जेव्हा शंकर आणि पार्वती पृथ्वीवर फेरफटका मारायला आले तेव्हा त्यांच्या सोबत असे काही घडले की पाहून तुम्हाला ध क्काच बसेल

पार्वती माताची पूजा संपन्न झाली, आणि ती निवांत बसली होती.. शंकर सकाळपासूनच पार्वतीच्या लगबगीकडे बघत होते… आणि पार्वती माता निवांत बसलेली बघून शंकर पार्वतीला म्हणाले.. ‘ चल तुला आपल्या पृथ्वीवरच्या पूजेचे चित्र दाखवतो’…
पार्वती माता हसल्या आणि म्हणाली, की अहो आजचा दिवस तर खास तुमचा आहे…. आज सगळ्या स्त्रिया मनोभावे तुमची पूजा करतात’… शंकर म्हणाले, ‘अग चलं जरा जाऊन फेरफटका मारुया. शंकर आणि पार्वती पृथ्वीतलावर जायला निघाले.. आले आणि थांबले, देशमुख यांच्या घरी… आज सकाळपासूनच सासुबाईंचे सुरू होते…

अगं सुनबाई आज आपला हरतालिका व्रत आहे… आणि प्रत्येक झाडांची पाने गोळा करून आणायची आहेत, पूजेसाठी… आणि बघ की आपली गौरी किती छान निघाली… आणि हो बेलाची पाने, आणि सुंदर सुंदर फुलं सुद्धा हवी… आपली सुनबाई काही बोलेल या अपेक्षेने त्यांनी तिच्या कडे पाहिले… जरा बघतात तर काय सुनबाई होतीच कुठे..? सुनबाई तर तिचा लॅपटॉप घेऊन केव्हाची तिच्या खोलीत निघून गेली होती… आता मलाच तोडून आणावी लागणार बहुतेक सगळी पाने… आता काय चला मीच जाते बागेत… असे स्वता:शी म्हणत, त्या बागेकडे निघाल्या….

शंकरा कसे होणार आहे या आपल्या पुढच्या पिढीचं काय माहित बाबा… अस म्हणत.. त्या बाहेर असलेल्या त्यांच्या छोट्याशा बागेमध्ये आल्या… बागेत जितकी झाडं होते, त्या सर्व झाडांची त्यांनी पाने तोडली… आणि मग लहान पाटी मध्ये फुल ही गोळा केली… आणि थोडा दम टाकत टाकत घरात आल्या…. संजू नाश्ता दे… असा पलीकडच्या खोलीतून तिच्या मुलाचा आवाज आला….. आणि लगेच संजूने तिच्या लॅपटॉप बाजूला ठेवला, आणि चटकन किचनमध्ये गेली… तिने गरमागरम पोहे केले, आणि ते सगळ्यांना दिले… तिचे सासरे, मुलगा आणि नवरा पोहे खाऊन खूप खुश झाले…

आई तुम्हाला ही काही करून देऊ का खायला..सूनबाईने विचारले, ग तुला माहीत नाही का की आज हरतालिकेचे व्रत आहे माझा, हा आणि मी पूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही आज… सासुबाई तिला म्हणाल्या… ‘अहो आई,, आता या वयात तुम्हाला हा व्रत झेपेल का.. थोडं तरी दूध घेऊन घ्या…आणि पूजा झाल्यानंतर हवा तो फराळ करा तुम्ही” सूनबाई त्यांना म्हणाली… आणि तिने सासूबाई आणि तिच्या साठी दूध घेतले…. पण सासुबाई काय ऐकतात…त्या नको म्हणाल्या, आणि स्वता:शी बोलल्या, ‘ फक्त एक दिवस हिला उपाशी राहणं जमत नाही का’..

संजू परत तिच्या खोलीत निघून गेली… आणि तिला खोलीत गेलेली बघून लगेच सासूबाई म्हणाल्या, ‘अगं सुनबाई मी सगळी तयारी केली आहे पूजेची मग येशील ना पूजा करायला खाली’ अहो सासूबाई आज मला फार महत्त्वाचे काम आहे, आणि आज माझ्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात आहे, त्यामुळे मला आज पूजा करणे बहुधा होणार नाही, आणि तुमचं झालं की तुम्हीच पूजा करून घ्या.’ संजू त्यांना म्हणाली… ‘ मला मेलीला तर काय करायचं..? मीच हिच्या भल्यासाठी सांगत होते… आणि एक पूजा जमत नसेल तर नको ना करू, मी माझी मी करत असे सासूबाई पुटपुटल्या….

पार्वती माता म्हणाल्या,, ‘बघा… देवा आजच्या मुली कशा पुजा करायला नकार देतात त्या, अशा वागण्याने तुम्ही पावणार आहे का त्यांना..?? शंकर थोडे हसले…. सासूबाईंनी सुंदर अशी पूजा मांडली… आणि रेतीचा शंकर ही काढला… आणि त्याला पानां फुलांनी सजवला… त्यांनी साग्रसंगीत पूजा केली.. आणि त्यांनी मनोभावे नमस्कार केला… त्यांनी त्यांच्या नवऱ्याला ही नमस्कार केला… मग पाण्याचा घोट घेतला… आणि शांतपणे जप करण्यासाठी बसल्या.. पार्वती माता खूप खुश झाल्या, आणि शंकर देवाला म्हणाली, त्या सासूबाईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा…

जशी तुमची इच्छा शंकर देव म्हणाले… सासुबाईची पूर्ण पूजा होईपर्यंत संजूने स्वतःचे सगळे काम आवरून तिझ्या सासूबाई साठी आणि स्वतः साठी ही फराळाचे करून ठेवले होते… आणि नवऱ्याचा डबा ही भरून दिला होता.. मुलाच सगळं आवरून त्याला ही शाळेत पाठवलं होते… आणि सासऱ्यांचे जेवण ही आटोपलं होते… ती मंगल मावशी कामाला येऊन गेली होती… त्यांना फराळाचे देऊन,. त्यांची ओटी सुद्धा भरली होती… आणीनेक इतकं सगळं करून तिने तिचा कॉलही पूर्ण केला होता….. सासूबाईंची पूजा पूर्ण होताच तिने शंकराला हळद-कुंकू वाहिलं.

आणि लगेच सासु-सासर्‍यांना नमस्कार केला.. तिने सासूबाईंना दुधाचा ग्लास आणि त्यांच्या फराळाचे दिले… संजू सगळे आवरून लॅपटॉप वर मेल चेक करत होती.. बघते तर काय तिला चक्क प्रमोशनचा मेल दिसला होता… ती आनंदाने तिच्या सासू-सासर्‍यांना सांगायला खोलीबाहेर आली… तितक्यात प्रमोदचा फोन आला… की आमच्या कंपनीचे एक नवीन प्रॉडक्ट लॉंच होते आहे, आणि त्यामुळे मआता मला फॉरेनला जायची संधी मिळत आहे….. संजू, आणि सासू-सासरे ही खूप खुश होते…. आणि सासुबाई पटकन म्हणाल्या, ‘वा किती आनंदाची बातमी ऐकायला मिळाली’..

आणि शंकर हसत होते… पार्वती माता म्हणाल्या’.. संजूने तर तुमची पूजाच केली नाही.. तरी तुम्ही तिच्यावर इतके प्रसन्न का झालात… संजू ला आणि तिचा नवऱ्याला दोघांना ही प्रमोशन दिलं, आणि त्यांना दोघांना ही पुढे जाण्याची संधी दिली’…
शंकर म्हणाले, ‘पार्वती तू बरोबर बोललीस .. संजूने माझी बेल आणि फूल वाहून पूजा केली नाही.. पण ति तिच्या कर्तव्यात कुठेही कमी पडली नाही… तिने तिच्या मुलांचं, सासर्‍यांचा अगदी व्यवस्थित केलं… आणि तिझ्या सासूबाईंच्या प्रकृतीची काळजी म्हणून तिने त्यांच्यासाठी फराळाचं तयार करून ठेवलं…

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिने तिच्या घरी आलेल्या मावशीला ही पोटभर फराळाचं दिलं… आणि ओटी भरली, तीसुद्धा मनापासून.. अगं हे सुद्धा एक प्रकाराने हरतालिका व्रत झाले ना… तिला नाही वेळ पूजा मांडण्यासाठी पण तिने तिच्या कामात टाळाटाळ केली नाही… आणि तिच्या मनातही माझ्याप्रती श्रद्धा आहे…आणि म्हणतात ना ‘श्रद्धा तिथे देव’ अगदी तसंच आहे हे… तिच्या मनातील पूजा माझ्यापर्यंत पोचली… आणि मी प्रसन्न झालो…. आणि तिला यश मिळालं.. आणि तिचं काम ही चांगलं आहे… त्यामुळे तिला कंपनी ने प्रमोशन सुद्धा दिलं, कळलं का..?

अगं बदलत्या काळानुसार , वेळेनुरूप बदलावं लागतंच माणसाला… म्हणून त्यांच्या मनात श्रद्धा नसते असं होत नाही..” पार्वती माता म्हणाल्या, ‘हो बरोबर बोललात तुम्ही.. तिची हरतालिका मानस पूजन फळाला आली… पण तिझ्या सासूबाईंच्या हरतालिकेचे काय होणार… त्यांना ही कुठला वर दिला तुम्ही.?? त्यांनी तर तुमची इतकी विधीपूर्वक पूजा केली’….. शंकर म्हणाले, ‘अगं त्यांना वेगळा वर द्यायची काय गरज आहे का..? इतका चांगला त्यांना मुलगा आणि सून आहे… त्यांचे घर संपन्न आहे.. त्यांना कशाची म्हणून कमी नाही.. हेच तर त्यांनी आतापर्यंत केलेल्या.

हरतालिका व्रताचे फळ आहे जे त्यांना मिळाले आहे… अशाप्रकारे दोघींचीही हरतालिका फळाला आली. शंकर आणि माता पार्वती आनंदाने पृथ्वीतलावर फेरफटका मारून परत गेले..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!