बसमध्ये बसायला जागा मागताच या स्त्री सोबत, एक व्यक्तीने केले असे काही की पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल..

तुमचं काय बिघडतं हो थोडीशी जागा दिली तर..? आणि दररोज मी तुमच्या आधी याच्या मागच्या स्टॉपवर चढून आधीच बसते ना येते आणि तुम्ही ही बघताच की तुम्ही रोज,..’ मग बसलेला माणूस ही त्या आवाजात म्हणाला, ‘हो माहीत आहे मला पण आम्ही ही दररोज उभेच असतो पण तुम्ही कधी थोडं सरकुन जागा दिली नाही मला,..’ आणि त्याच्या या वाक्यावर ती काही तरी बोलत दुसरीकडे जागा शोधायला लागली… तसा तिझ्या सकू मावशीने तिला ईशारा केला.. अगं ये इकडे ऍडजस्ट होऊ येथे,..’ अरे वा मला माझा मैत्रिणीची आई भेटली हे एक बरं झालं..’ असं ती मनातल्या मनात म्हणत, स्वता:ची पर्स आणि तोल सांभाळत मागे आली..

आणि लगेच सकू मावशी जरा सरकल्या, आणि हे तिथे बसलेल्या माणसाला काही आवडलं नाही,… हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. बसायला मिळालं ह्या आनंदाने तनु बसली… आणि पर्समधली बाटली काढून तिने पाणी पिले… मग तोंड पुसत सकू मावशीकडे वळत वळत म्हणाली,.. ‘काहो सकू मावशी सात-आठ दिवसांपूर्वीच सोनूकडे आला होतात ना, आणि लगेच का निघालात..?? हा आणि आता कुठे आहे दौरा..’ सकूमावशी हसत हसत म्हणाली, ‘आता जाणार आहे आम्ही पूर्वी ज्या चाळीत राहायचो ना त्या शेजाऱ्यांची कमला आता बाळंतीण झाल्या आहेत तिच्याकडेच निघलो आहे पुण्याला,.. हे ऐकून तनु म्हणाली..

अहो तुम्ही कडे सोनू कडे वास्तुला आला होतात की,.. मग जर चागंला मुकाम करायचं ना निवांतपणे आपल्या लेकीकडे,….. हा आणि माझी आई तर बघा कुठे जात नाही… आणि खरं सांगायचं तर माझ्या आईला आणि बाबांना माझ्या शिवाय कोणी बोलवतही नाही… मागल्या वेळी माझी आई आली तेंव्हा तिने तर, आठवण काढली होती तुमची आणि सोनू ची… सकू मावशी म्हणाली, ‘तनु तुझ्या आईला बरे बाई सगळे बोलावतात राहायला… मला मेल तर एकही घर नाही कुठे तरी जाऊन असं रमायला… हा आणि तेंव्हा तुमची सोनू सांगत होती मला की..’ तुम्ही खुप डिमांडेड पर्सन आहेसा म्हणून… कोणाचे ही लग्नकार्य, मुंजी, वास्तू.

दुखणेखुपणे, बाळंतपण काहीही असो सगळ्या नातेवाईकांना सकू मावशी ही लागतेच… आणि काय असो की नसो तिला सगळे बोलवत असतात नेहमी..’त्यानंतर माझी आई ही म्हणाली होती, ‘तिने जपल आहे तसा लोकांना, आयुष्यात आलेले… कल किती बदलला, त्यानुसार काही लोक ही बदले आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती हु बदलली पण आपली सकूच वागणं काय बदली नाही, आणि ती आजही आधी प्रमाणे सगळी कडे जाते हक्काने राहते, तिला मुलगा आणि एकच मुलगी आहे तरी तिझी हक्काची घरं अनेक आहेत, तिझ आपल्या सारखं नाही चार पोरं आहेत पण एकही विचारत नाही..’ मावशी आईचं हे वाक्य.

ऐकल्यावर मी थोडा वेळ विचारात पडले होते की,.. एकाच माणसाला एवढी मागणी कशी असू शकते हो,..?? सकू मावशी ने स्वतःच्या मांडीवरची पिशवी घेत घेत म्हणाल्या..’ तनु आता तुझा थोडा वेळापूर्वीचा प्रसंग आठवून बघ, तू नेहमी ह्याच बसने येतेस आणि जातेस पण या बसने बरोबर…. आणि किती तरी चेहरे तुझ्या ओळखीचे आहेत या बस मध्ये, पण तू आज बघ तू तुझ्या नेहमीच्या स्टॉपपेक्षा नंतरच्या स्टॉपवरून चढलीस बस मध्ये तर तुला किनीच जागा दयायला तयार नाही ए… कारण अस आहे की, ना तू कोणासाठी जागा निर्माण करत नाहीस… खरं म्हणजे हे व्यवहारी जग आहे, पण हा असा नियम तुझ्या आणि माझ्या.

आयुष्यात तंतोतंत लागू होतो… तुम्हाला अश्या या जागा ह्या फार आधीपासून निर्माण कराव्या लागतात व तस वागायला लागते, आणि आपल्या मनामध्ये.. मग कधी तरी त्या मदतीच्या स्वरूपाने, कधी पैशाने, कधी प्रेमाने, तर कधी कधी आदराने, आणि कधी मैत्रीने अश्या अनेक नात्याने रोपांना रुजवावं लागतं, आणि माणसाच्या मनात आपल्या बदल आपुलकीची रोपं उगवायला लागतात… आपण आपल्या स्वतः च्या आयुष्यात कितीही मग्न असलो, तरी ह्या रोपांना जगवाय लागतं,… कधी तरी हलकीशी भेट देणे, आणि कधी कधी तरी त्यांच्या सोबत संवादाचं खत ही घालत राहावं लागतं… पण एक हे सगळं करत असताना एक नियम.

स्वतः च्या मनाला पक्का सांगावा लागतो.. की मला तह्या रोपांकडून फुलाची किंवा फळाची काहीही अपेक्षा नाही… आणि ही माणसाची शेती माझ्यासाठी निरपेक्ष आहे… आणि प्रेमाने आणि फक्त आनंदाने च ही रोपं वाढू द्यावीत… आणि या रोपांचे कधी वटवृक्ष होईल ये तुम्हाला ही कळणार नाही…. पण खरा आनंद तेव्हा मिळतो जेंव्हा त्यांच्या सावलीत आणि त्यांच्या सहवासात आपल्याला खूप प्रेम आणि थोडीशी जागा ही आपल्यासाठी राखुन ठेवलेली जाते… कुठे तरी बहीण म्हणून कुठे तरी मावशी म्हणून आणि आत्या, काकु, मामी, तर आहेच अश्या अनेक नात्यांना जागा होते,.. जेंव्हा कुणी तरी आपली वाट बघत असते.

ना तेंव्हा खरं तर आयुष्यच सार्थक झाल्यासारखं वाटतं आपल्याला, आणि आपण ती नाती जपल्या तरच आपल्याही मुलांना मावश्या, मामा, आत्या अशी नाती हक्काने मिळतात, नाहीतर ती ही पुढे पुढे चालून एकटी पडतात गं…कारण ह्यात कोणी नाही बोलवलं तर रागही नाही येत, कारण हे की त्याच्या घरात जरी जागा नसली तरी मनात ती आपल्या साठी खूप प्रेम आणि आपुलकी असतेच… हा पण तनु ह्या जागा तयार करण्याचे वय हे खरं तरुणपणीचं.. कारण तेंव्हा रोप रुजवलं तरच ह्या सावलीच्या जागा आपली वाट बघत असतात… मग माझ्या सारख्या एकटीला स्वतःच्या आयुष्य कधीच एकटं वाटत नाही..

कारण काही नियम मी स्वतः घालून घेते आहेत माझ्यावर… आणि ह्या जागेतल्या सावलीचा थंडावा मी त्या जागेला कधीच कळू देत नाही.. म्हणजे कोणतीही जागा कुणाचेही मन आपल्या स्वभावाने दूषित व्हायला नको, कारण आपण निर्माण केलेल्या ह्या जागा जपता ही आल्या पाहिजेत… कधी कधी त्या जागेसाठी ऍडजस्ट ही करावं लागतं ते ही आपल्याला जमलं पाहिजे ना,.. आता आपण तिघांनी केलं ना अगदी तसंच.. नाही का हो..?? सकू मावशी तिच्या शेजारच्या माणसाकडे हसत हसत म्हणाली,… तसा तो ही हसत थोडा पलीकडे सरकत सरकत म्हणाला…’ अहो मावशी बसा व्यवस्थित तुम्ही होतो की आपण तिघे ऍडजस्ट..

अहो तुम्ही तर एवढ्या सुंदर आणि चांगल्या आयुष्यातल्या जागा सापडून दिल्या आहेत मला ही.. खरंच आज केलेल्या तुम्हाच्या सोबतचा प्रवास मनात नवीन जागा निर्माण करणारा ठरला आहे… आणि हा प्रवास हे शिकवणारही की माणसाला जागा कुठेही जसा घरात, प्रवासात किंवा मनात मिळाली तरी ती त्या माणसाला जोडणारीच असते… सकूमावशी म्हणाली,..’अगदी बरोबर बोललात तुम्ही,… तेवढ्यात सकू मावशीचा स्टॉप आला आणि सकू मावशी उतरली… तनुने हाताने तीला दिसेल असा टाटा केला… तिला जाणवलं होत, की सकू मावशी बोलल्या ते अगदी बरोबर होतं… आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती.

त्यामुळे आईने कधी आपल्या जवळ कोणाला फिरकू दिलं नाही… आणि पोरांना तर वाऱ्यावर च सोडलं होतं तिने आणि आई तर गुंग होती तिच्याच भौतिक सुखात, आणि आता तिला कोणच बोलवत नाही, तेच सकू मावशी गरिब आहे पण तिने माणसांची श्रीमंती कमवून ठेवली आहे, कारण तिने त्यांना तेंव्हा घरात जागा नसली, तरी स्वतःच्या मनात जागा दिली होती, प्रत्येकाला तिने.. तनुच्या ही मनात आलं की आता आपला आयुष्याचा पुढचा प्रवास सकू मावशी सारखे होण्यासाठी करायचा,.. कारण एकवेळ या जगात राहायला जागा सहज मिळू शकते पण आपल्याला सोबतच्या माणसाच्या मनात ती मिळवावीच लागते….

आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!