जेव्हा सुनेने मुलादेखत सासू सासऱ्यांना घरातून हकलावून लावले तेव्हा पहा सासऱ्याने तिचे काय केले..

आज राधाच्या मुलाचं,गगनचं लग्न होतं. कार्यालय अगदी तुडुंब भरलं होतं. अगदी थाटात लग्न करून दिलं होतं मुलीच्या आई-वडिलांनी!त्यातच नवरी म्हणजे, ‘गीता’ राधाची होणारी सून फारच सुंदर होती दिसायला गुलबक्षी रंगाची भारी पैठणी, सुंदर हेअरस्टाईल, नवनवीन प्रकारचे सगळे दागिने, अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती गीता!, त्यामुळे राधाही अगदी खुश होती. अगदी आकाश ठेंगणं झालं होतं तिला! सगळे कार्यालयातून घरी आले. अगदी मस्त तयारी केली होती. नवरीच्या गृहप्रवेशाची!, राधानं तिचं औक्षण केलं व उंबऱ्यावरचं माप ओलांडून, उखाणा घेऊन आत यायला सांगितल.

नवरीनं…. गीतानं माप ओलांडलं पण तशीच आत आली आणि फट्कन म्हणाली, “दिवसभर उखाणे उखाणे आणि माणसांचा गोंगाट ऐकून मी कंटाळलेय! मी काही घेणार नाही उखाणा बिखाना!” असं म्हणून ती पट्कन बेडरूममध्ये जाऊन पडली सुध्दा!एकदम शांत झाले सगळे जण! राधालाही मेल्याहून मेल्यासारखं झालं. कार्यालयात सून सुंदर मिळाली म्हणून तिची फुगलेली छाती आता मात्र धडधडू लागली. दुसरेच दिवशी सत्यनारायण झाला व सगळे पाहुणे मंडळी आपापल्या गावी गेली सुध्दा! घरात फक्त राधा, तिचा नवरा शाम, तिचे लेक-जावई व नवरा नवरी.. गीता गगन एवढेच राहिले.

दुसरे दिवशी राधा नेहमीप्रमाणं उठून कामाला लागली. बरीच उशीरा उठली नवीन सून गीता!, तिनं सासूबाईंना ऑर्डर सोडली, “जरा आल्याचा चहा करा हो!, मला एवढया दग दगीची सवय नाही. थोड्याच वेळात स्वयंपाक वाल्या मावशी आल्या. त्यांनी भाजीसाठी वांगी काढलेली पाहून गीता लगेच म्हणाली,” वांग्याची भाजी नाही आवडत मला!, दुसरी करा!, काय काय करायचे हे तिनंच सांगितलं!, राधा सहित सगळे गप्प बसले, करणार काय?, दुपारी निवांत वेळी सगळ्यांनी बसून आलेला आहेर आहेरात आलेली चांदीची भांडी, कपडे, साड्या बघायचे ठरवलं. सगळ्यांनी ते बघितलं.

आणि कोणालाही न विचारता गीतानेच ते सगळं घेऊन स्वतःच्या बेडरूममध्ये कपाटात ठेवलं. हनिमूनला जाऊन आले दोघही! अर्थात ते ठिकाणही गीतानेच ठरवलं होतं म्हणे!, हनिमूनहून आल्यावर हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली गीतानं!, ती नोकरी करत होती पण पगाराच्या पैशाचं काय करत होती हे विचारायचं धाडस केलं नाही. कोणीच! इतकंच काय पण गगनच्या पैशावरही ती हक्क सांगू लागली. ती म्हणेल ती पूर्व दिशा असं सुरू झालं. तिनं गगनाला केंव्हा मुठीत घेतलं कळलंही नाही कोणाला!.. आता राधा व शाम यांना कोणताही हक्क नव्हता घरात!.

कधी वाटलं तर एखादा मनासारखा पदार्थही करून खाण्याचा हक्क नव्हता त्यांना!, हळूहळू गीताच्या माहेरचे लोक येऊ लागले आणि ढवळाढवळ करू लागले यांच्या घरात!, आता अगदी बेलगाम सुटली होती गीता! शेवटी अगदी कळस झाला. तिनं परस्परच सासू-सासऱ्यांसाठी एक वन बीएच के फ्लॅट घेतला व तिथं वेगळं राहण्यास त्यांना भाग पाडलं. आज राधा आणि शाम मुलानं त्यांच्यासाठी घेतलेल्या भाडोत्री फ्लॅटमध्ये रहायला आले. आता मात्र राधाच्या मनाचा बांध फुटला, ती रडू लागली. शाम तिच्याजवळ आला आणि म्हणाला, “रडू नकोस राधा जे झालं ते झालं.

ही पुनरावृत्ती आहे. तुला आठवलं का?, बरोबर 31 वर्षापूर्वी याच तारखेला तूही माझ्या आईवडिलांना असंच घराबाहेर काढलं होतंस. “इतके दिवस मनात साठवून ठेवलेलं दुःख, खदखद बोलून दाखवण्याचं धैर्य केलं त्यांनी! राधाला सगळं आठवलं, तिनंही याहीपेक्षा जास्त भांडणं केली होती. घर ताब्यात घेण्यासाठी! सासरचे सगळे नातलग तोडले. खूप आकांडतांडव केलं होतं तिनं एकहाती सत्ता घेण्यासाठी! आता याची देही याची डोळा तोच प्रसंग पाहण्याची वेळ आली तिच्यावर! मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!