अमावस्याच्या दिवशी सुनेने सासू सोबत केले असे काही की पाहून तुम्हाला ध-क्काच बसेल..

‘अगं सुनबाई ते दिवे घासून ठेवतेस का… उद्या दिव्याची आरास आहे गं,.’सासुबाई सुनेला म्हणाल्या.. तशी सुनबाई चिडलीच..’ हं तुमचा लेक तर गेला निघून आणि तुम्ही मलाचं घ्या ह्या चालीरीतीमध्ये… हे वाक्य ऐकताच उदास झाल्या त्या आणि… उदास हसत म्हणाल्या,.’ सुनबाई हे सणवार काय आणल्या ला अडकवण्यासाठी नसतात, अग हे तर आपल्या आनंद देण्यासाठी आणि आनंदीत राहण्यासाठी आहेत, आणि हि अमावस्या म्हणजे..

आपल्या या उदास आणि काळोख्या जगण्यात काहितरी उत्साह नक्की आणेल,.. आपल्याला नेहमी प्रकाशाच्या मार्गाला घेऊन जाणारे हे दिवे ह्यांना प्रेमाने प्रकाशीत केलं आहेत कि ते आणखी खूप छान दिसतात, आणि यामुळेच आपल्या मनाला समाधान मिळतं..’ ती न ऐकताच गेली आणि तयारीला लागली नंतर ती इंटरव्ह्यूला गेली… ‘दहा लाख रुपये द्यावे लागतील या नोकरीसाठी तुला … हे वाक्य ऐकून ती गप्पच झाली..

एका मराठी शाळेच्या नोकरीसाठी दहा लाख.. ती उठली आणि त्या ऑफिस मधून निघून तरातरा चालत स्टेशनवर आली… आणि आता दुपारचे चार वाजले होते.. आणि तिला भुक लागली होती, तिने गरम मसाले(दाणे) घेतले… आणि ती लोकलची वाट बघत तिथल्याच जवळच्या बाकड्यावर बसली.. आता बसतानाही तिने तिझ्या साडीचा विचार केला नाही, आणि तिच तिलाच हसू आलं.. ती म्हणाली सकाळी किती जपली आपण हि साडी..

खुर्चीत बसताना सासुबाई या साडी च्या घडीवर बसतात की काय तर किती जोरात खेकसलो मी त्यांना तर त्या दिव्यांमुळे राग होताच त्यांच्या मनात, पण खरंतर हि साडी आपण फार नेसत नाही आपण.. ती तर कलकत्ता कॉटन मधून सुनीलने खास आणली होती, माझ्या साठी… तू बारीक आहेस आणि तुला ही साडी सुंदर दिसेल.. आणि कलर तर अगदी चांगला फिकट आकाशी होता.. मी हि साडी घातली कि तो मला हमखास म्हणायचा.

की माझं आभाळ पांघरलं आहे तू… आणि आहेच हि साडी त्यातल्या त्यात खास असा इंटरव्ह्यू असला कि नेसायला चांगली वाटते… इम्प्रेशन पडतं.. आणि तिला तो इंटरव्ह्यू आठवला आणि आता तीच हसु आलं की किती विचार करतो आपण..’ आपले सर्टिफिकेट, आपली भाषा, कपडे, आणि देहबोली आज सकाळी चारपाच वेळा आरशात बघितलं होती, आज सकाळी निघताना.. पण इथे तर वेगळीच बोली…

जाऊ द्या हि पण नोकरी नव्हती आपल्या नशिबात, असं समजु… पण आता जरा लवकर नोकरी मिळायला हवी कारण, आता सासुबाईच्या हातचं ऑपरेशन पुढच्या महिन्यात तरी वकरायला हवं… तिनं आभाळाकडे पाहिले… आणि तेही तिच्या साडीसारखं फिकट निळ दिसत होतं…. ती म्हणाली..’काय रे सुनील अचानक गेलास मला आणि आईला सोडून.. अरे लग्नाला फक्त एकच वर्ष झालं रे… पण आई तर… 30 वर्षांपासून गुंतलेल्या तुझ्यात.

आता त्या कशा जगतील एकट्या..?? तू उचललस भित्र पाऊल पण मी नाही.. आणि असा अविचार करू शकत… कारण मी पण एक आई होतीये ना आपल्या दोघांच्या ह्या बाळाची आणि मग ती ही एक आईच आहे… आणि मी नाही तिला सोडून जाणार कधी… तुझ्यासारखी.. आता तिला ट्रेनचा आवाज आला… ती झटकन उठली… तिझ्या डोळ्यातुन पाणी आलं होत हे तिच्या लक्षात आलं मग तिने पदराने आपले डोळे पुसले… आता एकटी होती ती…

आणि आता ती फक्त ह्या लोकल मध्ये घुसणाऱ्या गर्दीचा एक भाग झाली…आणि त्या लोकल मध्ये चेंगराचेंगरी करत तिनं खिडकीजवळ जागा मिळवली… आणि एका क्षणात लोकलच्या सगळ्या जागा भरल्या… कुठे तरी चार सीटवर पाच बसले होते… आणि कुठे तर चारच जणी बळच पाय पसरून बसल्या होत्या जेवेकरून दुसऱ्याला ऍडजस्ट करणार नाही नाहीत,.. हीने स्वतःच कोंडाळ केलं… तसा तिला पाचवा महिना असल्याने तिला.

थोडं अवघडतच होतं… पण उभी असलेली महिला तर आठव्या महिन्याची आहे अशी तिला दिसली… लेडीज डबा होता ना म्हणून वासांचे रंग पसरायला सुरुवात झाली होती… आणि मग हिच निरीक्षण सुरू झाले,… मघाशी झालेला इंटरव्ह्यू ते निळ आकाश, सुनीलची येणारी आडवणी, आणि आई ते सगळं आता ती विसरली होतं… आता फक्त ती या गर्दी जगत होती… तिला मस्त मोगऱ्याचा वास आला… समोरच एक बाई गजरे विणत होती.

आणि पटकन विकत होती.. आणि तिच्या पलीकडे एक आजी बाळाचे मोजे विणताना तिला दिसल्या… मध्येच मासळीचा घाण वास ही तिला आला.. कोणीतरी कोळीण डब्यामध्ये चढली असेल, तिने आपल्या रुमलासाठी पर्स उघडली.. आणि तिच्या हाताला बाटली लागली.. ती स्वतः शी म्हणाली, ‘अरे ताईकडे लोणचं द्यायचं विसरलच, आपला इंटरव्ह्यू बोर झाल्यामुळे… विसरलं भावतेक, आणि सासुबाईंनी किती आठवणीने करून दिलं.

होत ताइसाठी खास तिला आवडत म्हणून… आणि मी ही किती चिडलो होतो, तो लिंब ओट्यावर बघून त्यांच्यावर तर त्या बिचाऱ्या किती घाबरत म्हणाल्या, ‘अग स्वस्त घेतले होते ग, 10 रुयपला अर्धकिलो दिले, त्याने, आणि 5 रुपयेची मिर्ची आणि मसाला घरीच तर केला होता,.. आणि तुझी ताई तर किती करत्या आपल्यासाठी….. तू म्हणालीस तिकडे जाणार आहेस इंटरव्ह्यू साठी. मग मला वाटलं की द्यावं तुझा ताईसाठी.. मेलं चिराचिरी तुलाच.

करावी लागते पण असुदे कर आजच्या दिवस पुरती… आणि एकदा माझा हात बरा झाला की तेही मीच करेल, आता त्यांना वाटणार की मुद्दामच दिलं नाही मी,… तिने तिझी पर्स बंद केली, आणि बिचारही.. परत गर्दीत बघू लागली.. तिने पाहिले की तिच्या समोर एक बाई शेंगा निवडून पाकिटं बनवत होती.. तिने 20 भर पाकिटंचा ढिग केला, एवढया गर्दीत तिने तो बरोबर विकला, गजरेवालीने पण गजरे डब्याच्या खिडकीत 25 एक गजरेबांधले होते..

आणि त्याच्या पुढच्या स्टेशनवर एक बाई चढली.. सरळ आली आणि त्या भाजीवाली, गजरेवालीशी हिशोब करून सगळं आपल्या ताब्यात घेऊन दाराकडे जाऊन उभी झाली… आणि हिने पण विचारलं त्या दोघींना की.. के झालं तर त्या म्हणाल्या की आपला नफा काढून तिला विकलं सगळं… पुढं ती कितीला विकते आपल्याला काय करायचं आहे..?? आणि हिच्या डोक्यात एक इंडिया अली… ती पटकन त्या बाईकडे गेली..

आणि आपल्या पर्समधली लोणच्याची बरणी उघडून त्या बाईच्या नाकाशी धरली, ती बाई चव बघे तो पर्यंत वाऱ्याने त्या लिंबूमिर्ची तिखट मस्त वास पूर्ण डब्यात फिरला लागला… आणि तिथेच डब्यातील सर्वांना तिला तिचा फोन नंबर आणि पत्ता विचारणाऱ्याची झुंबड उडाली होती.. आणि त्यात काही ऑर्डर फायनल देखिल झाल्या… धंदा सुरू होण्याआधीच पसरला होता… आणि ते मुरलेले लोणचंही चव बघू म्हणत म्हणत अनेकांच्या लोकांच्या जिभेवर रेंगाळलं होते…

काही तरी तिच्या साडीवरही सांडलं होते तिने ते पुसलं नाही… ती म्हणाली की नको ही साडी एक भित्र्या माणसाची, आणि मला फक्त व्हायचं आहे, आभाळ माझ्या या बाळाचं, आणि सुरकुतलेल्या दोन हातांच… घरी येताच लगेच तिने सगळे दिवे काढून स्वछ केले…आणि हे बघताच सासुबाई तिला म्हणाल्या,.

की नोकरी मिळाली का काय..” तीही हसुन म्हणाली..’ नाही मिळाली, पण नैराश्याच्या अंधाराला ध्येय नक्की मिळाले आणि मनातले दिवे ही लख्ख झाले… आणि सासुबाई ही कुतूहलाने बघत होत्या, त्या लख्ख दिव्यांकडे आणि तिच्या सुनेच्या मनातही पेटलेल्या सकारत्मक भावना कडे… तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!