महादेव मंदिर आणि ती.. ही कथा नक्की वाचाच, महादेवांनी तिच्या सोबत काय केले.

त्या काळ्याभोर महादेवाच्या पिंडीवर बोटं लावून ती कैलासराणा श्लोक म्हणताना, त्या देवळाच्या गाभाऱ्यात येणारा तो दुधाचा नकोसा वाटणारा वास आणि त्या पिंडीचा हवासा वाटणारा स्पर्श यामुळे ती गडबडून जायची पण देवळाच्या गाभाऱ्यात बाजूला बसलेली आजी डोळे मिटून ते दोन्ही स्वीकारते होती, तन्मयतेने तिला वाटायचे की.. कधी एकदा त्या देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडू असं वाटायचं तिला,.. आणि तिने बाहेर आलं कि त्या मोकळ्या हवेत भरभरून घेतलेला श्वास… आणि तसंही हे लहानस महादेव मंदिर गावातुन बाहेर एका शेताच्या बांधावर होत.

चिंचेखाली.. लहानसं पण अगदी प्रसन्न…सुखकर त्याच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या छोटासा ओहळाचा हलकासा येणारा आवाज, अगदी मनाला स्पर्श करून जायचा, आणि हे सर्व मनात आनंद निर्माण करणार होतं… आणि तिला पण खूप आवडायचं तिझ्या आजी सोबत ह्या मंदिरात यायला आणि तिला श्रावण सोमवार आणि हरतालिकेला यायला,…. तिची आई अचानक वारली आणि मग तिच्या आजीनेच इकडे आणलं होत… हे महादेवाचे मंदिर तसं दूर असल्याने आधी कधी आजी तिला आणत नव्हती… आता तिला जरा समजत असल्या पासुन तिझी आजी तिला.

आपल्या संस्कृती परंपरा करायला लावते, हे सगळं… आजही माझी आजी उपवास, पुजा त्यातही म्हणते,.. म्हण महादेवाला चांगला नवरा मिळू दे मला,.. तिला प्रश्न पडतो चांगला म्हणजे नेमका कसा??? त्यावर तिझी आजी म्हणते समजून घेणारा गं… हे हि उत्तर तिला न कळणारच होत.. नंतर आता हि मंदिर वारी… तिला आवडतच इथं यायला… पण फक्त नको वाटातो तो त्या गाभाऱ्यात असलेला दुधाचा वास… आणि ती देवळाच्या बाहेरच्या ओट्यावर आजीला चिटकून बसत म्हणायचो,’ अग आजी मला या महादेवाला हात लावून बसावं वाटतं पण तो दुधाचा.

येणार वास नको वाटतो..ग’ तिची आजी म्हणायची ..’ अंग अश्या विरुद्ध गोष्टी म्हणजेचं तर जगणं असत,.. काळाभोर पिंडीवर थंडगार महादेव त्यावर वाहिलेली तो हिरवीगार बेल पान हे सगळं छान वाटतं… आणि त्या पिंडीला स्पर्श केली की ती प्रसन्नता हवीशी वाटते, पण काहीसं नको ही वाटत, भावतेक वेळा ते स्वीकारता आलं तर तेही हवेस वाटते,… आणि आपण जर त्या नकोश्या वाटणाऱ्या गोष्टीकडेच बघत बसलो, तर जे हवं आहे तेही गमवाव लागतं,…. आणि आजी म्हणाली तुला जर त्या दुधाचा वास नको वाटतो मग तू त्यावरच लक्ष देतेस.

आणि तुला हवा असणारा तो पिंडीचा स्पर्श कमी होतो… तू आता या उलट करून बघ ‘आणि हे आजीच वाक्य ऐकून मी पळत पळत गाभाऱ्यात गेलो… आणि माझ्या बोटांनी महादेवाचा स्पर्श केला तो स्पर्श आपल्या शरीरात सळसळला,.. मी खुप शिकलो आणि त्या दिवशी एक स्त्री म्हणुन बरंच काही दुर्लक्ष करत आणि स्वीकार करत जाणं ही शिकलो.. आणि अश्या कितीतरी हरतालिका मधुन… तिची आजी अर्धांगवायु होऊन आजारी पडली… आणि यावेळी तिची जगण्यात काही मदत नव्हती, आणि या हरतालिकेला तिचे आजोबा हे सगळं करत होते..

मी ही विचारलं होत तुम्ही का करता हे.. लोकं ह₹के म्हणतील,.. त्यावर तिचे आजोबा म्हणाले होते की’,, बाळ तुला मागे एकदा आजीने सांगितलं होते ना की जीवनात काही हव्या वाटणाऱ्या गोष्टींसोबत नको वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा असतात,..आणि त्या गोष्टी स्वीकारता आल्या पाहिजे फक्त,.. आणि मला हि पार्वती म्हणजे तुझी आजी सारखी वाटते… आजोबा म्हणाले खुप छान जगलो ग आम्ही दोघे दर हरतालिकेला आम्ही सोबत उपवास करत होते, तूही बघितलं ना… मी लगेच म्हणायचो… जोडीदारा मध्ये स्त्री पुरुष हा भेद कशाला…? आणि एक दोघे ऐकमेकांना.

पुरक असावेत असे आपण आहोत आणि मग फक्त तूच हि जोडी कायम असावी म्हणुन का उपवास करतेस, मी हि करणार तुझ्यासाठी… आणि हे सांगतांना माझा आजोबाच्या डोळ्यात पाणी आलं होत,… ते म्हणाले की ह्या वर्षात आलेलं तिचं दुखणं ज्यामुळे माझं पूर्ण जगणंच बदलून गेलं पण, माझ्यावर तिचं प्रेम कायम आहे आणि ते राहणार… माझी आणि तिची साथ सगळं माझा लक्षात आहे, मग म्हणून आज ह्या दुखण्यासह तिला प्रेमाने आणि सुखाने स्वीकारता आलं पाहिजे, हेच तर आहे तिच्या हरतालिकेच्या वापवासाचे फळ वाटेल असेल तिला…

चल शेजारच्या शांताबाई बसणार आहेत हिच्या जवळ, चल आपण जाऊया त्या चिंचेखालच्या महादेवाला … पण जरवर्षी आजी आजोबांन सोबत जायची पण या वेळी ती नव्हती… पण तिला परत ती थंडगार पिंड, तो दुधाचा वास आता तिला त्रासदायक वाटत नव्हता.. आताही तिने तिच्या आजोबांकडे बघितलं ते पण आजीसारखे शांत बसले होते, आजोबा ही जोडीदारच सगळं दुःखही स्वीकारून त्याच्या बरोबर प्रेमाने वागण्याचा आशीर्वाद मागणारे होते… आणि लगेच तिनेही डोळे मिटले यंदा, मात्र तिच्या मनात वेगळीच प्रार्थना उमटली,.. तिला वाटलं की माझ्या.

आजीला जसा तरुण वयात साथ देणारा आणि उतारत्या वयातही जोडीदाराची दुखणी समजुन घेणारा आणि प्रेमळ, समजदार नवरा मिळाला पाहिजे.. तसाच मिळू दे देवा,.. त्या काळ्याभोर महादेवाचा पिंडीवर थंडगार स्पर्श,.तेच बेलपान आणि तो गाभाऱ्यात दुधाचा येणारा वास… आणि त्याच आडवणी तिने मनात साठवल्या… कारण आता तिच्या लग्नाचं बघण्यास आजोबांनी सुरुवात केली होती… या नंतरची पुढली हरतालिका ही तिच्या नवऱ्याच्या घरी होणार होती…. घरी जाताच आजोबांनी आजीच्या जवळ जाऊन एकाद्या लहान मुलाला करतो.

तसाच हात फिरवला आजीच्या तोंडावरून… आणि म्हणाले, आलो ग जाऊन महादेवाला’ हा आणि तो महादेवही म्हणाला मला की,’ तुझी पार्वती होईल लवकरच बरी..’ आणि पुढवर्षी जोडीने या माझ्या दर्शनाला,.. आणि आजीही हसली… त्याच वेळी आजोबांनी मात्र स्वतःचे डोळे चटकन पुसले,….. हिला मात्र मनातुन वाटलं की,.. जसा माझ्या आजीला सुख दुःख सह म्हातारंवयातही समजून घेणार माझे आजोबा मिळाले, तसा मला आणि सगळ्यांना मिळो… हि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!