म्हणाला, ‘नवरीबाई गोतावळ्यात चांगलीच रमते आहे वाटतं.. तशी ती म्हणाली. ‘आयुष्यात माणसांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा असला की जगणं कसे आनंदी होऊन जाते,.. हे आता अनुभवतीये आहे मी…’तो म्हणाला, ‘छान माणसांची आणि नातेवाईकांची गरज आपल्याला जगताना पदोपदी लागते,..

म्हणून तर ही माणसं आपल्या नात्यातली असो किंवा नसो पण आपल्या जगण्यातली त्यांना कशी सांभाळायची हे कळलंय तुला म्हणजे आता मला माझा आयुष्यात प्रेमाची ऊब देणारा माणसांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा तू नक्कीच चांगल्या पणाने सांभाळशील… ती म्हणाली, ‘हो नक्कीच यामुळे आपलं जगणं खूप सुंदर होऊन जाईल… तेवढ्यात कोणीतरी तिला चिडवलं, घ्या बोलून हेच दिवस असतात ज्यात एकटे गप्पा मारण्याचे, एकदा का गोतावळ्यात सापडले की गेलं सगळं… तिने हसत हसत त्याला बाय करून फोन ठेवला…. लग्नमंडप गजबजला,.. भडजी मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या म्हणताच…

अनाथाश्रमातल्या मामाला भरून ती आली… करवली म्हणून उभी असलेली बहीण आनंदून गेली… काका, मावश्या, भाऊ वधु कडून उभ्या राहिले… एक अनाथ असून ही मिळालेली ही नाती सगळ्यांना खूप जास्त आंनद देत होती, म्हणूनच तर ह्या गोतावळ्यात नातेवाईकांचा माणसांचा आशीर्वाद त्यांच्या खोल अंतकरणातून निघत होते… आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!