गणपती बाप्पाची मूर्ती रंगवताना या कुंभारासोबत घडले असे काही की पाहून तुम्हाला ध-क्काच बसेल..

त्याने सकाळी लवकर गोल्डन कलर घेऊन मूर्तीचा शेवटचा दागिना रंगावाय सुरू केला… ती झोपेत असतानाच., बरोबर रंगकाम पुर्ण व्हायला आणि तिला जाग यायला…. तिने हे बघितलं आणि तिला राग आला तिने बडबड करायला सुरुवात केली.., तु कर्ज काढून घडवत होतास ह्या मुर्ती… मग आता अली ना उपाशी मरायची वेळ, आणि आता तुझा गणेशा येईल का आपले पोट भरायला या मुर्ती तुन…?? तिची बडबड चालु होती.

पण तो मात्र शांतपणे, मूर्तीच्या डोळ्याजवळ काही छटांचे रंगकाम करत होता.. हो आणि त्याचे भाव मुर्तीत उतरत होतें, का मूर्तीच रडत आहे त्याला कळेना.. कारण बायकोची बडबड तो थांबवू शकत नव्हता.. आणि त्यात काहीही खोटं नव्हतं.. गेल्या आठवड्यापासून दुकानदाराने उधार देणं पण बंद केलं होतं, ह्या कोरोनाचा काळात खुप मोठा फटका त्याला ही बसला होता.. आणि त्या यंदा भरपुर कर्ज घेऊन त्याने मोठया.

गणेश मुर्ती तयार केल्या होत्या,, पण या वेळी बरेच गणेश मंडळ बंद झाले होते.. आणि कित्येकांनी तर कोरोना योद्धा ह्यांना मदत करून सण साजरा करायचा ठरवला होते,. यंदा प्रत्येकजणाने अगदी वीतभर मुर्ती स्थापन करायचे ठरवले होते… खप बदल झाले या वेळी हे बघुन ती सतत चिडचिड करायची.. आणि त्यातल्या त्यात ती या मूर्तीवर कामच करू देत नव्हती… कारण ही मूर्ती तर मी खूप खर्च करून बनवली होती..

हो मूर्ती अगदी पर्यावरण पुरक, आणि नवसाची होती… मागच्या वर्षी एका मंडळाने हि मुर्ती घेतली होती.. आणि मग त्या कॉलनीतल्या एका बाईने ह्या गणेशाला नवस बोलल्याने तिला दिवस राहिले, अशी तिची धारणा होती, म्हणुन ते दोघे नवरा-बायको ह्याला शोधत घरी आले… आणि ती बाई बोलताना तिचे डोळे पाणावले होते, ती म्हणाली गेली बारा वर्षे मी मुल हिट नाही म्हणुन डॉकटर कडे ट्रिटमेंट घेत होते.

पण इथे कामासाठी आल्यावर माझी मैत्रीण सहज म्हणाली, ‘अग तु ह्या कॉलनीतल्या गणेशाला नवस कर.. आणि ती म्हणाली ह्याची निर्मिती करणारा मुर्तिकार भाव, जीव ओतुन मूर्ती बनवतो, अगदी जिवंत.. मग तू बोलुन बघ नवस,.. आणि दादा खरंच तुमच्या मूर्तीने छोटा जीव माझा कुशीत फुलवला.. आणि माझा नवस असा आहे की पुढच्या वर्षी ही असाची मूर्ती बनवा.. फक्त त्यात.. भरपुर बिया टाका, पण खर्चाची चिंता नको..

कारण त्याच्या विसर्जना नंतर त्या मूर्ती ची माती मी सगळ्यांना देणारा आहे.. आणि त्या मूर्तीच्या कुशीतलं प्रेम, आशिर्वाद प्रत्येकांना मिळू दे, कारण हे की त्याने माझी कुस फुलवली..’ आणि मग काही रक्कम हातात ठेवून ते निघून गेले,. त्याला आनंद झाला होता कारण.. त्याच्या बरोबर कौतुकासोबत नवीन काहीतरी घडवायचं होतं.. निसर्गातून पुन्हा फुलणारं, आणि खर्च जास्त होता, पण नवस आहे त्यामुळे ऑर्डर पक्की होती..

आणि त्याने उत्साहात कामाला सुरूवात ही केली पण, मध्येच आली हि महामारी….. पहिल्याचं लॉकडाऊन मध्ये आपल्याला बँकेचे हप्ते थकले होते, त्यामुळे बँकेतून फोन येणे सुरू झाले.. मग त्याने त्या दाम्पत्याला लावलेला फोन त्याला आठवला.. ‘हॅलो.. सर मी मुर्तिकार तो बोलतोय. मग लगेच तिकडून आवाज की.. अरे तिला कोरोना झाला आहे आणि ती icu मध्ये आहे फोन ठेव..’ काहि दिवसांनी मी त्यांच्या घरी गेलो तेंव्हा मला कळलं की,..

त्यांचं बाळ गेलं आणि ते दोघे गावी निघून गेले.. आपण तसेच परत आलो.. आणि त्याला समजलं की कोरोनाने आपला गळा दाबायला सुरुवात केली आहे. पण देवा तुझ्यावरचा माझा विश्वास, आणि भक्ती तेंव्हा ही, आणि आजही कमी झाली नव्हती,.. काही तो तुच मार्ग दाखव असं म्हणत त्याने, तापाने फणफणत असलेल्या त्याच्या पोरीच्या तोंडावर हात फिरवला….. आणि नंतर बायको आलीच अंगावर..’ फेका ते रंग,ब्रश कुठं तरी.

अबी जरा दुसऱ्या कामाचं बघा काही तरी.. आणि एक हा बाप्पा नाही पोसायचा आपल्याला आता…’ तसं त्याने करुणेने पाहिलं आणि स्वतः च्या मनात म्हणाला…’ मुर्तीकलेच कुठलंही शिक्षण मी न घेता,. आणि तु स्वतःला माझ्याकडून घडवून घेत होतास…. आणि म्हणून मला आज तुला सोडून दुसरं काही करावं हे पटत नाही, आणि एक सतत तुझे प्रेमाचा वर्षाव करणारे, डोळे आणि आशिर्वाद देणारे हात झोपेतही मला दिसतात असतात,..

तुला कधी 21 मोदक, सोन्या आणि चांदीच्या दुर्वा मी वाहत नाही, पण एक जेंव्हा मी तुला घडवत असतो, तेंव्हा माझा अश्रूंनी होणारा अभिषेक काही थांबत नाही… आणि हिच भक्ती तर जगवते मला मग आज हि परिस्तिथी का..??? आणि मग तो त्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवून रडू लागला..’ मग तिला काहीच सुचेना.. आणि तेवढ्यात हाक आली… आहे का घरी कोण, बघितलं तर तेच नवरा आणि बायको होती..

मग काय बोलावं त्याला काही सुचेना..? मग त्या माणसाने एक बॉक्स ज्यात पैसे होते, तो मूर्तीच्या पायाशी ठेवला,.. त्याच बाईने हात जोडले… मी ती म्हणाली माफ करा पैसे द्यायला जरा उशीरच झाला… आणि एक की मुर्ती नेणं आता शक्य नाही कारण, आम्ही आता त्या कॉलनीत राहात नाही आम्ही गावी राहतो… आणि या वेळी मूर्तीचे नियम पण बदलले आहेत… पण आमची एक विनवणी आहे की, हि मूर्ती इथेच स्थापन करा..

आणि विसर्जित केली कि आम्हाला थोडी माती द्या, आमच्या बागेत लावण्यासाठी आणि इतरांना ही वाटा,. आणि एक हे कोरोना संकट काही नेहमीच राहणार तर तुम्ही ह्याच खर्चात जेवढया छोट्या गणेश मूर्ती होतात, त्या दरवर्षी करा जा… हा घ्या त्याचा चेक आणि दरवर्षी आम्ही त्या मूर्ती सेवा म्हणून गावात देणार आहे,.. त्याच्या विसर्जनातून आलेल्या मातीत आशीर्वादाच्या किती तरी बागा फुलू द्या… आणि हि ऑर्डर कायमच समजा..

त्याचे डोळे अजुनही वाहात होते,. तो म्हणाला ताई तुमचं मुल गेलं असं कळलं, मला आणि मला वाटलं की आता के तुम्ही येणार नाही…. ती उदास होऊन म्हणाली, ‘.. कदाचित तेवढंच आयुष्य होत माझ्या बाळाचं,.. पण माझ्यावर असलेला वांझोटेपणाचा डाग ते पूर्णताह मिटवून गेलं.. अबी माझाही कुशीत अंकुर फुलू शकतो.. हे ह्या गणरायाच्या भक्तीने दाखवून दिले, म्हणून मी ठरवलं आहे की, मुल होईल किंवा नाही, पण या धरणीच्या.

कुशीत ह्या बाप्पाच्या आशिर्वादातून रोपटे रुजवण्याचं काम आपण करायचं फक्त… आणि उगवायचं की नाही ते तो बघेल… एवढं बोलून ते नवरा-बायको निघून गेले.. आजच गणेशचतुर्थी होती.. त्याने पटकन उरलेलं रंगकाम पूर्ण केलं.. आणि बाहेर दाराशी उगवलेल्या दूर्वा घेऊन मूर्तीच्या डोक्यावर वाहिल्या.. आणि त्याच्या बायकोने पण गुळाचेच मोदक समोर ठेवले मग तेलाचीच आरती पेटली.. तीच आरती मूर्तीच्या चेहऱ्यावर धरताच.

ती मुर्ती आणखीन सुंदर दिसली… आणि ती तर बघतच राहिली, घरातील गणेश स्थापना, त्याला मात्र सोंडे मागुन शब्द ऐकू येत होते की,.. तू फक्त भक्ती पेरण्याचं काम कर.. आशिर्वादाची रोपं उगवतच राहतील… हे ऐकून त्याचा अश्रू अभिषेक मूर्तीच्या पायावर पडलाहोता.. आणि त्या भक्तिच्या ओलाव्यातूनच मूर्ती मधील बीया ला अंकुर फुटून आशेच रोपटं बाहेर पडू पाहात होतं… वाचकहो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!