देवघरात लक्ष्मीची मूर्ती गणपतीच्या कोणत्या बाजूला ठेवावी डाव्या की उजव्या नक्की पहा..

मित्रांनो देवघर जिथे आपण आपल्या इच्छा सांगतो, आपल्या समस्या सांगतो. जिथे आपण पूजा पाठ करतो. आणि भक्ती करतो. आपला प्रयत्न असतो की आपले देवघर प्रसन्न करतो. यात देवांचे स्थान सुद्धा नीट करावे लागते. जर आपण देवघरात देवांना योग्य स्थानी ठेवले तर, नक्कीच देवांची आपल्यावर कृपा होते. आपण आज लक्ष्मी मातेच्या स्थाना बद्दल बोलूया. मित्रांनो गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आपण एकत्र विराजमान करतो.

जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर राहावी. लक्ष्मी मातेची मूर्ती, किंवा प्रतिमा आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. पण लक्ष्मी मातेचे स्थान योग्य आहे का? बघा लक्ष्मी मातेला ठेवताना आपण आपण ती मूर्ती कोठे ठेवली आहे. हा सुद्धा मुख्य प्रश्न असतो. नेहेमी आपण लक्ष्मी मातेला गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवत असतो. आणि यामुळेच आपल्या घराची आर्थिक स्तिथी बिघडायला लागते. कारण देवांच्या डाव्या बाजूला.

किंवा पुरुषांच्या डाव्या बाजूला फक्त त्यांची पत्नी विराजमान होत असते. आणि लक्ष्मी ही गणपतीची आईसमान आहे. म्हणून नेहेमी लक्षात ठेवा मातेला नेहेमी गणपतीच्या उजव्या बाजूलाच ठेवावे. आणि देवघरात लक्ष्मी ला नेहेमी पहिल्या रांगेतच ठेवावे. आणि नेहेमी देवघरात अगोदर गणपती आणि मग लक्ष्मी मातेला स्थापन करावे. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!