लग्नानंतर हिची अवस्था “युज अँड थ्रो” सारखी झाली होती, नक्की पहा पती हिच्या सोबत काय करत असे..

मी एकत्र कुटुंबात वाढली .घरी आई, दोन बहिणी, आणि एक भाऊ…., नावाला वडील नामक एक व्यक्ती ज्याने फक्त आम्हा सर्व भावंडाना जन्म घालायला पुरूष या नात्याने हातभार लावला. त्यानंतर बाप म्हणून तो कधी आम्हाला लाभलाच नाही. कुठल्यातरी सोसायटीत वॉचमन म्हणून काम करत. दिवस रात्र तिकडेच असे, फक्त वाटेल तेव्हा मर्दांगी गाजवायला घरी येत. आई नाही म्हटंली कि लाकडाचा दांडा तयार असायचा, आई चार घरची धुणी भांडी करून कसा तरी संसार चालवी. हे सर्व समोर बघत बघत मी वाढलेली, घरात सर्वात मोठी होते, आईला कामाला मदत करत.

शिक्षणाची आवड असूनही दहावी नंतर शाळा सोडावी लागली. पाठचा भावाचे व बहिणींचे शिक्षण सुरु होते. वयात आलेली पोर कितीदिवस संभाळायाची म्हणून नात्यातल्याच मुलाशी बोलणी सुरू झाली. माझ्यापेक्षा दिसायला मुलगा छान होता. कुठल्यातरी कंपनी जातो नौकरीला आज उद्या पर्मनंन्ट होईल या सबबीवर होते सर्व…. त्याचे शिक्षण नव्हते झालेले काहीच, मी दहावी शिकलेले तरी लग्नाला तयार झाले, कारण आमच्या जातीत फार जास्त शिकलेली मुलं मिळणे निदान त्यावेळी तरी शक्य नव्हते. त्यात ज्या परिस्थिती मी वाढत होते तिथे तर शक्यताही नव्हतीच.

तरुणपण आणि लग्न सारखेच, निर्णयाचा एक क्षण संभाळता आला नाही, तर सर्व व्यर्थ.. म्हणून कदाचित लग्नाला वधू-वरांवर अक्षता टाकत असावेत .अक्षता…. अ -अल्प, क्ष – क्षणांचे, ता – तारूण्य, आमच्याही अंगावर त्या पडल्या, लग्न झाले, आणि एक एक प्रताप उघड होऊ लागले, असलेल्या नौकरीवर गेले तर रोजंदारीचे पैसे हातात मिळेल अशी होती. हातात आलेला पैसा कधीच घरात येत नसे, आई बापाशी त्याचे कधी पटत नसे, आणि मलाही कधी पटवून घेऊ दिले नाही. बाहेरख्याली होता लग्नाअगोदर पासूनच ती सवय लग्नानंतरही सुरूच होती. काही बोलायला जावं.

तर पिशवी भर आणि चालती हो…., असे ठरलेले वाक्य ऐकायला मिळे. ज्यादिवशी बाहेर भागले नाही तेव्हा मला जवळ करी, USE & THROW या तत्वावर संसार चालू होता. कुणाला सांगायची सोय नव्हती.., आई थकली होती.., तरी बहिणींच्या लग्नाची जबाबदी तिच्यावर होती, भावाचे शिक्षण सुरु होते. इच्छा नसूनही निसर्ग नियमानुसार व्हायचे ते झाले. दोन मुले पदरी पडली, पण या पाच सहा वर्षात त्याच्यात काही एक फरक पडला नाही. मारझोड.., शिवीगाळ यांना वैतागून एक दोनदा घर ही सोडण्याचा विचार आला मनात पण मुलांच काय?. एक आई म्हणून नाही ना.

वाऱ्यावर सोडता येत, जे माझ्या आईने केले तेच मीही करत होते. वडील केव्हाच गेले, नंतर बहिणींची लग्न झाले भाऊ सर्वात जास्त शिकलेला, असे वाटत होते की आईच्या कष्टाचे चिज झालं. डि.फार्म करून कुठेतरी छोटेसे मेडीकल सुरु करेल. आईचे शेवटचे दिवस तरी सुखात जातील. पण निकाल लागला, आणि मित्रांसोबत गाडीवर घरी येत असताना त्याचा अपघात झाला. त्यात तो गेला….धक्का सहन होणारा नव्हताच, आई जिवंतपणीच मेल्यासारखी झालेली. ती एकटीच असल्यामुळे फार काळजी वाटायची, पण मला माझा संसारही बघायचा होता. संसाराला.

हातभार लागावा म्हणून घरूनच पोळी भाजीची डब्बे पोहच करणे सुरु केले. मुलांना शिकवावे असे वाटत होते. कारण शिक्षणा शिवाय प्रगती होणार नाही हे मला कळून चुकले होते. त्यासाठीच ही खटाटोप सुरू आहे माझी…. त्याला हवा तेव्हा तो घरी येतो.., पैशासोबत मलाही ओरबाडून घेतो. प्रतिकार केला तर घर डोक्यावर घेतो, मारझोड तर सवयचीच झालीय. काम भागले कि महिना महिना तोंड दाखवत नाही. एकट्याने संसार रेटायचा, मुलांचा विचार करून फक्त चालू ठेवलंय सर्व, आईची अवस्था बघवत नाही…. म्हतारी झाली म्हणून बघवत नाही असे नाही.

ते कुणाला चुकले नाही. वय वाढणार तर शरीर थकनारच…. आपणही आईच्या मार्गावर जातोय, कळतंय, समजतंय पण काहीच करू शकत नाही…. कदाचित तिच्यासारखीच मीही काही दिवसांनी कुणाच्याही आधाराशिवाय शेवटच्या क्षणांची वाट बघत घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात निचपत पडलेली असेल. हताशपणे मरण येत नाही तोपर्यंत जगत राहील, याच विचाराने जरा जास्त अस्वस्थ होते. नियतीचे चक्र फिरते असे ऐकलं होते, पण माझ्या बाबतीत नियतीच फिरली असे वाटते. चक्र तिथेच थांबले आहे. त्याला ओढायची जबाबदारी फक्त आई नंतर माझ्यावर

आलीय या चक्रात अडकलेल्या माझ्यासारख्या कित्येक अनामिका संसाराचा गाडा शेवटच्या श्वासापर्यंत ओढत असतील…. त्याचा शेवट फक्त श्वासांसोबत होईल. आणि पुन्हा कुणीतरी एक नविन अनामिका ते चक्र पुढे चालवायला जन्माला येईल…. हेच सुरु राहणार? मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या !

1 thought on “लग्नानंतर हिची अवस्था “युज अँड थ्रो” सारखी झाली होती, नक्की पहा पती हिच्या सोबत काय करत असे..

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!