
तीन महिने झाले घरातून बाहेर नाही की साधे खिडकीतून बाहेर डोकावणे देखील झाले नाही, हे गाव कसे आहे व शेजारी कोण कोण राहते हे देखील समजले न्हवते कारण आत्तीची तब्बेतच खूप नाजूक होती, डॉक्टरांनी तसे बजावलेच होते की, पायाचे हाड खूप ठिकाणी फॅक्चर झाले आहे, त्यामुळे यांना अजिबात हालचाल करून देऊ नका, त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील कामाचे सर्व ओझे मी माझ्या खांद्यावर घेतले, मग ते धुणीभांडी असो, जेवण असो, किंवा मुलांचे आवरणे, हे सर्व करताना मला तीन महिने कसे निघून गेले हे समजलेच नाही.
आता आत्याची तब्बेत थोडी सुधारत होती, तिला देखील त्या खोलीत बसून खूप कंटाळा आला होता.. म्हणून तीच म्हणाली.. “नीलम ये नीलम इकडे ये लवकर,”..! आली आत्या….! आत्याची अशी हाक ऐकून मला काहीच कळेना, काय झाले असेल आत्या खाली तर पडल्या नसतील ना?, असे अनके प्रश्न डोक्यामध्ये चालू होते, व त्याच लगबगीने मी हातातले काम तिथेच टाकून आत्याच्या खोलीमध्ये गेले…. काय झाले आत्या काही हवे आहे का?… काही नको मला.. तू काय करत होतीस इतका वेळ.. “काही नाही आत्या थोडे गहू.
निवडत होती.. म्हंटले सोहम आला की त्याला गिरणीतून दळून आणायला सांगायचे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी..!” बरं बरं..! ते गहू मोठे मोठे साफ कर आणि तुझे आवर.. जास्त नटू नको फक्त साडी व्यवस्तीत कर आणि ये.. थोडा बाहेरून फेर फटका मारून येऊ.. मी हो, नाही म्हणत लगबगीने आतमध्ये गेले. व पटापट आवरू लागले.. आत्या देखील व्हील चेअर चा आधार घेत तिचा गाऊन व्यवस्थित करत आवरू लागली.. थोड्या वेळाने पुन्हा एकदा आत्याने आवाज दिला, झालं का नाही ग आवरून, ये लवकर..
मागे येऊन जेवणाची तयारी देखील करायची आहे तुला, आणि हो आज थोडी गोड खीर कर आज तुझ्या मामांचा वाढदिवस आहे, मी हो करेन की आत्या.. तेवढ्यात सोहम शाळेतून आला.., सोहम तेवढे गहू दळून आणणार का रे? मी विचारले.. हो आणतो, खांद्यावरील दप्तर खाली ठेवत सोहम बोलला, त्याला थँक्स म्हणत मी आत्याच्या. खोलीत गेले, “चलतेस ना,” हो चला आत्या, आत्या या बस ह्या व्हील चेअर वरती लगेच जाऊ, नाही नाही त्यावरून नाही, आपण हळूहळू चालत जाऊ.. पण आत्या डॉक्टर बोललेत.
मला काही सांगू नको त्या डॉक्टरांच माझे वाक्य कापत आत्या पटकन बोलली, बर ठीक आहे चला.. मी त्यांचा हात धरत त्या गल्लीतून दुकानाजवळ पोहोचले, “या माने मॅडम..” आम्ही पायरी चढत असताना त्या दुकानदाराने आदराने आत्याला हाक मारली, तशी थोड्या वेळा पूर्वी आग फेकणारी आत्या गुलाबासारखी खुलून गेली.. अरे वा हे दुकानदार किती हुशार असतात, समोरच्याला पाहिले की त्याला जाळ्यामध्ये कसे अडकवायचे ते लगेच समजते यांना..! मी मनातल्या मनात बोलत हळूच हसले.. त्यांनी आत्याला.
बसायला खुर्ची दिली, आणि म्हणाले बोला काय दाखवू.. आमच्या ह्यांना एक ड्रेस घ्यायचा म्हणते पण पण.. आहो इतकेच ना, गोट्या नवीन माल आला आहे त्यातले ड्रेस आन मॅडमांना दाखवायला, आत्याने नाही हो करत त्यातला एक ड्रेस बाजूला काढला आणि बिल. तयार करायला सांगितले, बाकी तुमची चॉईस खूपच मस्त आहे बरं का?महेशला खूप शोभून दिसेल हा, ड्रेस” दुकान मालक बोलला, पण आत्याने फक्त १००० रुपये आणले होते. ते देत आत्या म्हणाल्या वरचे राहिलेले पैसे पुढच्या आठवड्यात देते.. चालेल काही हरकत नाही.
महेशला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.. हो नक्की देईन भाऊजी, असे बोलूनआम्ही तेथून निघालो, घरी आल्यावर आत्या बोलल्या की तो दुकानदार आमच्या ह्यांचा वर्गमित्र आहे, दोघांनी सोबत व्यवसाय चालू केला होता.. त्याने कपड्यांचे दुकान टाकले व यांनी किराणा मालाचे.. पण यांच्या वागण्याने पाक वाट लागली, आणि जेव्हा दुकानातील माल भरायला पैसे शिल्लक नसताना मी हिशेबाची वही पाहिली तर त्यामध्ये फक्त बायकांचीच नावे होती,आणि त्यापुढे त्यांच्या उधारीचा आकडा.. हे सर्व पाहून माझी “तळ पायाची.
आग मस्तकात गेली,” मी ठरवले आज याचा निकाल लावायचा.. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी खूप प्याली होती, ते पाहून मला आणखी राग आला.. आमच्यात मोठे भांडण झाले, रागाच्या भरात त्यांनी मला कट्ट्यावरून ढकलून दिले.. आणि माझा पाय मोडला..? हे बोलत असताना आत्याच्या डोळ्यात पाणी आले मी त्यांना सावरत खोलीत घेऊन गेले आणि आराम करायला सांगितला, एवढे होऊन देखील आत्यांनी मामासाठी कपडे आणले हे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.. बरं जाऊदे सगळे असे मनाला समजावत..
मी किचनमध्ये शिरले, आणि स्वयंपाक करायला लागले, आत्यांनी सांगितलेले तसे सर्व जेवण तयार होते.. मी मोठा श्वास सोडला.. आणि बाहेर हॉल मध्ये आले, तेवढ्यात ढगांच्या कडकडण्याचा आवाज आला आणि पाऊस सुरू झाला. थोड्या वेळाने मामा देखील घरी आले पण ते पूर्ण भिजलेले आणि नशेमध्ये होते.. मी पटकन सोफ्यावरून उठून आत किचनमध्ये पळाले. मामा आत्यांच्या खोलीत जाऊन अर्ध्या एक तासाने नवीन घेतलेले कपडे घालून बाहेर आले, नीलम जेवायला वाढ आत्या बोलली.. मी त्या दोघांना ताट करून दिले.
अगं तुला पण ताट करून घे, आणि ये बस इथे माझ्या जवळ आपण सोबतच जेवन करूया .. मामा तिरक्या नजरेने माझ्याकडे बघत बोलले, मी नंतर जेवते असे सांगून पुन्हा किचमध्ये गेले.. आता सर्वांचे जेवण झाले होते, मी भांडी घासण्याअगोदर आत्याला गोळ्या देण्यासाठी गेले तर मामा तिथेच बसले होते.. नीलम आन इकडे आज मी देतो माझ्या बायकोला गोळी असे बोलून त्यांनी माझ्याकडून गोळ्यांचा डबा घेतला व आत्याला गोळ्या देऊ लागले.. मी आपलं दोघांचे चालूंदे असे म्हणत खोलीतून बाहेर आले आणि भांडी घासायला गेले..
थोड्या वेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे वातावरण अगदी प्रसन्न झाले होते, बाहेर छान गार वार सुटलेले होते .. मी सगळे आवरून बाहेर गॅलरीमध्ये येऊन बसले, FM ऐकत, त्यावरील गाणी देखील त्या वातावरणाला शोभेल अशीच लागली होती. मग काय नीलम आणखी काय पाहिजे असे म्हणत त्या ढगांतून हळूच आपला चेहरा बाहेर काढण्याऱ्या चंद्राकडे पाहत मी तो क्षण मनात साठवत बसली.. तेवढ्यात आतून आवाज आला, हे घे जया मी तुझ्यासाठी मेडिकल मधून गोळी आणली आहे याने तुझी ठणक पूर्ण कमी येईल..
हे ऐकून मी धावत आत्याच्या खोलीत गेले, “पण डॉक्टरांनी ठणकेवरच्या गोळ्या दिल्या आहेत की, ही नका खाऊ आत्या मी बोलले..” तू गप्प बस तुला काय समजते मी मेडिकलमध्ये विचारूनच आणली आहे, हिने माझ्यासाठी आज एवढे केले मग मी हिला एक गोळी आणून देऊ शकत नाही का? हे ऐकून आत्याच्या डोळ्यात पाणी आले, आणा इकडे म्हणत आत्याने ती गोळी खाल्ली देखील.. नीलम जा आता खूप वेळ झाली आणि हवा देखील गार सुटली आहे तू किचनमध्ये फरशीवर झोपू नको आजारी पडशील वरच्या.
खोलीत जा आणि सोहमला आमच्या जवळ पाठवून दे!! आल्या पासून आज पहिल्यांदा आत्या माझ्याशी प्रेमाने बोलल्या.. मी मान डोलावली आणि वरती जाऊन सोहमला आत्याचा निरोप सांगितला तसा सोहम माझ्यावर ओरडत “मी नाही जाणार खाली तूच जा..!” असे म्हणत दरवाजा आतून लॉक करून घेतला.. मी खाली जाणार इतक्यात मामा बोलले थांब मी बघतो, मी एकदम दचकले मला माहीतच नाही मामा कधी माझ्या जवळ येऊन उभा राहिले होते..! मामांनी खिडकीत ठेवलेली दुसरी किल्ली घेतली व लॉक कडून.
सोहमला समजावत खाली घेऊन गेले, आणि जाताना त्यांनी माझ्या शरीरावर एक नजर टाकली, मी शरीराला चोरून घेता खोलीत गेले. आणि मस्त FM ऐकत हंथरूनवर पडले.. FM ऐकत माझा कधी डोळा लागला ते माझे मलाच कळले नाही, अचानक कोणीतरी गालाला स्पर्श केल्यासारखा भास झाला आणि मी दचकून उठली. खोलीत पूर्ण अंधार होता कदाचित जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे लाईट गेली असेल असा विचार करत मी मोबाईलचा टॉर्च लावला आणि पाहते तर काय मामा माझ्या बेडजवळच उभे होते..
त्यांना पाहून मी एकदम दचकले आणि घाबरले देखील त्यांची माझ्या शरीरावर पडणारी नजर पाहून माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले काय करावे काही समजत न्हवते, मामा तुम्ही इथे काय करताय?असे म्हणत मोठ्याने आत्याला हाक मारली, आणि बेडवून उठून बाहेर जाणार इतक्यात मामाने मला पुन्हा बेडवर ढकलले.. मला काय करावे काहीच समजेना, मी पुन्हा आत्याला हाक मारली तर मामा माझे तोंड दाबत बोलले. तू किती जरी ओरडलीस तरी तुझी आत्या काय उठणार नाही, कारण मगाशी मी जी गोळी दिली होती.
ती झोपेवरचीच होती. अगं तीन महिने झाले मला तिच्याकडून शरीरसुख मिळालेले नाही, आणि मला माहित होते की मिळणार देखील नाही.. म्हणून मी खूप प्रयत्न केला तुझ्या जवळ येण्याचा.. वाटले तू देखील एक विधवाच आहेस, तुझा नवरा जाऊन दोन वर्षे झाली, तुला देखील शरीरसुख हवे असेल पण तू सारखी लांबच पळत होतीस.. पण आज नाही.. आज तुला कुठेच पळता येणार नाही असे म्हणत मामाने दोरीने तिचे हात बांधले.. ती मामाकडे दयेची भीक मागत होती,पण मामा काही तिला त्याच्या हातून सुटून.
निघूदेणार न्हवता..अगं मीच जेवण झाल्यावर जयाला म्हणालो, आज खूप थंडी आहे.. निलमला फरशीवर झोपू नको म्हणावं, नाहीतर आजारी पडेल आणि ती आजारी पडली तर घरातले काम कोण करेल त्यापेक्षा तू तिला सोहमच्या खोलीत पाठव आणि आजच्या दिवस सोहमला आपल्याजवळ झोपु दे.. आणि जया इतकी बावळट आहे तिला देखील हे पटले, हे बघ नीलम तू देखील जास्त नखरे नको दाखवू.. फक्त एक तास मला कोऑपरेट कर बघ तुला देखील मजा वाटेल.. पण नीलम काही त्याचे ऐकणार न्हवती ती त्याच्या.
जाळ्यातून सुटण्यासाठी जमेल तो प्रयत्न करत होती…. वाचक हो इथून पुढचा लेख तुम्हाला भाग २ मध्ये वाचण्यासाठी मिळेल.. वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,.. शुद्धलेखन चुका माफी असावी.