नक्की पहा मावशीने या मुलीसोबत काय केले जाणून तुमचा थरकाप उठेल..

विमल मावशी आणि तिची गट्टी छान जमली, मावशी आता हक्क असल्यासारखे तिला काम सांगे, तिला ही काही गैर वाटत नसे. एक दिवशी मावशी कडे कोणी पाहुणे येणार होते म्हणून मावशीने तिला घरीच राहण्यास सांगितले. तिलाही वाटले मावशी ला मदत म्हणून घरी थांबावे. काही बाहेर विशेष कामही नव्हते. संध्याकाळी सात च्या सुमारास कोणी दोघे असावेत 40,45 वयाचे मावशीकडे आले, मावशीने स्वागत केले. पहिल्यांदाच भेटत असावेत असं तिला त्याच्या बोलण्यावरून जाणवले चहा पाणी घेऊन मावशीने तिला बोलावले. ती हातात ट्रे घेऊन आली, तिने चहाचा कप देताना त्यातल्या एकाने तिच्या हाताला स्पर्श केला.

तिला राग आला, तिने रागाने पाहिले तर तो दात विचकून हसत होता, ती आतमध्ये गेली. तिला खूप विचित्र वाटलं. दोघेही मावशी शी बराच वेळ बोलत बसले. ती परत बाहेर गेलीच नाही. थोडयावेळाने बोलणे झाल्याचे तिला जाणवले. ती उठली तर दोघेही आत आले. ती प्रचंड घाबरली. तिने मावशीला हाक मारली, मावशी मागाहून येतच होती. मावशीने दोघांकडे बघत तिची ओळख करून दिली. दोघेही खुश झाले त्यांनी तिला वरून खाली न्याहाळले. मावशी हसून त्यांना म्हणाली चालूदे ती जोरात ओरडली, मावशीने त्या दोघांना बाहेर थांबण्यास सांगितले. ती-मावशी हे काय चाललंय? कोण आहेत ती माणसं?, खूप घाणेरडी आहेत.

मावशी- तुला काय वाटतंय तू खूप भारी आहेस का ग?.आली मोठी हिरोईन व्हायला, तुझ्यासारखे हजारो येतात रोज मुंबईत, फालतू खेड्यातून येतात, काय समजतात स्वतःला काय माहिती?, पण बरं आहे अश्या पोरी आल्या नाहीत तर आम्हाला तरी गिऱ्हाईकना कसं खुश ठेवता येईल. तिला प्रचंड धक्का बसला.मावशी म्हणतो हिला आपण,ही अशी निघाली?. तिने सांगितले मुलीसारखी आहे मी तुला, अस करू नकोस, माझं जीवन उद्धवस्त केऊ नकोस पण एक ही आवाज त्या बाईपर्यंत पोहोचला नाही. उलट तिला सांगितले तुला यातून हवी ती रक्कम मिळवून देते, पाठव घरी, गावचे खुश होतील.

आणि इथून तुला कोणीही सोडवू शकत नाही. ती प्रचंड चिडली, मदतीसाठी ओरडली,तिने पोलिसांची धमकी दिली. तिने लोटांगण घातलं ,शपथा देऊन झालं,काहीएक चाललं नाही. विमल बाई बाहेर गेली,त्या दोघांना आत सोडून, तिच्या प्रचंड किंकाळ्या सगळीकडे पसरल्या, श्वापद तिच्यावर तुटून पडली. सकाळ पर्यंत ती प्रेतासारखी पडून होती. थोडयावेळाने उठली खूप तहान लागली होती. तिला कोणी पाणी आणून दिले. ती घटाघट पाणी प्यायली, सर्वांगातून वेदना होत होत्या जे तिच्यासोबत घडले ते भयंकर होतं. तिने खूप मोठी किंकाळी फोडली, बाहेरून खोलीचे दार लावले होते.

तिला आईबाबकडे जायचे होते. किती जणांना हाक मारून झाली. अख्खा दिवस ती त्या खोलीत बंद होती. फक्त पाणी आणि काही खायचे आत येई तिने कशाला ही हात लावला नाही, ती रडत राहिली,ओरडत राहिली. दोन दिवस होऊन गेले, कोणीही आले नाही. ती कशीबशी उभी राहिली,तिने बाथरूम मध्ये जाऊन सर्वांग घासून धुतले,वारंवार साबण लावत राहिली. सगळे डाग धुण्याचा तिने अयशस्वी प्रयत्न केला. पोटात भुकेने आग लागली होती. तिने जे होते ते बकबका खायला घेतले, पाणी प्यायले कुठलं औषध ठेवले होते. ते घेतले.तिला तरतरी आली, तिने फोन शोधला कुठंही सापडला नाही.

दार वाजवले, शेवटी रात्री दार उघडले विमल मावशीच होती. तिने प्रचंड तिरस्कारांने तिच्याकडे पाहिले. तिला विमल मावशीने पैसे दिले, आणि म्हणाली हे साठवून ठेव आता तुला खूप मिळतील, जेवढ्या लवकर मान्य करशील तेवढा त्रास कमी होईल आणि दार लावून निघून गेली. तिच्याकडे प्रतिकाराची ही ताकद उरली नव्हती. दुसऱ्या दिवसापासून फक्त सौदा झाल्यावर कोणी कोणी येत राहिले.तिला तोडत राहिले, ती हतबल, ती स्वतः उरलीच नाही. फक्त तडफड काही महिन्याने तिने स्वीकारलं सर्व बाहेरचे सगळे मार्ग बंद झाले होते. तिला आता जायचीही इच्छा राहिली नाही.

फक्त पैसे ती नेमाने घरी पाठवी, फोन मिळाला पण तिने कधी कोणाला फोन केला नाही. घरून फोन केला की ती तेवढ्यापुरते बोले आणि फोन बंद करी. नियतीने तिच्यावर कायमचा डाग लावला होता. “अग उठ ग बाळा,केव्हाची झोपलीयेस, रात्री झोप आली नाही का?”, बाबांची हाक ऐकू आली तशी ती उठली. इतक्या प्रेमानं कोणी उठवलं नव्हतं गेल्या तीन वर्षांत आईबाबा सगळं करत होते. तिच्यासाठी, लाडकी लेक, पण तिला स्वतःची घृणा आली….आईबाबना कळले की, मी मुंबईत काय काम करते, कसले पैसे कमावते?, तर ते कधी माझं तोंड पाहतील का?, काय वाटेल त्यांना? माझं नाव कायमच टाकतील ते, नको नको त्यांना हे कधीच कळायला नको.

आवरून आल्यावर आई सांगत होती, संध्याकाळी सुमीच्या घरी तिच्या सासरचे यायचेत, कसली बोलणी आहे म्हणे, आता कोणी जास्त लोक नसतील , आपण जवळ आहोत तर बोलावले आहे आपल्याला जाऊयात. तिने नकार दिला, आईबाबा ना जाण्यास सांगितले. तिला त्यांनी जास्त आग्रह केला नाही. आईबाबा संध्याकाळी सुमीकडे गेले. तासाभरात परत येणार होते. मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!