वृद्धाश्रमात सोडलेल्या आईची शेवटी इच्छा ऐकताच या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली..

नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक मनाला चटका लावून जाणारी हृदयस्पर्शी कथा. “लॉकडाउन आणि आई” आणि लेखन केले आहे. आदरणीय श्री प्रेमेश चंद्रकांत भोस सर यांनी. लेखकाचे लेखन खूप अप्रतिम आहे. खूप छान आणि सूंदर अशी कथा तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला तर मग कथेला सुरवात करूयात. आज दिवसभर घरात घुटमळत असल्यामुळे सहज फोन केला मी वृद्धाश्रमात राहणाऱ्या माझ्या जन्म दात्या म्हाताऱ्या आईला. पलीकडून फोन उचलला गेला. आणि सुरकुत्या पडलेल्या भाषेत एक बोबडा थरथरता तो अडाणी आवाज किती वर्षांनी माझ्या तो कानावर आदळला.

काळीज पुन्हा हादरले. जिभेला वळण नसल्याने आई माय हे शब्दच बाहेर पडायला तयार नव्हते. लाज मला नाही माझ्या जिभेला वाटत होती. जगात नवीन निघालेल्या महाभयंकर जीवघेण्या कोरोना विषाणू विषयी तिला सांगणार इतक्यात तिनेच मला काही तरी सांगायला सुरवात केली. पोरा जरा सांभाळून रहा. बायको पोराबाळांची काळजी घे. घर स्वच्छ ठरवायला सांग, सूनबाईला. ते काय म्हणत्यात तोंडाला कपडा मास बांध जरा. गरम पाणी पित जा. हात धुहून घेत जा. गर्दीत जाऊ नको कुठं माझ्या लेकरा. ते कुठला सैताना वाणी रोग आलाय हल्ली. पोरा कसा आहेस तू एक इचारु. पोरा तू इथं मला बघायला येऊ नकोस.

तुला तुझ्या म्हाताऱ्या आईची शपथ. ह्यो रोग बाहेरच्या माणसा पासून होतोय ना. मी पण आता बाहेरचीच झालेय. पोरा ह्यो रोग आधी आला असता तर जगातल्या कुठल्याच लेकराने आपल्या मायबापाला घराबाहेर काढायचा विचारच केला नसता. खरं आहे ना पोरा. चूक तुझी नाही पोरा या जगाची रितच तशी आहे. कुजलेला खराब कचरा केरसुनीने घराबाहेर काढायचा. आणि फेकायचा. दूर कुठल्या तरी कचरा कुंडीत. नाहीतर तुंबलेल्या नाल्यात. घरात खराब वास येतो आणि सुरकुत्या पडलेल्या हाडामासच्या कचऱ्याची आणि घाणीची. पोरा एकमेकांच्या जवळून बोलताना खिकताना शिकताना मायेचा हात अंगावरून.

फिरवताना कुशीत घेताना हा रोग पण होऊ शकतो ना. पोरा किती वर्ष्यातून तुझा फोन आल्यावर या म्हाताऱ्या आईला बर वाटलं बग. मला विसरला बिसरला नाहीस ना याची काळजी वाटत होती. पोरा एक विचारायचा होतं की हा रोग एकमेकांशी फोनाशी बोलताना होत नाही ना. त्या रोगाचे जीव जंतू फोनातून येत नाहीत ना. आई बोलताना मध्येच जोरजोरात खोखलत होती. रडत होती हुंदके गिळत गुपचूप रडत होती कण्हत होती. पोरा माझ्या लेकरा आतून दरवाजा नीट कडी लावून बंद करून घे. जसा मला घरा बाहेर काढताना केला होतास तसा. घरातून बाहेर पडू नकोस सद्या. बाहेर आमच्यासारखे राक्षसी जीवजंतू राहतात ना.

पोरा मी मेले तरी मला आग द्यायला इथं येऊ नकोस ते महानगरपालिका वाले सर्व करतात हल्ली फुकट. माझं तेरा दिवसाच सुतक ही नको पाळू. पण ते चौदा दिवसाच होम कॉर्नटाइन काय बोलतात ते पाळ रे माझ्या लेकरा. माझ्या नातवंडांना सांग. कुणीतरी दूर राहणारी नात नसलेली म्हातारी मेली. आहे परकी बिन रक्ताची पोरा या रोगाच्या विषाणू पेक्षा आपल्या माणसाचे विष किती महाभयंकर जीवघेण असतं ना. हातातून फोन खाली पडला माझ्या. आणि मी पण. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!